चांद्रसेनीय कायस्थ प्रभू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ही प्रामुख्याने मराठी भाषककोंकणी भाषक समूहांमधील एक जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही विखुरले आहेत.

संस्कृती[संपादन]

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू वेद आणि संस्कृत यांचा अभ्यास करतात. तलवार आणि लेखणी अनेक शतके या समुदायाची व्यवसायाची साधने आहॆत. समुदायाच्या मातृभाषा आता मराठी आहे. पण गुजरात मध्ये ते गुजराती शेजाऱ्यांशी गुजरातीत बोलतात आणि लिहितात, आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांशी इंग्रजी आणि हिंदी बोलतात आणि देवनागरी लिपी लिहितात. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परंपरेने मटण, मासे, कोंबडी आणि अंडी खातात; त्यांच्या अन्नातील मुख्य पदार्थ पोळी आणि भात आहेत.

आडनावे[संपादन]

 • अधिकारी, अंबेगावकर
 • कर्णिक, केमकर
 • चिटणीस, चित्रे, चौबळ
 • दिघे, दीक्षित, देशपांडे, देशमुख, दोंदे
 • रणदिवे, राजे
 • खळे
 • विळेकर , वढावकर
 • ठाकरे
 • पालकर, प्रधान
 • फणसे
 • सोनाळकर
 • सुळॆ
 • दॆशमुख
 • मोहिले
 • वैद्य
 • शृंगारपुरे
 • उलकंदे
 • गुप्ते
 • नाचणे

गोत्र[संपादन]

 • कश्यप, दालभ्य, भार्गव, वसिष्ठ, विश्वामित्र, सांख्यायन,भुगु