ऊस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Cut sugarcane.jpg

ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ, साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील य देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत.

पिकवण्याच्या पद्धती व वापर[संपादन]

ऊस हे वार्षिक पीक आहे. उसाच्या पेरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन रोप लावतात. उसाला काळी कसदार जमीन लागते, कारण उसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत.ऊसा पासून मोठया प्रमाणात साखराचे उत्त्पादन घेतले जाते .

लागवड[संपादन]

  • लागवड पट्टा पद्धतीत २.५ फूट किंवा ३ ६ फूट अंतरावर केल्यास उसाची वाढ जोमदार होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • उसाची लागवड करण्याअगोदर रोग व कीडप्रतिबंधक उपाय म्हणून १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम आणि ३०० मि.लि. मॅलेथिऑन प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. त्यामध्ये टिपरी १० ते १५ मिनिटे बुडवून नंतरच लागण करावी.
  • उसाची लागण करतेवेळी आडसाली उसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश द्यावे. पूर्वहंगामामध्ये हेक्टरी ३४० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश द्यावे. खतमात्रा मातीपरीक्षणानुसारच द्यावी. या शिफारशीत खतमात्रेमधून लागवडीच्यावेळी दहा टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद आणि ५० टक्के पालाश या प्रमाणात द्यावीत. उरलेली खते (स्फुरद व पालाश) मोठ्या बांधणीवेळी द्यावीत. नत्राची ४० टक्के मात्रा ४५व्या दिवशी, दहा टक्के मात्रा ९०व्या दिवशी आणि ४० टक्के मात्रा मोठ्या बांधणीवेळी द्यावी, तसेच सल्फर या खताची मात्रा लागणीवेळी ६० किलो प्रति हेक्‍टरी शेणखतात मिसळून द्यावी.

उपयोग[संपादन]

साखर कारखान्यांमध्ये उसापासून साखर बनविली जाते. मळी, इथेनॉल व बग्यास- चिपाड (ऊसाचा रस काढून उरलेला चोथा) ही उसापासून मिळणारे उप-पदार्थ आहेत. मळीपासून पिण्याची दारू बनवता येते.उसाच्या चापादापासून पेपर बनवला जातो.

रोग[संपादन]

कारखानदारी[संपादन]

  • सहकारी तत्त्वावर साखरकारखाने
  • खाजगी साखरखाने
  • गुऱ्हाळे

ऊसउत्पादन[संपादन]

SugarcaneYield.png उत्पादन २००८ (आकडे टनांमध्ये)

देश उत्पन्न
ब्राझील ६४८,९२१,२८०
भारत ३४८,१८७,९००
चीन १२४,९१७,५०२
थायलंड ७३,५०१,६१०
पाकिस्तान ६३,९२०,०००
मेक्सिको ५१,१०६,९००
कोलंबिया ३८,५००,०००
ऑस्ट्रेलिया ३३,९७३,०००
आर्जेन्टिना २९,९५०,०००
अमेरिकेची संयुक्त संस्थाने २७,६०३,०००

हे सुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.