गोल्डन गेट ब्रिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोल्डन गेट ब्रिज

गोल्डन गेट पूल (इंग्लिश: Golden Gate Bridge) हा अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरामधील एक प्रसिद्ध पूल आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या आखातावर १९३७ साली बांधण्यात आलेला हा पूल सॅन फ्रान्सिस्को द्वीपकल्पाला उत्तर भागाशी जोडतो. गोल्डन गेट पूल सॅन फ्रान्सिस्कोच्या सर्वात ठळक खुणांपैकी एक आहे व लंडनच्या टॉवर ब्रिजसोबत जगातील सर्वात सुंदर व सर्वाधिक फोटो काढला जाणारा पूल असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.[१]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 37°49′11″N 122°28′43″W / 37.81972°N 122.47861°W / 37.81972; -122.47861