Jump to content

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखांची आणि पानांची नावे शक्यतो मराठी भाषेत व देवनागरी लिपीत असावीत. अगोदर अनुमती न घेता केलेली व देवनागरी लिपीत नसलेली शीर्षके वगळली(पुसली) जावीत. ज्यांना देवनागरी लिपीत वाचन कसे आणि लेखन कसे करावे याची माहिती नाही, त्यांना मार्गदर्शन करणारी आवश्यक तेवढी सुयोग्य साहाय्य पाने इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या मराठी लोकांच्या मदतीने आणखीही साहाय्य-पाने तयार केली जातील, परंतु येथे मराठी विकिपीडियावर देवनागरी लिपीच आग्रहाने वापरली जाईल.

आंतरविकि संपर्क करू इच्छिणार्‍या अमराठी बांधवांकरिता आंतरविकि दूतावास व Bot पेज केवळ इतर भाषेच्या वापराकरिता मोकळे ठेवले आहे. चर्चा पानांवर इंग्रजी लेखनाची गरजेनुसार मुभा सर्वांनाच आहे, तरीपण तेथेसुद्धा शक्यतो मराठीचा वापर करणे अपेक्षिने ठरलेलेत आहे.

सहमतीने ठरलेले लेखन संकेत

सर्वसाधारण संकेत

   1. मराठी शीर्षक/ देवनागरी लेखनपद्धती वापरा: लेखांची शीर्षके शक्यतो मराठी देवनागरीमध्ये लिहा. उदा. Calcium असे रोमन लिपीत लिहिण्याऐवजी 'कॅल्शियम' असे देवनागरीत लिप्यंतर (transliteration) करून लिहावे. तसेच, लेखाचे नाव मराठी देवनागरी लिपीतील वर्णमाला वापरून लिहावे. 'हिंदी देवनागरी'प्रमाणे काही अक्षरांखाली नुक्ता देणे वगैरे पद्धती 'मराठी देवनागरीमध्ये' प्रचलित नसल्याने वापरू नयेत. उदा.: 'गुलज़ार' असे न लिहिता 'गुलजार' असे लिहावे. अपवाद: जागतिक मान्यता पावलेल्या/ जगभर व्यवहारात वापरल्या जाणार्‍या रोमन लिपीतील नावांबाबत हा संकेत पाळण्याची गरज नाही. उदा. "MPEG-4", "ADSL" "G.7xx" वगैरे ITU-T अथवा 3GPP अथवा ISO मानकांची (standards/ protocols etc. शब्द बरोबर आहे का??) नावे जगभरात तशीच प्रचलित असल्याने रोमनमध्ये लिहिण्यास हरकत नाही.
   2. शीर्षक निःसंदिग्ध हवे: लेखांची शीर्षके शक्य तितकी निःसंदिग्ध लिहावीत. शीर्षकांमध्ये येणारी 'विशेषनामे' कोणत्या संदर्भात लिहिली आहेत हे शीर्षकावरून समजेल असे पाहावे. उदा. 'अरबी' असे शीर्षक बनवण्याऐवजी अरबी भाषेबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी भाषा' असे शीर्षक लिहावे; अरबी समुद्राबद्दल लेख लिहायचा असल्यास 'अरबी समुद्र' असे शीर्षक लिहावे. थोडक्यात, विशेषनामाबरोबरीने संदर्भसूचक शब्दांचा वापर करून शीर्षक अचूक अर्थबोध होईल असे लिहावे. (हा मुद्दा खरे तर सविस्तर लिहावा लागेल.. कारण संदर्भसूचक शब्दांचा क्रम, विशेषनामाआधी/नंतर लिहिणे, मध्ये स्वल्पविराम, अर्धविराम, कोलन(विसर्ग चिन्ह) टाकणे वगैरे बाबींचे संकेत लिहावे लागतील. उदा. "गोदावरी नदी", "स्पॅनिश भाषा", "अरबी समुद्र", "ययाति, पुस्तक", "बटाट्याची चाळ, पुस्तक" आणि "बटाट्याची चाळ, नाटक", "माणूस, चित्रपट" या संकेतांमागची मीमांसा तिथे लिहावी लागेल.)
   3. संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या: एखाद्या नावाच्या संक्षिप्त रूपापेक्षा पूर्ण रूपास शीर्षकलेखनात प्राधान्य द्या. अपवाद: संक्षिप्त रूप पूर्ण रूपापेक्षा जास्त प्रमाणात प्रचलित असल्यास/ व्यवहारात संक्षिप्त स्वरूपातच वापरले जात असल्यास संक्षिप्त रूपास प्राधान्य द्यावे. उदा. "भाजप" असे शीर्षक न लिहिता "भारतीय जनता पक्ष" असे शीर्षक लिहावे. परंतु "टीव्ही", "नाटो" इत्यादी नावांबाबत संक्षेपास प्राधान्य द्यावे.
   4. रोमन आद्याक्षरांचे मराठी देवनागरी लिप्यंतर: रोमन लिपीत एखाद्या नावाची आद्याक्षरे (initials) प्रचलित असतील व ती नावे मराठीत जशीच्या तशी व्यवहारात वापरली जात असतील तर रोमन लेखनपद्धतीनुसार देवनागरीतही त्यांचे लेखन करावे. उदा.: MSN या नावाचे लेखन "एम्‌.एस्‌.एन्‌." असे करण्याऐवजी "एम्‌एस्‌एन्‌" असे करावे; मात्र "H. G. Wells" याचे लेखन मधल्या पूर्णविरामचिन्हांसह "एच्‌. जी. वेल्स" असे करावे. (रोमन लिपीतून मराठी देवनागरीत लिप्यंतर कराताना पाळायचे संकेत, हा विषय खरे तर स्वतंत्र लेखास पात्र आहे. इथे त्या लेखाचा दुवेजोड देऊन संक्षेपाने आशय लिहिला आहे.)
संक्षिप्त रूपांऐवजी पूर्ण रूपाला प्राधान्य द्या
याला काहीही अपवाद ठेवण्याची गरज नाही. संक्षिप्त नावाचे पान संपूर्ण नावाच्या पानाकडे प्रतिनिर्देशित करावे. असे केल्याने शीर्षक निवडताना थोडा कमी विचार करावा लागेल.


