ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१७
Flag of Bangladesh.svg
बांगलादेश
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख २२ ऑगस्ट – ८ सप्टेंबर २०१७
संघनायक मुशफिकुर रहिम स्टीव्ह स्मिथ
कसोटी मालिका
सर्वाधिक धावा तमिम इक्बाल (१७०) डेव्हिड वॉर्नर (२५१)
सर्वाधिक बळी शकिब अल हसन (१२) नेथन ल्योन (२२)
मालिकावीर डेव्हिड वॉर्नर आणि नेथन ल्योन (ऑ)

ऑगस्ट आणि सप्टेंबर २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१] २०११ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा पहिलाच बांगलादेश दौरा होता.[२] बांगलादेशने पहिल्या कसोटीत २० धावांनी विजय मिळवला, हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलाच कसोटी विजय.[३] या विजयानंतर बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहिम म्हणाला की, "ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करणे हा एक खूप चांगला अनुभव आहे, आणि मला वाटते की सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला".[४] ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला, "मला वाटते की, खासकरून घरच्या मैदानावर त्यांचा संघ धोकादायक आहे".[५] ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला, त्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.[६]

ऑस्ट्रेलियाचा मूलतः सप्टेंबर २०१५ मध्ये बांगलादेशचा दौरा प्रस्तावित होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव तो रद्द करण्यात आला.[७][८] ऑक्टोबर २०१६ मधील इंग्लंडच्या बांगलादेश दौर्‍यानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड म्हणाले ऑस्ट्रेलियाची बांगलादेशमध्ये खेळण्याची शक्यता "खूप जास्त" आहे.[९] एप्रिल 2२०१७ मध्ये, दोघे सीए आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) या दौऱ्यासाठीच्या सामन्यांसंदर्भात चर्चा करत होते.[१०] बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निजामुद्दीन चौधरी, म्हणाले की ते आता "क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत वेळापत्रक आणि अन्य तपशीलांवर काम करीत आहेत".[११] मे २०१७ मध्ये सुरक्षेबाबत तपासणी झाली.[२] त्यानंतर त्याच महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बांगलादेश दौर्‍याची व्यवस्था निश्चित करण्यासाठी एक सुरक्षा दल पाठवले.[१२]

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन (एसीए) यांच्या प्रतिनिधींनी नियोजित दौर्‍याआधी २४ जुलै २०१७ रोजी सुरक्षितता दौरा केला."बांगलादेश दौर्‍याच्या अपेक्षा अजूनही जास्त". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. </ref> तथापि, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू, सीए आणि एसीए यांच्यातील वेतन विवाद आणि बीसीबीला दौरा होण्याची शक्यता असल्याची माहिती याबाबत प्रगती होत नव्हती.[१३] त्याआधी जुलैमध्ये, ऑस्ट्रेलिया अ क्रिकेट संघाने वादग्रस्त कारणाने दक्षिण आफ्रिकेतील त्रिकोणीय मालिका स्पर्धेतून बाहेर काढले होते.[१४] ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाने म्हटले आहे की, मालिका सुरू होण्यापूर्वी डार्विनमधील प्रशिक्षण शिबिरaमध्ये ते उपस्थित राहणार आहेत, परंतु वेतनाबाबतचा वाद संपल्याशिवाय ते बांगलादेशला जाणार नाहीत.[१५] १ ऑगस्ट २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला की वेतनवाढीच्या प्रगती होत आहे, पण त्याला दौरा सुरू होण्याआधी अंतिम स्वरूप देणे आवश्यक आहे.[१६] दुसर्‍याच दिवशी, वेतन-विवादावर तोडगा निघाल्याने, कसोटी मालिका ठरल्याप्रमाणे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला.[१७][१८] १८ ऑगस्ट २०१७ रोजी कडेकोट सुरक्षेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेशमध्ये पोहोचला.[१९]

दौरा सुरू होण्याआधी, एका सराव सामन्याचे ठीकाण खान शाहब उस्मान अली मैदानावर पाणी साचले होते.[२०] मैदान वेळेत तयार नसल्यास बीसीबीने दोन वैकल्पिक स्थळांवर सामना खेळवण्याची तयारी केली होती.[२०] परंतू, सामना सुरु होण्याच्या एक दिवस आधी, पाणी साचल्याने सामना रद्द करण्या आला.[२१]

संघ[संपादन]

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[२२] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[२३]

सराव सामना: बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI v ऑस्ट्रेलिया[संपादन]

२२–२३ ऑगस्ट २०१७
धावफलक
बांगलादेश क्रिकेट बोर्ड बांगलादेश
वि
 • मैदानावर पाणी साचल्याने सामना रद्द.[२१]


कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२७–३१ ऑगस्ट २०१७
धावफलक
वि
२६० (७८.५ षटके)
शकिब अल हसन ८४ (१३३)
अ‍ॅश्टन अ‍ॅगर ३/४६ (१२.५ षटके)
२१७ (७४.५ षटके)
मॅट रेनशॉ ४५ (९४)
शकिब अल हसन ५/६८ (२५.५ षटके)
२२१ (७९.३ षटके)
तमिम इक्बाल ७८ (१५५)
नेथन ल्योन ६/८२ (३४.३ षटके)
२४४ (७०.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर ११२ (१३५)
शकिब अल हसन ५/८५ (२८ षटके)
बांगलादेश २० धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अलीम दार (पा) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: शकिब अल हसन (बां)


२री कसोटी[संपादन]

