Jump to content

त्रिपुरारी पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(त्रिपुरी पौर्णिमा या पानावरून पुनर्निर्देशित)
पाताळेश्वर मंदिर पुणे येथील दीपोत्सव

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.[][] या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.[] बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात.[] सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.[] शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.[]

पौराणिक पार्श्वभूमी

[संपादन]
पांचाळेश्वर मंदिर

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता.[] त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले.[] कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणले जाऊ लागले.[]या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.[]

  • उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते.
त्रिपुरवाती लावून शिव उपासना

दीपोत्सव

[संपादन]
मंदिरातील अन्नकोट उत्सव(त्रिपुरी पौर्णिमा)

या विशेष दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात. याला अन्नकोट असे म्हणले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात.[१०] भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.

त्रिपुर वाती
कार्तिक पौर्णिमा दीपोत्सव

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Gopal, Dr Krishna; Girota, Phal S. (2003). Fairs and Festivals of India: Chandigarh, Delhi, Haryana, Himachal Pradesh, Jammu and Kashmir, Punjab, Rajasthan, Uttaranchal, Uttar Pradesh (इंग्रजी भाषेत). Gyan Pub. House.
  2. ^ Cendavaṇakara, Sadānanda (1966). Bhāratīya saṇa āṇi utsava. Nirṇaya Sāgara Buka Prakāśana.
  3. ^ a b "त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव". महाराष्ट्र टाईम्स. ३. ११. २०१७. 2019-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११. ११. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b Bairwa, Rajat Gupta, Nishant Singh, Ishita Kirar & Mahesh Kumar. Hospitality & Tourism Management (इंग्रजी भाषेत). Vikas Publishing House. ISBN 9789325982444.
  5. ^ Singh [Author, Ranjit (2013). Golden Crystal (इंग्रजी भाषेत). Unistar Books. ISBN 9789351130482.
  6. ^ R̥gvedī (1979). Āryāñcyā saṇāñcā prācīna va arvācīna itihāsa. Prājñapāṭhaśāḷāmaṇḍaḷa.
  7. ^ "रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे". प्रहार. २८.११. २०१२. ११.११.२०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  8. ^ Bhatt, Shankarlal C. (2006). Land and People of Indian States and Union Territories: In 36 Volumes. Daman & Diu (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788178353890.
  9. ^ जोशी , होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड चौथा. पुणे: भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन.
  10. ^ "कार्तिक पौर्णिमा". transliteral. 2019-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११.११.२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

[संपादन]