विकिपीडिया चर्चा:भाषांतर प्रकल्प

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सामान्य माहिती (संपादन · बदल)







gif[संपादन]

खालील बदलत्या चित्रातली मराठी वाक्ये जर तुम्हाला जास्तीची भाषा येत असेल तर.... विकिपीडिया:भाषांतर प्रकल्पात सहभागी व्हा टाकून नवे[ चित्र हवे ] आहे. सध्याच्या चित्रातील बदलांचा वेग डोळ्यास त्रास होण्याइतपत जास्त आहे. तोसुद्धा कमी करून हवा आहे. कृपया जाणकारांनी सहकार्य करावे.


मी आपण सुचवलेले बदल लक्षात घेऊन तसे चिञ तयार केले आहे. हे चिञ मी | GIMP वापरुन पुर्नर्निमित केले आहे. - Bharat Patil

मदत हवी आहे ![संपादन]

  • माझी शंका

मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अथवा केवळ मराठी लिहितावाचता येणार्‍यांसाठी उपलब्ध मराठी पानांचे इंग्रजी अनुवाद करू इच्छितो.


  • माझे प्रश्न:
  1. समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल? उत्तरे समधानकारक आहेत
  2. कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय? (उत्तर होय मुभा आहे; सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समधानकारक आहेत
  3. मी अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायचचे / नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे? (सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समधानकारक आहेत
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Newkelkar १६:०६, १३ डिसेंबर २००९ (UTC)~~

विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प[संपादन]

आपण विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पाहिला आहे काय? त्यात कदाचित जास्तीची माहिती सापडेल. पायरीगणिक माहितीदेखील द्यायला आवडेल. पण पायरीगणिकमध्ये आपल्याला कायकाय अभिप्रेत आहे याची कल्पना दिलीत तर बरे होईल. मी येथे थोडासा प्रयत्‍न करतो आहे. काही शंका राहिल्यास जरूर विचाराव्यात.