व्यक्ती नांवांबद्दलचे शीर्षक संकेत

व्यक्तीबद्दलचा लेख तयार करताना त्याच्या संपूर्ण नावाने मूळ पान ठेवावे. उपनामे, उपाख्य, पदवीसह लिहिलेले शीर्षक असू नये. [अक्षरानुरूप वर्गीकरणात अडचण येते (alphabetical categorisation)]. प्रचलित नाव मूळ नावापासून वेगळे असल्यास प्रचलित नाव नि:संदग्धीकरण पानांवर नमूद करावे व त्या नावावर टिचकी मारल्यास ते मूळ नावाकडे जाण्याची व्यवस्था करावी.

जर आवश्यकता भासली तर उपनामे, उपाख्य, पदवीसकट नाव, इ.चे पुनर्निर्देशन या पानाकडे करावे. उदा. विनायक दामोदर सावरकर हे मूळ पान राहील व स्वातंत्र्यवीर सावरकर, वीर सावरकर, वि.दा. सावरकर, विनायक सावरकर, व्ही.डी. सावरकर इ. चे पुनर्निर्देशन विनायक दामोदर सावरकरकडे करावे.

अपवाद - जर व्यक्तीचे उपनाव, उपाख्य, पदवीसह नाव तिच्या मुळ नावापेक्षा जास्त प्रचलित असेल तर हे तसे शीर्षक असावे. उदा.


अशुद्ध लेखन असलेली शीर्षके शुद्धलेखन असलेल्या शीर्षकाकडे स्थानांतरित करावीत आणि अशुद्ध लेखन असलेले शीर्षक वगळावे. परंतु लोक अशुद्धलेखन असलेले शीर्षक पुन्हा पुन्हा निर्माण करत राहिले, तर मात्र ते पान तसेच ठेवून शुद्धलेखन असलेल्या व्यवस्थित शीर्षकाकडे पुनःर्निदेशित करावे.

प्रकल्प नावे आणि "/" बद्दल

काही प्रचलित नावांचा अपवाद सोडला (उदा. GNU/Linux) तर "/" देऊ नये. मुख्य नामविश्वात (namespace) उपपाने (subpages) नाहीत त्यामुळे तेथे "/" वापरून काही तांत्रिक फायदाही नाही.

आणखी एक सूचना म्हणजे "प्रकल्प अमुक" असे न ठेवता "अमुक प्रकल्प" असे ठेवावे. इंग्रजीत "project foo" असे प्रचलित आहे पण मराठीत "अमुक प्रकल्प", "तमुक योजना" असेच अधिक योग्य वाटते.

मराठीचे मराठी

प्रकार लेखन संकेत संदर्भ आणि अधिक माहिती
कालगणना आणि दिनांकांचे लिखाण विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा

इंग्रजी ते मराठी

इंग्रजी मराठी संदर्भ
Wikipedia विकिपीडिया विकिपीडिया:चावडी/लोगो,लेखन चर्चा आणि विक्शनरी चावडीवरील चर्चा

विकिपीडिया:नामविश्व बद्दल थोडेसे

मीडियाविकिमध्ये (ज्याच्या साहाय्याने विकिपीडिया चालवण्यात येतो) पानांची शीर्षके दोन भागात असतात - नामविश्व आणि शीर्षक. उदा: या पानाचे नाव आहे [[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]. यात विकिपीडिया हे झाले नामविश्व. तर नामविश्व हे या पानाचे शीर्षक आहे. म्हणजेच हे पान विकिपीडिया या नामविश्वात आहे. विकिपीडियावर अशी अनेक नामविश्वे असतात, जसे Wikipedia, Help, इ. जर एखाद्या पानाचे नामविश्व विशिष्टपणे उद्धृत केलेले नसले तर ते पान मुख्य नामविश्वात असल्याचे गृहीत धरले जाते.

