नारायण धोंडोपंत ताम्हनकर
नारायण धोंडोपंत ताम्हनकर (जन्म : ३१ ऑगस्ट १८९३; - ५ जानेवारी १९६१, नाशिक) हे मराठीतील कथा लेखक होते. त्याच्या कथेत मानवी जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन लेखन त्यांनी केले.
त्यांचे बालपण इचलकरंजी येथे गेले.[१] त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. काही काळ त्यांनी इचलकरंजीचे संस्थानिक नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे कारकून म्हणून नोकरी केली. 'ब्रह्मर्षि' ही लहानशी नाटिका ही त्यांची सर्वांत पहिली साहित्यकृती. या नाटिकेचा प्रयोगही हौशी मंडळींनी नारायणराव बाबासाहेब घोरपडे त्यांच्यासमोर सादर केला. ताम्हनकर यांच्या कलेला उत्तेजन देण्यसाठी घोरपडयांनी त्यांच्या हातात सोन्याचे कडे घातले.[२]
पुढे ते किर्लोस्करवाडी येथे वास्तव्यास गेले. किर्लोस्कर मासिकामध्ये उपसंपादक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. तिथून सेवा निवृत्त झाल्यावर नाशिक येथे गावकरीमध्ये त्यांनी लेखन केले.
मणि, अविक्षित, दाजी, अंकुश, मालगाडी (?), शामराई (कथा संग्रह: लेखक शामराव नीलकंठ ओक (हा उल्लेख पडताळून ही माहिती बरोबर निघाल्यास शामराई ही नोंद इथून काढावी ) , बहीणभाऊ ही पुस्तके, आणि किशोरवयीन मुलांसाठी गोट्या, चिंगी, नीलांगी, नारो महादेव, रत्नाकर आणि खडकावरला अंकुर ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत.
याशिवाय त्यांनी तिची कहाणी हा कविता संग्रह लिहिला.
ना.धों. ताम्हनकर यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अंकुश (बालवाङ्मय)
- अनेक आशीर्वाद
- उसना नवरा (या कथेवर मराठी चित्रपट निघाला)
- कुमार अविक्षित (बालवाङ्मय)
- गोट्या (भाग १ ते ५). या पुस्तकावर 'गोट्या' नावाची मराठी दूरचित्रवाणी मालिका सन १९८० च्या दशकात निघाली. त्यात गोट्याची भूमिका जाॅय घाणेकरने केली होती. सुहास भालेकर, सविता मालपेकर, सुमन धर्माधिकारी यांनीही या मालिकेत उत्तमोत्तम भूमिका साकारल्या होत्या.
'गोट्या'चा छोटेखानी ५६ पानी इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे.
- खडकावरला अंकुर (बालवाङ्मय)
- गुजाताई
- चकमकी : अवती भवतीच्या (रोजच्या जीवनातील द्विपात्री खुसखुशीत संवाद; सहलेखक - प्राचार्य गो.वि. कुलकर्णी). विशेष : या पुस्तकावर आधारलेला चकमकी नावाचा एकपात्री कार्यक्रम गो.वि. कुलकर्णी सादर करीत असत.
- चिंगी (बालवाङ्मय)
- तात्या
- दाजी : दोन भाग
- नवऱ्याला वेसण
- नव्याजुन्या
- नारो महादेव
- निवाडे
- नीलांगी (बालवाङ्मय)
- पाझर
- बच्चा नवरा
- बहीणभाऊ (मुलांसाठी प्रहसन)
- बोलघेवड्या
- मणि (बालवाङ्मय)
- माईची माया
- मामा
- रत्नाकर (बालवाङ्मय)
- वडिलांचे सेवेसी
- विदुषी
- विद्यामंदिरात
- सुंठसाखर
- सावटातले रोप