आश्विन कृष्ण एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रमा एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)

आश्विन कृष्ण एकादशी ही आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकरावी तिथी आहे.


पौर्णिमान्त महिना असलेल्या पंचांगाप्रमाणे या दिवशी कार्तिक महिना असतो. तमिळ पंचांगानुसार हा दिवस पुरातास्सी महिन्यात येतो. या दिवशी रमा एकादशी (किंवा रंभा एकादशी) असते.

मुचकुंद राजाचा जावई शोभन याने या दिवशी एकादशीचा उपवास केला होता. भूक सहन न झाल्याने तो मरण पावला. एकादशी व्रताच्या पुण्यामुळे त्याला मृत्यूनंतर मंदार पर्वतावरील देवनगरीत राहायला जागा मिळाली, आणि सेवेला रंभादी अप्सरा. म्हणून या तिथीला रंभा एकादशी म्हणतात.