Jump to content

वसुबारस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसुबारस पूजा

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.[]यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.[]

स्वरूप

[संपादन]

या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते.[] समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.[] या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पाढती आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Vasu Baras First Day of Diwali 2020 दीपोत्सवारंभ : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस; वाचा, महत्त्व व मान्यता". Maharashtra Times. 2021-10-31 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2020-11-11). "Diwali 2020 : वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीची कथा, महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या". Lokmat. 2021-10-14 रोजी पाहिले.
  3. ^ Claus, Peter; Diamond, Sarah; Mills, Margaret (2020-10-28). South Asian Folklore: An Encyclopedia (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-000-14353-9.
  4. ^ "Vasu Baras First Day of Diwali 2020 दीपोत्सवारंभ : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस; वाचा, महत्त्व व मान्यता". Maharashtra Times. 2021-10-14 रोजी पाहिले.
  5. ^ "भारतीय संस्कृति उत्सव और पर्वों की संस्कृति - उमेश चंद्र पोरवाल". doonhorizon.in. 2021-10-31. 2021-10-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-31 रोजी पाहिले.