जेरार्डस मर्केटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जेरार्डस मर्केटर

जेरार्डस मर्केटर (मराठी नामभेद: गेरहार्ड मर्केटर; रोमन लिपी: Gerardus Mercator) (५ मार्च, इ.स. १५१२ - २ डिसेंबर, इ.स. १५९४) हा एक फ्लेमिश नकाशाकार होता. जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.

कामगिरी[संपादन]

    सोळाव्या शतकातील जेरार्डस मर्केटर हा जगाचा नकाशा बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या मुळे युरोपियन शोध मोहिमांना गती मिळाली.
    गेरहार्ड मर्केटर याने इ.स. १५४१ साली पृथ्वीचा पहिला गोल तयार केला. इ.स. १५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपचा मोठा नकाशा तयार केला. इ.स. १५६९ साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला.  मर्केटरने नकाशा बनवताना त्यात समांतर रेषांचा वापर केला होता त्यामुळे दोन्ही दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे रेखांशातील अंतर वाढत गेल्याने होणारा फरक भरुन काढण्यासाठी मर्केटरने त्या प्रदेशातील अक्षवृत्तांमधील अंतरही वाढवले. त्यामुळे नकाशातील प्रदेशांचे क्षेत्र जरी बदलले असले तरी दिशा आणि आकार यात काहीही फरक पडला नाही आणि मर्केटरच्या नकाशात अधिक अचूकता आली.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.