Jump to content

पांडव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव
देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्‍नी द्रौपदी.

पांडव हे हस्तिनापूरचा राजा पांडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. पांडव महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. त्यांना कुरुवंशाचे राजा पांडू यांचे पुत्र मानले जाते. तथापि, पांडूंना संततीप्राप्तीचा शाप असल्याने, कुंती आणि माद्री यांनी देवतांच्या वरदानाने पुत्रप्राप्ती केली. त्यामुळे प्रत्येक पांडवाचा जन्म वेगवेगळ्या देवतांच्या कृपेने झाला असे वर्णन महाभारतात केले आहे.

पांडवांचा जन्म

[संपादन]

कुंतीमाद्री ह्या पांडू च्या दोन पत्‍नी होत्या. पंडू हा पंडुरोगाने पीडित असल्याने त्याच्यापासून मुले होणे उचित नव्हते. त्यामुळे, पंडूबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषींनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.

महाकाव्यात, पांडवांनी पांचाळ राज्याची राजकुमारी द्रौपदीशी विवाह केला आणि कुरु साम्राज्याच्या विभाजनानंतर उत्तराधिकाराच्या वादांपासून बचाव करण्यासाठी इंद्रप्रस्थ या शहराची स्थापना केली. दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील कौरवांनी कपटाने आपल्या चुलत भावांकडून त्यांचे राज्य हिरावून घेतले आणि ते परत देण्यास नकार दिला. त्यामुळे पांडवांनी आपल्या विस्तारित कुटुंबाविरुद्ध गृहयुद्ध छेडले. हा संघर्ष कुरुक्षेत्र युद्ध म्हणून ओळखला जातो. भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने पांडवांनी अखेरीस हे युद्ध जिंकले, परंतु त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. युद्धाच्या शेवटी कौरवांचा संपूर्ण नाश झाला.

शब्दव्युत्पत्ती

[संपादन]

पांडव (संस्कृत: पाण्डवा) हा शब्द पांडू (संस्कृत: पाण्डु) यापासून तयार झाला असून त्याचा अर्थ "पांडूचे वंशज" असा होतो.

पांडवांना दिलेली इतर विशेष नावे (उपाधी) अशी आहेत:

पांडुपुत्र (संस्कृत: पाण्डुपुत्र) – पांडूचे पुत्र

पांडवकुमार (संस्कृत: पाण्डवकुमार) – तरुण पांडव

कौंतेय (संस्कृत: कौन्तेय) – कुंतीचे पुत्र (युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन)

माद्रेय (संस्कृत: माद्रेय) – माद्रीचे पुत्र (नकुल आणि सहदेव)

अश्वमेध यज्ञ

[संपादन]

अश्वमेध यज्ञ हा वैदिक काळातील एक राजसूय स्वरूपाचा राजकीय-धार्मिक यज्ञ होता. याचा उद्देश राजाची सार्वभौम सत्ता प्रस्थापित करणे, राज्याची समृद्धी आणि प्रजेचे कल्याण साधणे हा होता.

महाभारताच्या युद्धानंतर युधिष्ठिर युद्धातील प्रचंड रक्तपातामुळे दुःखी आणि अपराधी भावनेत होते. महर्षी व्यास आणि श्रीकृष्ण यांच्या सल्ल्याने त्यांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. अनेक ऋषी, मुनी आणि विविध राज्यांचे राजे उपस्थित होते. युधिष्ठिराने विपुल दान दिले आणि यज्ञाची सांगता झाली.

श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले की सुपच सुदर्शन नावाचे महान संत यज्ञाला उपस्थित नव्हते. अश्वमेध यज्ञ आयोजित करण्यापूर्वी भीमाला सर्वांना निमंत्रण देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. भीम सुपच सुदर्शन यांना निमंत्रण देण्यासाठी गेला, परंतु त्याने त्यांच्याशी उद्धटपणे वागणूक दिली आणि त्यांना सामान्य ऋषी समजले.

श्रीकृष्णांनी भीमाला विचारले असता, त्याने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर श्रीकृष्ण पाचही पांडवांसह स्वतः सुपच सुदर्शन यांना विनम्रपणे निमंत्रण देण्यासाठी गेले. त्यांच्या नम्र विनंतीनंतर सुदर्शन ते निमंत्रण स्वीकारतो आणि भोजनासाठी जातो.

द्रौपदीने त्या महान संतासाठी स्वादिष्ट भोजन तयार केले होते. परंतु भोजन वाढताना तिच्या मनात एक दोष निर्माण झाला, त्यामुळे भोजन केल्यानंतरही शंख सतत वाजला नाही.

श्रीकृष्णांनी द्रौपदीला तिची चूक लक्षात आणून दिल्यानंतर, तिने क्षमा मागितली आणि सुदर्शन  यांच्या चरणांचे पाणी ग्रहण केले. त्यानंतरच शंख इतक्या मोठ्या आवाजात निनादला की त्याचा आवाज स्वर्गापर्यंत ऐकू गेला.

पुरावा: कबीर सागर, परख के अंग, प्रवचन ४२–४७, ६३–६६, ११९७–१२०२.

गरीब, पांडो यज्ञ अश्वमेघ में वाल्मीकि की देहे।

शंख पंचायन बाजिया, राख्या नाहीं संदेह॥

गरीब, सुपच रूप धर आयया सतगुरू पुरुष कबीर।

तीन लोक की मेदनी, जहाँ सुर-नर-मुनिजन भीड़॥