४–८ सप्टेंबर २०१७
धावफलक
वि
३०५ (११३.२ षटके)
मुशफिकुर रहिम ६८ (१६६)
नेथन ल्योन ७/९४ (३६.२ षटके)
३७७ (११९.५ षटके)
डेव्हिड वॉर्नर १२३ (३६२)
मुस्तफिजुर रहमान ४/८४ (२०.५ षटके)
१५७ (७१.२ षटके)
मुशफिकुर रहिम ३१ (१०३)
नेथन ल्योन ६/६० (३३ षटके)
८७/३ (१५.३ षटके)
ग्लेन मॅक्सवेल २५* (१७)
मुस्तफिजुर रहमान १/१६ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
झोहुर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम
पंच: इयान गोल्ड (इं) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: नेथन ल्योन (ऑ)
 • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
 • पावसामुळे तिसर्‍या दिवशी दुपारच्या जेवणाआधी खेळ होवू शकला नाही.
 • नेथन ल्योनने सामन्यात १५४ धावांमध्ये १३ बळी घेतले. ही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची आशियामधील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.[३१]
 • नेथन ल्योनने दोन कसोटी सामन्यात २२ बळी घेऊन २-कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजातर्फे विक्रम प्रस्थापित केला.[३२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ अफगाणिस्तान आणि आयर्लंडला कसोटी दर्जा मिळाल्या नंतर एकूण बारा संघांना कसोटी दर्जा आहे. ह्या संघांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही.


 1. ^ "बांगलादेश दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम संघ जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 2. a b "ऑस्ट्रेलियाच्या बांगलादेश दौर्‍याला अजूनही सुरक्षा मंजूरीची प्रतिक्षा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 3. a b "बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला ऐतिहासिक कसोटी विजय". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 4. ^ "बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयात शकिब चमकला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 5. ^ "'बांगलादेश घरच्या मैदानावर धोकादायक' - स्मिथ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 6. ^ "ल्योन, वॉर्नरची मालिका वाचवणारी विजयी खेळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 7. ^ "ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दौरा पुढे ढकलला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 8. ^ "सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा दौरा पुढे ढकलला". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 9. ^ "सीए बॉस फ्लॅग्स बांगलादेश टूर इन २०१७". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 10. ^ "सीए, बीसीबी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संभाव्य दौर्‍याच्या वेळा आणि खेळाच्या स्वरुपाबाबत चर्चा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 11. ^ "ऑस्ट्रेलिया एजेस क्लोजर टू बांगलादेश टूर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 12. ^ "क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सुरक्षादल पुढच्या आठवड्यात बांगलादेश दौरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १६ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 13. ^ "सीए-एसीए एमओयू कॉम्प्रोमाईज फॉल्स ओव्हर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 14. ^ "ऑस्ट्रेलिया अ दौर्‍यातून खेळाडूंची माघार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 15. ^ "करार बारगळल्याने बांगलादेश कसोटी प्रकाशझोतात". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 16. ^ "वेतन करार झाल्याशिवाय खेळाडू बांगलादेश दौरा करणार नाही - कर्णधार स्टीव्ह स्मिथ". चॅनेल ९ (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 17. ^ "क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंदरम्यान अखेर वेतन करार सफल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). २ ऑगस्ट २०१७ रोजी पाहिले. 
 18. ^ "सीए आणि एसीए दरम्यान अखेर सहमती, खेळाडूंच्या वेतनासंदर्भातील विवाद मिटला". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 19. ^ "कडेकोट बंदोबस्तात ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशमध्ये". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 20. a b "जलमय फतुल्लाह मैदान ऑस्ट्रेलियाच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 21. a b "ऑस्ट्रेलियाचा एकमेव सरावसामना जलमय मैदानामुळे रद्द". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 22. ^ "कसोटी संघातून महमुदुल्ला, मोमिनुल बाहेर; नासिरचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 23. ^ "दुखापतग्रस्त स्टार्क बांगलादेश कसोटीमधून बाहेर, ओ'कीफेला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 24. ^ "बांगलादेश दौर्‍यासाठी स्वेप्सनला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 25. ^ "बांगलादेश दौर्‍यासाठी पॅटिन्सनच्या जागी बर्ड". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 26. ^ "बांगलादेश कसोटी संघात मोमिनुलचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 27. ^ "हेजलवूडच्या जागी ओ'कीफला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 28. ^ कव्हरडेल, ब्रेडन (२७ ऑगस्ट २०१७). "टीम सेट टू रिन्यू टेस्ट वूव्ज आफ्टर ११ इयर्स" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 29. ^ ब्रेट्टीग, डॅनिएल (२८ ऑगस्ट २०१७). "ल्योनच्या चिकाटीने त्याच्या पुढे फक्त वॉर्न" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. १७ ऑक्टोबर २०१७ रोजी पाहिले. 
 30. ^ "शकिबच्या पाच बळींनंतर बांगलादेशची कसोटीवर पकड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). १७ ऑक्टबर २०१७ रोजी पाहिले. 
 31. ^ "ल्योन टेम्स टायगर्स, ऑसिज स्प्लिट सिरीज" (इंग्रजी मजकूर). क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ७ सप्टेंबर २०१७. १७ ऑक्टबर २०१७ रोजी पाहिले. 
 32. ^ "लेथल ल्योन रिराईट्स १३०-इयर-ओल्ड रेकॉर्ड" (इंग्रजी मजकूर). क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ७ सप्टेंबर २०१७. १७ ऑक्टबर २०१७ रोजी पाहिले. 


बाह्यदुवे[संपादन]