पाटण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाटण हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे पाटण जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. पाटण हे शहर जुन्या काळी अणहिलवाड या नावाने प्रसिद्ध होते. सोळंकी वंशाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गावात अजूनही जुन्या तटबंदीचे आणि वेशींचे अवशेष दृष्टीस पडतात. पाटण हे शहर येथे असणाऱ्या 'राणीनी वाव' या पुरातन स्थळामुळे तसेच 'पटोला' साड्यांमुळे प्रसिद्ध आहे. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. सध्या भारतीय चलनात असलेल्या नव्या शंभर रुपयांच्या नोटेवरदेखील या वावेचं चित्र आहे.

इतिहास[संपादन]

पाटणची स्थापना चावडा शासक राजाने नवव्या शतकात "अनाहिलपताक" म्हणून केली. १०व्या-१३व्या शतकादरम्यान, शहराने चावडांच्या उत्तराधिकाऱ्या चालुक्य राजवंशाची राजधानी म्हणून काम केले. इतिहासकार टर्टियस चँडलर यांचा अंदाज आहे की अंदाजे एक लाख लोकसंख्या असलेले अन्हिलवाडा (पाटण या प्राचीन शहरावर बांधलेले आहे) हे इ.स १००० मध्ये जगातील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर होते. मुस्लिम आक्रमक कुतुबुद्दीन अयबक याने १२०० ते १२१० च्या दरम्यान शहरावर आक्रमण केले. हिंदुंनी अतिशय कडवट लढा दिला. आणि अनेक आक्रमकांना मारले. पण शेवटी पाणी तोडल्याने शहर पडले. अल्लाउद्दीन खिलजीने १२९८ मध्ये या शहराचा विध्वंस केला आणि अनेक् हिंदुंना मारून टाकले. देवळे पाडली. याच काळात येथील सूर्य मंदिरही भग्न करण्यात आले. हिंदू राज्याचा जुना किल्ला आजही त्याचे अवशेष दिसून येतात.