अंटार्क्टिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंटार्क्टिकाचे पृथ्वीवरील स्थान
Tangra Mountains

अंटार्क्टिका (रोमन लिपी: Antarctica ;) हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे.

शोध[संपादन]

अंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक याने १७७२ मधे लावला. त्याच सुमारास ७ जानेवारी १८२० या दिनी प्रथमच बेलिग्ज हाऊजेन या दर्यावर्द्याने ५० किलोमीटर अंतरावरून बर्फाच्या डोंगरांची रांग पाहिली आणि त्याची विस्तृत माहिती जहाजाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली. म्हणून त्या दिवशी या खंडाचा शोध लागला असे मानले जाते.

भूगोल[संपादन]

अंटार्क्टिका खंड गोलाकार असून त्याचा एक उपखंड आहे. उपखंडाचे तापमान अंटार्क्टिका खंडाप्रमाणे अतिशय थंड नाही. याच उपखंडापासून अंटार्क्टिका अन्य भूखंडांपेक्षा जवळ पडतो. अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, ऑस्ट्रेलिया अडीच हजार किलोमीटर, आफ्रिका चार हजार किलोमीटर आणि भारत बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे. अंटार्क्टिक्याचा तट हा समुद्र किनाऱ्यापासून सुमारे १०० मीटर उंच आहे. दक्षिण ध्रुवाजवळचे पठार अंदाजे ३००० मीटर उंचीवर आहे.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://spardhamantra.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/ येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य
 प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.हा सर्व खंडापेक्षा सर्वात जास्त थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वसाधारण सर्वात जास्त उंचावर असणारा खंड आहे. १४.४२५ दशलक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा युरोप व ओशेनिया नंतरचा तिसरा सर्वात लहान खंड आहे. याचा ९८% पृष्ठभाग हा र्बफाच्छादित आहे. रशियन एफ. जी. वानबेलिंग्श्वासेन इंग्रज एडर्वड ब्रान्सफिल्ड व अमेरिकन नाथानियल पामर यांची १८२० मध्ये सर्व प्रथम अंटार्क्टिका बघितल्याचा दावा. इ. स. १७६०ते १९०० पर्यंतचा काळ अंंटंार्क्िटका व त्याजवळच्या भागाचा समुद्राच्या संशोधन मोहिमांनी गाजला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अंटार्क्टिकाच्या मोहिमेच्या सुवर्णकाळात रॉर्बट स्कार्ट स्कॉट व नंतर अर्नेस्ट शाकलेटन यांनी आतापर्यंत मोहिमा केल्या. रॉल्ड अ‍ॅमुडसन डिसेंबर १९११ मध्ये दक्षिण धृवावर पोहोचला. १९१२ मध्ये स्कॉटसुध्दा पोहोचला. सात राष्ट्रांनी खंडावरील भागांवर दावा केला. इतर राष्ट्रांनीसुध्दा मोहिमा केल्या. १९५७-५८ मध्ये १२ राष्ट्रांनी संयुक्त अभ्यांसाकरिता ५० स्थानके निर्माण केलीत. १९६१ मध्ये झालेल्या करारानुसार अंटार्क्टिकाला अराजनैतिक वैज्ञानिक अभ्यासाकरिता राखून ठेवण्यात आले. १९९१ मधील करारानुसार खनिज उत्खननावर नेहमीकरिता बंदी. पृथ्वीच्या दक्षिण धृवाभोवती एक अफाट पसरलेली भूमी आहे. हेच अंटार्क्टिका खंड होय. अगदी काल-परवापर्यंत जगाला या सातव्या खंडाची माहिती नव्हती. सन १७७४ साली कॅप्टन कुक याने या खंडाबद्दल जगाला सांगितले. पुढे १४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरीक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला आणि येथून पुढे या नव्या खंडाबाबत संशोधन सुरूच झाले. भारताने सुध्दा आपले कायमस्वरूपी संशोधन केंद्र तेथे उभारले असून त्या केंद्राला आपण 'दक्षिण गंगोत्री' हे नाव दिले आहे. जगातील प्रगत देशांनी येथेही आपली सज्ञ्ल्त्;ाा स्थापण्याचा मनसुबा रचला. पण मग साम्राज्य विस्तारासाठी युध्दे करावी लागतील. तिसरे महायुध्द कुणालाच नको आहे. त्यामुळे ३२ राष्ट्रांनी एकत्र येऊन एक तह केला. तोच 'अंटार्क्टिक ट्रीटी' होय. यात आपणही सहभाही आहोत. या तहानूसार, अंटार्क्टिका खंडावर कोणताही देश मालकीहक्क सांगू शकत नाही. तर तेथे केवळ शांततापूर्ण संशोधन करू शकतो. मात्र संशोधन करीत असता येथील पर्यावरणाचा नाश होणार नाही. वातावरण दूषित होणार नाही याची काळजी सभासद देशांनी घ्यायची आहे वगैरे वगैरे.


