उल्हासनगर
उल्हासनगर | |
---|---|
Ulhasnagar | |
गुणक: 19°13′N 73°09′E / 19.22°N 73.15°Eगुणक: 19°13′N 73°09′E / 19.22°N 73.15°E | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
जिल्हा | ठाणे |
सरकार | |
• प्रकार | महानगरपालिका |
• Body | उल्हासनगर महानगरपालिका |
क्षेत्रफळ | |
• एकूण | २८ km२ (११ sq mi) |
Elevation | १९ m (६२ ft) |
लोकसंख्या (२०११) | |
• एकूण | ५०६०९८ |
• लोकसंख्येची घनता | एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै) |
भाषा | |
Time zone | [[UTC+५:३०]] (भारतीय प्रमाणवेळ) |
पिन कोड |
४२१००१ ४२१००२ ४२१००३ ४२१००४ ४२१००५ |
Telephone code | STD code 0251 |
Vehicle registration | MH-05 |
लोकसभा मतदारसंघ | कल्याण |
संकेतस्थळ |
www |
उल्हासनगर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे . हे शहर MMRDA द्वारे व्यवस्थापित मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग आहे. २०११ च्या जनगणनेनुसार त्याची अंदाजे लोकसंख्या ५,०६,०९८ होती. उल्हासनगर हे नगरपालिका शहर आहे आणि त्याच नावाचे तहसीलचे मुख्यालय आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावर याचे उपनगरीय स्थानक आहे.
उल्हासनरचा इतिहास
[संपादन]हिंदुस्थानाची फाळणी होण्यापुर्वी उल्हासनगर शहर म्हणजेच कल्याण कॅम्प हा विस्तृत भाग ब्रिटिश सैनिकांची वसाहत होता. या दलदल व पठार सदृश्य भागात ब्रिटिशानी 1942 साली दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात 6000 ब्रिटिश सैनिकाना राहण्यासाठी 2000 बराकी बांधल्या़. त्यावेळी कोणी विचारही केला नसेल कि भविष्यात या बराकींमध्ये कुटुंबाच्या दोन ते तीन पिढया राहतील, वाढतील आणि या दलदलीच्या भागात एक औदयोगिक शहर वसेल़ 13 किलोमीटरच्या क्षेत्रफळात परसलेले उल्हासनगर शहर हे जगाच्या नकाशावर आजही केंद्र शासनाच्या सरंक्षण खात्याच्या अखत्यारीत आहे. भारत-पाक फाळणी दरम्यान पाकीस्तानच्या सिंध प्रांतातील सिंधी व्यापा-यांवर हिंदू असल्याचा ठपका ठेवत त्याना भारतात पाठविण्यात आले़ पाकीस्तानातुन आलेल्या हिंदू नागरिकांचे पुर्नवसन करण्याचे मोठे आवाहन भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर उभे होते़ देशातील विविध प्रांतांचा अभ्यास केल्यानंतर ठाणे जिल्हयातील लष्करी कल्याण छावणीत विस्थापिताना वसविण्यात आले़ कालांतराने कल्याण छावणीचे रूपांतर उल्हासनगर शहरात झाले़ पाकिस्तानातुन स्थलांतरीत झालेल्या 94 हजार 400 लोकांची तिथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ अनेकांच्या डोक्यावर छप्पर ही नव्हते़ अनेकांनी उल्हासनगरमधील रिकामी जमिन ताब्यात घेऊन तेथे आपली घरे बांधली होती. फाळणी व विस्थापितांच्या वेदना या गच्च भरलेल्या बराकींमधून आणि मोकळया जमिनींवर उभारण्यात आलेल्या आस्थाव्यस्थ खोपटांमधून स्पष्ट दिसत होत्या़. स्वातंत्रपुर्व काळात हिंदुस्थानची फाळणी होण्यापुर्वी कराची येथील मनोरा बेटावर मालवणी, तेलगु, धोबी, कच्छी आणि सिंध प्रांतात राहणारे सिंधी आदी अनेक हिंदू वास्तव्याला होते. फाळणीनंतर त्याना भारतात विस्थापित करण्यात आले, मुंबई बंदरातुन कल्याण कॅम्प(उल्हासनगर) शहरात त्याना वसविण्यात आले़ 8 आॅगस्ट 1949 रोेजी तत्कालीन गर्व्हनर सी़ राजागोपालचारी यानी या निर्वासितांच्या शहराला उल्हासनगर शहर असे नाव दिले. फाळणीनंतर बरोबर जे काही आणता आले होते, त्याच्या बळावर लहान-मोठे उद्योगधंदे सुरू करण्यास सिंधी समाजाने सुरुवात केली, त्यानी तयार केलेल्या वस्तुना मुंबई ही नजिकची बाजारपेठ असल्याने धंदा तेजीत आला. फाळणीनंतर उल्हासनगरात आलेल्या मराठी भाषिकाना बंदर व बोटीवर काम करण्याचा अनुभव असल्याने त्यानी मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये रोजगार मिळविला़.