  1. इंग्रजीतून मराठीत भाषांत्र करण्यात रूची असल्यास स्वतःच्या सदस्यपानावर {{भाषांतरकार|en|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} किंवा {{भाषांतरकार|hi|mr}} असे साचे लावू शकाल. त्याशिवाय विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/सहभागी सदस्य येथे स्वतःची नोंद केल्यास इतर भाषांतरकारांशी समन्वय साधणे सोपे जाईल. अर्थात हे बंधनकारक नाही. ही पायरी ओलांडून तुम्ही पुढे जाऊ शकता.
  2. आपल्याला वर्ग:भाषांतर येथे भाषांतर करून हवे असलेल्या सध्याच्या लेखांची यादी मिळेल. आपण विकिपीडियात प्रथमच संपादन करणार असल्यास अभाषांतरित लेखनातील एखादा उतारा भाषांतर करून जतन करावा, म्हणजे इतरांचेही सहकार्य मिळेल आणि विकिपीडीयातील लेखन शैलीचा अंदा्ज़ येईल. याची आवश्यकता वाटत नसेल तर आपण ही पायरी ओलांडून सरळ पुढील पायरीवर जाऊ शकता.
  3. आपल्याला इंग्रजी विकिपीडिया किंवा वा अन्य विकिपीडियांतील लेखांचे भाषांतर मराठी विकिपीडियावर आणावयाचे झाल्यास:- सविस्तर उत्तरासाठी खालील स्वतंत्र विभागात पहावे.
  4. आपल्याला विकिपीडियेतर स्त्रोतातील लेखाचे भाषांतर करावयाचे झाल्यास प्रथमतः स्वतःला खालील बाबतीत खात्री करून घ्या. -
    1. हे माझे स्वतःचे अन्य भाषेतील लेखन आहे, त्याचे प्रताधिकार माझ्याकडे आहेत आणि ते लेखन मला मराठी भाषेत आणावयाचे आहे
      1. ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे मराठीत आणावयाचे आहे आणि इतरांनी त्यात कमीत कमी बदल करावा अशी अपेक्षा आहे. (असे असल्यास ते b:विकिबुक्स या सहप्रकल्पात नेऊन व तेथे त्याचे वर्गःविकिस्रोत असे वर्गीकरण केल्यास बरे होईल. तसेच, आपण हे लेखन प्रताधिकारमुक्त करत असल्याचे चर्चापानावर लिहून आपले नाव व परिचय नमूद करावा.)
      2. ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे ठेवणे गरजेचे नसून ते विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीत आणून इतरांनीसुद्धा त्या लेखनात, भाषांतरात आणि संपादनात सहयोगी व्हावे असे अपेक्षित असल्यास ते लेखन आपण मराठी विकिपीडियावर भाषांतर करून लिहू शकता. अधिक माहिती विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा येथे पहावी.
        1. विकिपीडियावर लिहिताना लेखाचे शीर्षक मराठी भाषेतच असावे असा संकेत आहे. अधिक माहिती विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत येथे पहावी.
    2. स्वतःचे नसलेल्या लेखनाचा मराठी अनुवाद करावयाच्याआगोदर प्रताधिकार मुक्ती प्रकल्प येथून अधिक माहिती घ्यावी.
  5. तुम्हाला भाषांतरास अधिक कलावधी लागणार असल्यास किंवा लेख ४ परिच्छेदांपेक्षा मोठा असल्यास आपण शीर्षक निवडल्यानंतर तो अर्धामुर्धा लेख, तापुरत्या स्वरूपात धूळपाटी/लेखाचे नाव असे साठवू शकता त्या तात्पुरत्या कालावधीत इतरांची दखल नकोशी असल्यास स्वतःचे सदस्यनाव ’सदस्य:स्वतःचे सदस्य नाव/धूळपाटी” येथेदेखील ते लेखन जतन करू शकता. कमी परिच्छेदांचे काम असल्यास विकिपीडिया:धूळपाटी चा उपयोग करण्याचाही विचार करता येईल.
  6. बर्‍याचदा तुम्ही ज्या विषयावर लेखन करणार आहात त्या विषयाबद्दल एखादा लेखन समन्वय प्रकल्प असण्याची शक्यता असते. लेखन समन्वय प्रकल्पात वेळ वाचण्याच्या दृष्टीने (बंधनकारक नसलेले) लेख आराखडे उपलब्ध असणे संभवते. ते आराखडे जरूर विचारात घ्यावेत.
  7. ज्या नवीन लेखपानावर भाषांतर सुरू करत आहांत त्या लेखाला {{भाषांतर}} किंवा {{अनुवाद}} साचा लावावा म्हणजे भाषांतरात सहयोग हवा आहे हे इतर सदस्यांनाही समजते. तसेच भाषांतरात सहयोग असलेल्या वर्गीकरणात लेखाची नोंदही होते.
  8. लेखाच्या तळाशी {{पर्याय:लेखात प्रयुक्त संज्ञा}} साचा लावण्याबद्दल विचार करावा. त्यामुळे लेखात इंग्रजी शब्दाकरिता मराठीत कोणता शब्द वापरला आहे याची यादी उपलब्ध करून देता येते. तसेच लेखात एखादा मराठी शब्द विशिष्ट अर्थच्‍छटेने योजल्यास अशा शब्दापुढे {{विशीष्ट अर्थ पहा}} साचा लावण्याचा विचार करावा; आणि जेथे, शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा असा वेगळा विभाग लेखाच्या तळाशी {{पर्याय:लेखात प्रयुक्त संज्ञा}} ने तयार झालेला असेल, तेथे ती विशेष अर्थच्छटा नमूद करावी.
  9. शक्यतो लेखाचा पहिला परिच्छेद आणि ==चिन्हात दिलेली विभाग/परिच्छेद नावे== प्राधान्याने मराठीत आणावी म्हणजे इतर सहयोगी सदस्यांना अधिक उत्साह वाटू शकतो.
  10. भाषालेखनाबद्दल सांगावयाचे झाल्यास प्रथम भाषांतर आणि लेखन करा आणि नंतर विकिपीडिया:लेखनभाषा संकेत ला अनुसरून काही बदल करावयाचे झाल्यास विचार करावा.. तेथे आपण लेखन संकेताबद्दल चर्चासुद्धा करू शकता.
  11. पर्यायी मराठी शब्दांची गरज असल्यास {{मराठी शब्द सुचवा}} साचा लावावा तो [मराठी शब्द सुचवा] असा दिसेल किंवा ऑनलाईन शब्दकोश यादी च्या साहाय्याने इंटरनेटवर आपण इंग्रजी-मराठी शब्दांचा शोध घेऊ शकता. नवीन मराठी शब्द कसे बनवावेत याबद्दल तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता? येथे काही साहाय्य मिळू शकेल.
  12. विकिपीडियात नेहमी लागणारा शब्द,पद आणि वाक्य संचय वापरावा आणि त्यात भर घालावी.
  13. मराठी भाषेकरिता यंत्राद्वारे भाषांतरणाची सोय अद्याप नसली तरीसुद्धा त्याबद्दल अधिक माहिती मशीन ट्रान्सलेशन येथे उपलब्ध आहे.
  14. आणि शेवटी, आपली भाषान्तर करण्याचे अनुभव इतरांना उपयोगी पडावेत म्हणून अनुभव येथे आवर्जून नोंदवावे.
  15. नेहमीचे प्रश्न
    1. मी ऑफलाइन भाषांतर करून येथे आणू शकतो काय ?
      1. ऑफलाइनपेक्षा विकिपीडियावरच ऑनलाइन भाषांतर करणे जमल्यास करावे. त्या लेखाच्या संपादनाचा इतिहास वाचून मशीन ट्रान्सलेशन क्षेत्रात काम करणार्‍या तज्ज्ञांना हे उपयोगी ठरू शकते.
    2. कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
      1. जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय विश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.

