धनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

धनगर ही महाराष्ट्रातील एक भटकी जात आहे. या समाजातले लोक पाळीव प्राणी चरावयास नेण्याचे व त्यांच्या देखभालीचे काम करतात व त्यात मिळणाऱ्या रुपयातुन उदरनिर्वाह करतात.[संदर्भ हवा] यांची एकंदर लो. सं (१९११) ६७३४३९. कोंकण व दक्षिण महाराष्‍ट्र, मध्यप्रदेश, वर्‍हाड व मध्यभारत यांमध्यें हे लोक आढळतात. गुरें विकणें व घोंगडया विणणें हे त्यांचे धंदे असून ते शेळ्या-मेंढ्या, गुरे-ढोरे पाळून त्यांवर उदरनिर्वाह करतात. उत्तर भारतातील धनगर हे मजुरी इत्यादी कामेंहि करतात. या लोकांच्या उत्पत्तीसंबंधीं निरनिराळीं मतें आहेत. तरी या जातींतील देवकांवरून हे लोक मूळचे अनार्य असावे असें दिसतें.यांपैकीं कांहीं जरी स्थायिक असले तरी, कांहीं अजून भटकेच आहेत.

जमाती / पोटजाती[संपादन]

धनगर समाजामध्ये विविध पोटजाती आहेत जसे हटकर (मेंढपाळ) , म्हसकर (म्हैस पालक ) ,खुटेकर /सनगर(लोकर आणि घोंगडी विणकर) इत्यादी


दैवते[संपादन]

विरोबा/बिरोबा धुळूबा शिंग्रुबा
धनगरांचे मुख्य दैवत आहे. बिरोबचे मुख्य देवस्थान सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे आहे. धनगरांचे दुसरे दैवत आहे. धुळोबांच्या व विरोबांच्या कथेमध्ये साम्य आढळते. शिंग्रुबाची जीवनगाथा अगदी अलीकडची म्हणजे ब्रिटीशांच्या काळातली आहे. म्हणून त्यांना आधुनिक देव मानले जाते.

लोकसाहित्य[संपादन]

  • ====वीरोबाची ओवी====

१) सुंबरान मांडल भारत भूमिला ll
तिरंगी झेंड्याला राष्ट्राच्या ध्वजेला वंदन करुन ll
मात्या आणि नित्याला वंदन करुन ll
दोनी मार्ग दाखवले त्या गुरुला वंदन करुन ll
बसलेल्या तमामाला, आई बापाला शाहीरांचा मुजरा ll

२) पहीलं माझं नमन गंगाया मातेला ll
धन्य धन्य इठूराया ll
हल्लीच्या जमान्यात कलियुगाची तर्‍हा ll
लेक एकीना बापाचं जरा ll
मनतो बायको माझी लय शाहनी ll
विषय सुखाची लागली गोडी ll
भल्या भल्याच्या मोडल्या खोडी ll
खडकावर बगळा बसला ll


  • ====शिंग्रुबाची ओवी====

इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।
खेलु महादबुवाचं चांगभलं।।
सुंबरान मांडिलं सुंबरान मांडिलं (दोन वेळा म्हणणे)
सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं। (सुंबरान याचा अर्थ स्मरण, इथे अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण)
सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं
पइल्या सत यौगाला आता।
खंडाळ्याच्या घाटाला खंडाळ्याच्या घाटाला।
गोरा मंग सायेब शिंग्रुबा हे नावाचा।
रहात व्हता धनगर खंडाळ्याच्या घाटाला।
शेळ्या-मेंड्या राकाइला आन गोरा मंग सायेब।
रस्ता लागलं धुंडाइला गोरा मंग सायेब।
रस्ता लागलं धुंडाइला खंडाळ्याच्या घाटाला।
रस्ता नव्हता घावत गोरा मंग सायब। शिंग्रुबाला बोलतो
रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला हर हर म्हादेवाऽऽ हर हर शंकरा
आता ऐका! गोऱ्या साहेबाला शिंग्रुबा धनगराने रस्ता दाखविल्यावर
काय बक्षीस गोऱ्या सायबानं शिंग्रुबाला दिलं त्याची कथा!
(निर्दयी ब्रिटिशांनी शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केलं.)
गोऱ्या मंग सायबानं हो।
बंदुकीला गोळी या आन्‌ गोळी त्यानं भरले।
शिंग्रुबाला मारले गोळी त्यानं भरलं। शिंग्रुबाला मारलं
गोळियांचा आवाज गं। मेंड्यांच्या ये कानाला
आन्‌ गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
गोळी मग आइकून। शिंग्रुबाच्या भवतनं
शेळ्या बगा मेंड्या या। शिंग्रुबाच्या भवतनं
आन्‌ गोळा बगा वव्हून। वर्डायाला लागल्या
आन्‌ नाराळाचं फळ या। फळ बगा देऊन
आन्‌ खंडाळ्याच्या या घाटाला। गाडी उबा या राहिलं
नाराळाचं फळ याऽऽ फळ बगा देऊन
गाडी गेली निगूनऽऽ पुण्याच्या हे जाग्याला
हर हर महादेवाऽऽ हर हर ये शंकरा
सुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं.अनुवादासाठी लेख. धनगर