कासार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कासार म्हणजे तांबे पितळाची भांडी तयार करून व ती विकणार याला कासार म्हणतात.

ऊत्पत्ती - कासार या शब्दाची उत्पत्ती संस्कृत कांस्यकार म्हणजे धातूशी निगडीत व्यवहार करणारा तो कासार अशी आहे.ही धातू म्हणजे तांबा पितळ वगैरे भांडी बनवणारे व विकनारे दोघेही कासार या संज्ञेस पात्र ठरतात. पुर्वी कांसेची भांडी व बांगडी तयार करनारा वर्ग होता. नंतर कांस्याची भांडी जाऊन तांबे पितळेची भांडी घडवणारा व विक्री करनारा वर्ग आला. कासार समाज हा संख्येने अल्प आहे.

उपजीविका - तांबे पितळेची भांडी तयार करणारा त्वष्टा कासार व त्या भांडयांचा व्यापार करनारा सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज. त्वष्टा कासार स्वताला त्वष्टा ब्राह्मण म्हणतात.सध्याची पिढी उच्चशिक्षीत आहे.

वर्ण- कासार हे सोमव्ंशीय क्षत्रिय म्हणजे चंद्रवंशी क्षत्रिय आहेत. समाजाची ऊत्पत्ती सोमवंशी राजा कार्तविर्य सह्स्त्रार्जुन याच्या पासुन झाली आहे.

धर्म - कासार समाज हा विखुरलेला असुन वेगवेगळ्या ठिकाणी असलेला प्रमुख धर्म त्यांनी आत्मसात केलेला दिसतो. म्हणुनच पुढिल विभाग पडतात- 1) हिंदु उपासना असलेला सोमवंशीय क्षत्रीय कासार. 2)जैन उपासना मानणारा दिगंबर जैन कासार. 3)श्री चक्रधर स्वामींंना मानणारा महानुभाव पंथी.

उपास्य देवता- कासार या जातीची उपास्य देवता ही श्री कालिका माता आहे. ही कालिका माता पद्मसनात बसलेली, क्षमादायिनी आहे, उभी संहारक रुपातील नाही.

संत- 1) संत श्री अडकोजी महाराज- राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे गुरू. 2) श्री शंभुनाथ महाराज 3) संत श्री शिवजी कासार- संत तुकाराम महाराज यांचे 14 मानाचे टाळकरी पैकी एक. 4) संत महादबा कासार- दरवर्षी कासार समाजाची दिंडी आषाढी एकादशीस श्री क्षेत्र पंढरपुर येथे श्री महादबा कासार दिंडी या नावाने नेण्यात येते.

संस्था - क्षत्रीय कासार समाजाचे 'अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रीय कासार' ही संस्था आहे.

मंदीर- सोमवंशीय क्षत्रीय कासार श्री कालिका देवी मंदीर 552 बुधवार पेठ पुणे येथे आहे.

कासार समाजाचे पुरातन श्री कालिका देवी मंदीर- 1)शिरुर कासार 2)निनगुर (नेकनुर) 3)डिग्रस हे सर्व बीड जिल्ह्यात आहेत. 4)घोटण (जिल्हा - अहमदनगर) 5)भुतेगाव (जिल्हा- जालना)

मान्यवर- चित्रपटशृष्टि- 1) चित्रपती व राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्व. व्ही शांताराम (श्री शांताराम राजाराम वनकुद्रे) 2)चित्रपट नायिका- राजश्री 3) किमी काटकर. 4) वैभव मांगले.

राजकारणी- 1)स्व.शंकर रामकृष्ण मुरुडकर हे पुणे सार्वजनीक सभेचे मैनेजींग कमिटीचे सदस्य होते. पुणे सार्वजनीक सभा भविष्यात भारतीय कॉंग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. 1885. 2)स्व. राजाभाऊ झरकर (राज्यमंत्री). 3)पुणे स्थायी समिती विद्यमान अध्यक्ष श्री हेमंत रासने.

संदर्भ[संपादन]