तैजुल इस्लाम
Appearance
तैजुल इस्लाम (जन्म ७ फेब्रुवारी १९९२) हा बांगलादेश क्रिकेट संघाकडून कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजी करणारा, तैजुल इस्लाम २०१३-१४ च्या स्थानिक मोसमातील जबरदस्त कामगिरीच्या जोरावर बांगलादेश अ संघात निवडला गेला आणि त्यानंतर २०१४ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्याने कसोटी पदार्पण केले. पदार्पणातच त्याने पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. त्यानंतर जेव्हा २०१४-१५ मोसमात झिम्बाब्वेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आला तेव्हा त्याने ३९ धावांत ८ गडी बाद करून कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च कामगिती नोंदविली. त्यानंतर त्याने एकदिवसीय पदार्पण केले, आणि पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक घेतली. पदार्पणात हॅटट्रीक घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "तैजुलच्या पदार्पणातील हॅटट्रीकमुळे बांगलादेशचा ५-० असा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.