भूशास्त्रीय माहिती[संपादन]

या खंडावर जो सर्वात उंच पर्वत आहे, त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ४९०० मीटर (सुमारे १६,००० फूट) एवढीच आहे.

हवामान[संपादन]

अंटार्क्टिका दक्षिण गोलार्धात असल्याने भारतात जेव्हा उन्हाळा असतो; तेव्हा अंटार्क्टिक्यावर हिवाळा असतो. उन्हाळयात समुद्रकिनारी भागांमध्ये तापमान शून्याच्या खाली -५ डिग्री सेंटिग्रेड ते -१० डिग्री सेंटिग्रेड असते. हिवाळयात समुद्रकिनाऱ्यावरचे तापमान -४० ते -५० डिग्री सेंटिग्रेडपर्यंत खाली जाते. दक्षिण ध्रुवाच्या पठारावर -७० डिग्री सेंटिग्रेड ते -८० डिग्री सेंटिग्रेड इतकेही ते खाली जाते. अंटार्क्टिक्याच्या दक्षिण ध्रुवीय पठारावर कमीत कमी तापमानाची नोंद, इ.स. १९८३ साली, रशियन स्टेशन ‘वास्तोक’ येथे -८९.६८ डिग्री सेंटिग्रेड इतकी झाली आहे. अंटार्क्टिका हा जगातल्या कोणत्याही अन्य वाळवंटी भागांपेक्षा अत्यंत रूक्ष आहे.

लोकसंख्या[संपादन]

अंटार्क्टिक्यावर कायमस्वरूपी राहणार्‍या व्यक्तींची संख्या शून्य आहे. अनेक राष्ट्रांच्या प्रयोगशाळांत ८०० ते ९०० शास्त्रज्ञ निरनिराळ्या देशातून शास्त्रीय संशोधनासाठी येतात

आंतरराष्ट्रीय राजकारण[संपादन]

दक्षिण ध्रुवावर कोणत्याही एका देशाचा मालकी हक्क नाही किंवा कोणत्याही विशिष्ट देशासाठी तो विभागला गेलेला नाही, असे मानले जाते. तरीही समुद्रावरील मालकीनुसार या खंडाचे भाग पाडले गेले आहेत.

अर्थशास्त्र[संपादन]

जगातील ९० टक्के बर्फाचा आणि ७० टक्के पाण्याचा साठा दक्षिण ध्रुवावर आहे. शिवाय, या खंडाखाली पेट्रोलियमचे साठे आढळले आहेत.

संशोधन[संपादन]

भारतीय संशोधन[संपादन]

जानेवारी ९ इ.स. १९८२ साली भारताच्या पहिल्या मोहिमेतील सदस्यांनी अंटार्टिक्यावर प्रथमच भारताचा झेंडा फडकवला. इ.स. १९८३ मध्ये कर्नल सत्यस्वरूप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण गंगोत्री हे कायमस्वरूपी स्थानक बांधले. तेव्हापासून या स्थानकावर वर्षभर राहण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. येथे केलेले संशोधन सायंटिफिक कमिटी फॉर अंटार्क्टिक रिसर्च (इंग्लिश: Scientific Committee for Antarctic Research; लघुरूप: SCAR, एस.सी.ए.आर. ;) या संस्थेला पाठवले जाते व तेथून ते सर्व राष्ट्रांना जाते. भारत हा अंटार्क्टिका येथे पोहोचलेला जगातील १३ वा देश आहे. त्यामुळे भारताला अंटार्क्टिकासंबंधित सल्लामसलतीचा हक्क मिळाला आहे. दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र बंद करण्यात आलेले असून, इ.स. 1989 मध्ये मैत्री या कायमस्वरुपी स्थानक बांधण्यात आलेले आहे.

Antarctic philately
Antarctic base

बाह्य दुवे[संपादन]


  • संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले