पौष पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पौष पौर्णिमा ही पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

शाकंभरी पौर्णिमा उत्सव[संपादन]

शाकंभरी पौर्णिमा उत्सव

पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा हा देवीच्या उपासनेचा एक दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीत हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.[१]

स्वरूप[संपादन]

शाकंभरी देवीचे नवरात्र हे ग्रेगोरियन कालगणनेनुसार जानेवारी महिन्यात येते. पौष पौर्णिमेला नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो त्याआधी आठ दिवस म्हणजे पौष अष्टमीला शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते.[२]

देवतेचे महत्त्व[संपादन]

शाकंभरी पौर्णिमा फळांची सजावट

भाज्या धारण करणारी देवी असलेले पार्वतीचे रूप शाकंभरी म्हणून पूजनीय आहे. अशी मान्यता आहे की दुर्गम नावाच्या राक्षसामुळे पृथ्वीवर शंभर वर्षे दुष्काळ पडला, त्यावेळी भक्तांनी आणि प्राचीन ऋषी-मुनींनी देवीचा धावा केला. आपल्या भक्तांच्या प्रार्थनेनुसार देवीने राक्षसाचा वध केला आणि पावसाचा वर्षाव केला आणि पृथ्वीवर अन्नधान्य तयार होऊ लागले. तेव्हापासून भक्त देवीच्या शाकंभरी या पोषण करणाऱ्या देवतेची पूजा करू लागले.[३] देवीने आपल्या हजार डोळ्यांनी पृथ्वीकडे पाहिले त्यामुळे पृथ्वी हिरवीगार झाली आणि येथील नद्या वाहू लागल्या.[४] दुष्काळ संपून जमीन सुजला सुफला झाली असेही या देवतेचे माहात्म्य आहे. देवीने एक हजार वर्षे तप केले आणि त्यावेळी तिने केवळ भाज्या सेवन केल्या म्हणून या देवतेचा संबंध भाज्यांशी आणि फळांशी जोडला जातो..[५]

धार्मिक महत्त्व[संपादन]

या दिवशी नदीत स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. सूर्याकडे मुख करून, पाण्यात उभे राहून सूर्याला अर्घ्य देऊन भक्त उपासना करतात.

उत्सवाचे स्वरूप[संपादन]

शाकंभरी देवी

शाकंभरी पौर्णिमा या दिवशी भारतातील विविध मंदिरात तसेच शाकंभरी देवीच्या मंदिरात देवीला विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीना त्यांचे दान करताात; भाजी भक्तांना प्रसाद म्हणून देतात..[६]


संदर्भ[संपादन]

  1. ^ Patil, Vimla (1994). Celebrations: Festive Days of India (इंग्रजी भाषेत). India Book House. ISBN 978-81-85028-81-1.
  2. ^ LLP, Adarsh Mobile Applications. "2021 Shakambhari Purnima | Shakambhari Jayanti date for New Delhi, NCT, India". Drikpanchang (इंग्रजी भाषेत). 2020-12-06 रोजी पाहिले.
  3. ^ Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-617-5.
  4. ^ "शाकंभरी पूर्णिमा- सौ आंखों से किया था धरती को हरा-भरा, पढ़ें कथा". punjabkesari. 2020-01-10. 2020-12-06 रोजी पाहिले.
  5. ^ Bhāratīya sãskr̥tikośa. Bhāratīya Sā̃skr̥tikośa Maṇḍaḷa. 1962.
  6. ^ "शाकंभरी पूर्णिमा 10 जनवरी को, इस दिन कच्ची सब्जियां और फल दान करने का है खास महत्त्व". Asianet News Network Pvt Ltd (हिंदी भाषेत). 2020-12-06 रोजी पाहिले.