Jump to content

रामचंद्र चितळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी. रामचंद्र (जन्म : पुणतांबा, १२ जानेवारी १९१८; - मुंबई, ५ जानेवारी १९८२) हे एक भारतीय चित्रपट संगीतकार होते. चित्रपटनिर्माते जयंत देसाई यांनी रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकरांना ‘सी रामचंद्र’ हे नाव दिले.

सी. रामचंद्र हे नागपूरच्या शंकरराव सप्रे यांचा गुणी शिष्य व पं. विनायकबुवा पटवर्धनांचे विद्यार्थी होते. त्यांनी मास्टर कृष्णरावांच्या गायकीचा एकलव्यासारखा अभ्यास केला होता. .

कारकिर्दीची सुरुवात[संपादन]

रामचंद्र चितळकरांना खरे तर नट व्हायचे होते. अभिनयाचे वेड घेऊन ते मुंबईत आले होते आणि नाईलाजाने सहकलाकार म्हणून स्थिरावले.. तेही काम मिळेनासे झाल्यावर ते थेट चित्रपट निर्माते सोहराब मोदींना भेटले. पडेल ते काम करायची त्यांनी तयारी दाखवली, तेव्हा मोदींनी चितळकरांना मीरसाहेब नावाच्या त्याकाळच्या सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाकडे पाठवले.

स्वरलिपी आणि गायन[संपादन]

मीरसाहेबांना स्वरलिपी येत नव्हती आणि गाताही येत नव्हते. त्यामुळे सुचलेली चाल लिहून ठेवता येत नव्हती आणि गायकांना गाऊनही दाखवता येत नव्हती. या दोन्ही गोष्टी चितळकरांना येत होत्या. त्यामुळे मीरसाहेब आपल्या नवीन साहाय्यकावर खुश झाले.

पाश्चात्त्य संगीताशी परिचय[संपादन]

मीरसाहेबांकडे असताना चितळकरांची ओळख पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवणाऱ्या ‘हूगन’ नावाच्या संगीत कलाकाराशी झाली. त्यांच्या संगतीने चितळकरांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती गाणी खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज अण्णांना त्यावेळी आला.

भगवानदादांशी संबंध[संपादन]

दिग्दर्शक मास्टर भगवान आबाजी पालव ऊर्फ भगवानदादा त्या काळात गल्लाभरू चित्रपट देणारे यशस्वी दिग्दर्शक समजले जात. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असत. असेच एकदा मद्रासला एक काम अडकल्याने मीरसाहेब भगवानना म्हणाले, 'आपण राम चितळकरला-अण्णांना बोलावून घेऊ. अण्णा ती सगळी कामे पटकन करतील...' नंतर अण्णा मद्रासला गेले आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून त्यांनी अडकलेले काम पुढे नेले. भगवानदादांना चितळकर खूप आवडले आणि त्या दोघांची मैत्री झाली.

सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले हिंदी चित्रपट[संपादन]

 • आझाद
 • अनारकली
 • अमर दीप
 • अमर रहे प्यार (१९६०)
 • अलबेला (१९५१)
 • आंचल (१९६०)
 • आशा (१९५७)
 • इन्सानियत (१९५५)
 • कवी
 • खज़ाना (१९५१)
 • घुंघरू (१९५२)
 • जिंदगी और मौत
 • झमेला (१९५३)
 • झांझर (१९५२)
 • डाक बंगला (१९४७)
 • तलाक़ (१९५८)
 • तुलसी विवाह (१९७१)
 • तूफानी टक्कर (१९७८)
 • दुनिया (१९४९)
 • नदिया के पार (१९४९)
 • नमूना (१९४९)
 • नवरंग
 • नादान
 • नास्तिक
 • निराला (१९५०)
 • नौशेरवान --ए-आदिल
 • पतंगा
 • परिचय
 • परछाइयॉं
 • पहेली झलक (१९५४)
 • पायल की झंकार (१९६५)
 • पैगाम
 • बहू रानी
 • बारिश
 • मीनार (१९५५)
 • यास्मिन
 • रूठाना करो (१९७०)
 • लीला (१९४८)
 • लुटेरा (१९५५)
 • शतरंज (१९५६)
 • शबिस्तान (१९५१)
 • शहनाई (१९४७)
 • शारदा
 • शिन शिनाकी बूबला बू
 • सगाई
 • संगीता (१९५०)
 • सफर (१९४६)
 • समाधी (१९५०)
 • सरगम (१९५०)
 • साजन (१९४८)
 • सिंदू (१९४७)
 • सुबह का तारा
 • स्त्री (१९६१)
 • हंगामा (१९५२)

सी. रामचंद्र याचे संगीत असलेली काही प्रसिद्ध गाणी (कंसात चित्रपटाचे नाव आणि गायक)[संपादन]

आत्मचरित्र[संपादन]

सी. रामचंद्र यांनी ‘माझ्या जीवनाची सरगम’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

चरित्र[संपादन]

 • हमना तुम्हे भुलायेंगे (सी. रामचंद्रांचे चरित्र; लेखिका : केतकी साळकर)