मार्च ५
Appearance
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]अकरावे शतक
[संपादन]- १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.
सतरावे शतक
[संपादन]- १६६६ - छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८२४ - युनायटेड किंग्डमने बर्माविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८५१ - जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना झाली.
विसावे शतक
[संपादन]- १९०२ - तीन दिवसांत १,००,००० सैनिक गमावल्यावर रशियाने मांचुरियातून माघार घेतली.
- १९२४ - शफकेत व्हेलार्सी आल्बेनियाच्या पंतप्रधानपदी.
- १९३१ - महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करार करार झाला.
- १९३१ - डॅनियेल सालामांका उरे उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९३३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने देशातील सगळ्या बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली.
- १९४० - सोवियेत पॉलिटब्युरोने पोलंडच्या १४,७०० युद्धकैद्यांसह २५,७०० पोलिश बुद्धीजीवींची हत्या करण्याचा आदेश मंजूर केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रुह्रची लढाई सुरू.
- १९६४ - श्रीलंकेत आणीबाणी.
- १९६६ - म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारने ताब्यात घेतला.
- १९६८ - मार्टिन लुथर किंग यांची हत्या
- १९८३ - बॉब हॉक ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९८८ - टर्क्स व कैकोस द्वीपांनी आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.
- १९९८ - रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरून मृत्यू.
- २००० - कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प देशाला समर्पित.
- २००८ - महाराष्ट्राचे राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- २००८ - भारताने समुद्रावरून जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्राह्मोस मिसाइलचे सफल परीक्षण केले.
- २०१७ - एर इंडियाच्या संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी चालविलेल्या विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घातली.
जन्म
[संपादन]- ११३३ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १३२४ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५१२ - जेरार्डस मर्केटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.
- १८९८ - चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१० - श्रीपाद वामन काळे, मराठी संपादक.
- १९१३ - गंगुबाई हनगळ, किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका.
- १९१६ - बिजू पटनायक, ओरिसाचे मुखमंत्री.
- १९२५ - वसंत साठे, ५, ६, ७, ८, ९व्या लोकसभेचे सदस्य.
- १९३७ - ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.
- १९५९ - शिवराज सिंह चौहान, भारतीय जनता पार्टीनेता.
मृत्यू
[संपादन]- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
- १८१५ - फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.
- १८२७ - पिएर-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२७ - अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१४ - शांताराम अनंत देसाई, मराठी नाटककार, समीक्षक.
- १९५३ - जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९५५ - अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ - पॅट्सी क्लाइन, अमेरिकन गायिका.
- १९६६ - शंकरराव मोरे, साम्यवादी नेता.
- १९६८ - नारायण गोविंद चाफेकर, मराठी समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार.
- १९८५ - पु.ग. सहस्रबुद्धे, महाराष्ट्र संस्कृतीकार.
- १९८५ - देविदास दत्तात्रय वाडेकर, तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक.
- १९८९ - बाबा पृथ्वीसिंग आझाद, गदर पार्टीचे एक स्थापक.
- १९९५ - जलाल आगा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- २०१० - जी.पी. बिर्ला, भारतीय उद्योजक.
- २०१७ - पी. शिवशंकर, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील न्यायाधीश, केंद्रीय कायदामंत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - (मार्च महिना)