Jump to content

त्यागराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
त्यागराज
जन्म ४ मे १७६७ (1767-05-04)
तिरुवारूर, तंजावर जिल्हा, तमिळनाडू
मृत्यू ६ जानेवारी, १८४७ (वय ७९)
कार्यक्षेत्र संगीत
संगीत प्रकार कर्नाटक संगीत
प्रसिद्ध रचना पंचरत्‍न कृती
वडील काकर्ला रामब्रह्मम्‌
आई सीतम्मा


त्यागराज (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७) हे कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ, वीणावादक व गायक होते. त्यागराज, मुत्थुस्वामी दीक्षित आणि श्यामा शास्त्री या प्रख्यात त्रिमूर्तींपैकी ते ओळखले जातात. त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्यातील तिरुवारूर येथे झाला. ते रामभक्त आणि साधुवृत्तीचे श्रेष्ठ महापुरुष होते.

वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. लहानपणी ते घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने ते कापणी झालेल्या शेतांमधून पडलेले धान्याचे दाणे गोळा करून ते स्वतःचे, मोठ्या शिष्यशाखेचे आणि अतिथींचे चरितार्थ चालवीत असे.