माहितगार ०८:१२, १४ डिसेंबर २००९ (UTC)

उत्तर: मदत हवी आहे ![संपादन]

#समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल?
इंग्रजीतून किंवा इतर भाषांतून मराठीत एखादा लेख अनुवादताना काय पद्धत अवलंबावी याबद्दल माहिती देणारे साहाय्यपान सध्यातरी उपलब्ध नाही. परंतु, अनुवादताना उपयुक्त पडतील असे खाली नोंदवलेले मुद्दे विचारात घ्यावेत.
  • इंग्रजी/परभाषेतील विकिपीडियांवरील अनुवाद करण्याजोग्या लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी विकिपीडियावरील समांतर लेखाचा दुवा असल्यास शोधणे. असा दुवा मिळाल्यास, आपल्याला जो लेख मराठीत आणावयाचा आहे, त्या लेखाचे पान अगोदरच बनवले गेले आहे हे आपल्या ध्यानात येईल. ते पान उघडून, मराठी विकिपीडियावरील त्या संबंधित लेखामध्ये आवश्यक त्या मजकुराचा अनुवाद भरून तो लेख विस्तारायला आपण मदत करू शकता.
  • इंग्रजी/परभाषेतील लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी लेखाचा दुवा नसेल, तर मराठी विकिपीडियावर समानार्थी शीर्षकाचा शोध (शोधपेटी वापरून) घ्यावा. तरीही संबंधित शीर्षक न सापडल्यास त्या शीर्षकाचा नवीन लेख बनवावा आणि परभाषेतील मजकूर अनुवादण्याचे काम आरंभावे.
  • आपण छोट्या - छोट्या परिच्छेदांचा अनुवाद जोडत मराठी लेखात भर घालू शकता. किंवा परभाषेतील अख्ख्या लेखाचा ऑफ़लाइन अनुवाद एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवू शकता. अनुवाद पूर्ण झाल्यानंतर तो मजकूर आपण मराठी विकिपीडियावर त्या लेखाचे पान बनवून त्यावर कॉपी-पेस्ट करू शकता.
  1. कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय विश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
  1. मी अर्धवट अनुवादित केलेले पान साठवून कसे ठेवावे? आणि नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे?
अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून ठेवायची विशेष सुविधा विकिपीडियावर उपलब्ध नाही. तुम्ही जेवढा अर्धवट अनुवाद लिहिला असेल, तेवढा अंशात्मक स्वरूपात विकिपीडियावरील लेखात साठवू शकता आणि त्यात हळूहळू नव्या परिच्छेदांची भर घालू शकता. किंवा वर सांगितल्याप्रमाणे परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी विकिपीडियावर लेखाचे पान बनवून त्यावर आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
आपण कोणत्याही प्रकारे घेतलेल्या विधायक सहभागाचे मराठी विकिपीडियावर स्वागतच आहे. अजून काही शंका असल्यास येथे किंवा चावडीवर विचारू शकता.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:५०, १३ डिसेंबर २००९ (UTC)

चांगल्या भाषेत[संपादन]

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील विविध विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणा‍र्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.-J ०७:२६, ३१ जानेवारी २०१० (UTC)

Help for translate[संपादन]

Hello and sorry for writing in English. Can anyone help me translate a small article (2 paragraphs) from English to Marathi? Please, fell free to answer in my talk page in your wiki. Xaris333 (चर्चा) ०७:३४, २४ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]