नामविश्वांचे उपयोग व फायदे

दोन प्रकारची परंतु एकाच नावाची पाने विकिपीडियावर नामविश्वांचा वापर करून ठेवता येतात. उदा. महाराष्ट्र हा लेख आहे तर वर्ग:महाराष्ट्र हा याच नावाचा वर्ग आहे तर [[Image:महाराष्ट्र]] या नावाने चित्रही असू शकते. असे करता येत नसते तर, नामविश्वांशिवाय तीन प्रकारची पण एकाच नावाची पाने निर्माण करणे अशक्य झाले असते. यामुळे विकिपीडियावर वरीलप्रमाणे पानांचे तीन मोठे वर्ग तयार होतात. १) सामान्य वाचकांना दिसणारी पाने (लेख, चित्रे, इ.) २) प्रशासकीय पाने (वर्ग, साचे, इ.) ३) संपादकांची पाने (सदस्य पाने, सदस्य चर्चा, लेख चर्चा, चावडी, इ.) असे असल्यामुळे संपादकीय टिप्पणी व चर्चा सामान्य वाचकांना सहजासहजी दिसत नाहीत.
मुख्य नामविश्व हा गाभारा(core set) आहे. वाचकांसाठी इतर उपयुक्त नामविश्वे:
  • चित्र नामविश्व ( संपूर्ण आकाराची चित्रे)
  • वर्ग नामविश्व (सुचालनाकरिता)
  • Help हे साहाय्य नामविश्व आणि "माझ्या पसंती"ची पाने. (त्यांचा उपयोग फक्त वाचनापुरताच आहे.)
वापरकर्त्यांच्या शोध आणि अविशिष्ट लेख या सोयी, विकिपीडियाचे सदस्यत्त्व न घेतलेल्या वाचकांना समोर ठेवून, साधारणत: मुख्य नामविश्वाकरिता मर्यादित असतात. अर्थात, सार्‍याच विकि सहप्रकल्पात वाचक आणि सदस्यसमूह असा भेद केलेला नसतो हेही लक्षात घ्यावयास हवे. असा भेद काहीवेळा संपादकीय समुदायास आवश्यक वाटत नाही. त्यामुळे संबधित विकिप्रकल्प आपल्या आवश्यकतेनुसार व्यवहारनीती आणि चर्चापाने मुख्य नामविश्वात ठेवण्यास स्वतंत्र असतात.
विकिमीडियाच्या बहुतेक 'विकि'त संबधित विकिच्या सदस्य समूहाकडून मुख्य नामविश्वातील लेख आणि त्याबरोबरच इतर काही नामविश्वांवर जागता पहारा ठेवला जातो, आणि प्रकल्पाच्या दृष्टीने अयोग्य असलेली माहिती लवकरच वगळली जाते. इतर नामविश्वांबद्दल नियमांची अंमलबजावणी थोडी अधिक शिथिल असू शकते.

शीर्षक लेखन संदर्भातले नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लेखाचे नाव बदलणे

एखाद्या लेखाचे नाव कसे बदलावे? लेखाच्या शीर्ष मेन्यू मधील स्थानांतरण येथे टिचकी मारा . "'लेखाचे नाव' हलवा" असे शीर्षक येईल. तिथे नवीन शीर्षकाकडे समोरील खिडकीत नवे सुयोग्य शीर्षक लिहा. शक्यतोवर शीर्षक देताना शुद्धलेखन आणि मराठी विकिपीडियावरील शीर्षक संकेतांचा आधार घेतला तर बरे.

ऊपयुक्त साचे

हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतल्या शब्दोच्चारणांमुळे जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले आहेत .असे लेखन मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता टाळावयाचे आहे हे लक्षात घ्या
हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतले शब्दोच्चारण हलन्त नाही म्हणून, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले नाही. परंतु त्याभाषेत प्रत्यक्ष लेखन व्यंजनान्त होते .मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसारIndic script
Indic script
हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतल्या शब्दोच्चारणांमुळे, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले आहे .शुद्धलेखनाच्या नियमानुसार असे लेखन मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेकरिता टाळावयाचे आहे हे लक्षात घ्याIndic script
Indic script
हे परभाषीय लेखशीर्षक/त्यातील संबंधित शब्द, मराठी विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतानुसार त्या भाषेतले शब्दोच्चारण हलन्त नाही म्हणून, जाणीवपूर्वक व्यंजनान्त लिहिले नाही.परंतु त्या भाषेत प्रत्यक्ष लेखन व्यंजनान्त होते. (मराठीत व्यंजनान्त लेखन टाळावयाचे शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ अनुसार)
हेसुद्धा पाहा