कुणबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुणबी ही महाराष्ट्रातील एक क्षत्रिय जात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात.[१] कुणबी हा लोकांचा समूह आहे जो पूर्वी क्षत्रिय होता आणि नंतर शेती करू लागला. ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा,तसेचविदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे १५% असून तो इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा साम्राज्याच्या सैन्यात सेवा करणारे बहुतेक मावळे या समाजातील होते. मराठा साम्राज्यातील शिंदे, पवार, भौसलेगायकवाड घराणे मुळात कुणबी वंशाचे आहेत. चौदाव्या शतकात आणि नंतरच्या काळात अनेक कुणबी, ज्यांनी विविध राज्यकर्त्यांच्या सैन्यात लष्करी पुरुष म्हणून नोकरी केली होती, त्यांनी सांस्कृतिकरणाची प्रक्रिया पार पाडली आणि ते स्वतःला मराठा म्हणून ओळखू लागले. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला वसाहतवादाच्या परिणामांमुळे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा पुसट झाली आणि दोन गट मिळून मराठा-कुणबी असा एक गट तयार झाला.

कुणबी लोकांची कुणबी बोलीभाषा असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबीयांची संस्कृती दिसते. - कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशींहि या जातीचीं नांवें आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणें होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कूल अशी संज्ञा आहे. यावरून कूल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कूल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कूळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. कुळपति-कुळवइ-कुळवी- कुणबी असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता धंदा होता. तो सध्यां जात झाला

हे सुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ It is a snapshot of the page as it appeared on 6 Jun 2009 13:15:06 GMT[permanent dead link]