Jump to content

नायजेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नायजेरिया
Federal Republic of Nigeria
Jamhuriyar Taraiyar Nijeriya (हौसा)
Ọ̀hàńjíkọ̀ Ọ̀hànézè Naìjíríyà (इग्बो)
Orílẹ̀-èdè Olómìnira Àpapọ̀ Nàìjíríà (योरुबा)
नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक
नायजेरियाचा ध्वज नायजेरियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity and Faith, Peace and Progress" (एकता आणि श्रद्धा, शांतता आणि प्रगती)
राष्ट्रगीत: Arise, O Compatriots
नायजेरियाचे स्थान
नायजेरियाचे स्थान
नायजेरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अबुजा
सर्वात मोठे शहर लागोस
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा हौसा, इग्बो, योरुबा
 - राष्ट्रप्रमुख मुहम्मदू बुहारी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ब्रिटनपासून
ऑक्टोबर १, १९६० 
 - प्रजासत्ताक दिन ऑक्टोबर १, १९६३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९,२३,७६८ किमी (३२वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४
लोकसंख्या
 -एकूण १७,४५,०७,५३९ (७वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १८८.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.१०९ लाख कोटी अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ६,२०४ अमेरिकन डॉलर (१२५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.५०४ (कमी) (१५२ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन नायजेरियन नाइरा (NGN)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम आफ्रिकन प्रमाणवेळ (WAT) (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ NG
आंतरजाल प्रत्यय .ng
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २३४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक हा आफ्रिकेतील एक देश आहे. नायरजेरियाच्या उत्तरेला नायजर, पश्चिमेला बेनिन, पूर्वेला कामेरून हे देश तर दक्षिणेला अटलांटिक महासागराचा गिनीचे आखात हा उपसमुद्र आहे. आहेत. अबुजा ही नायरजेरियाची राजधानी तर लागोस हे सर्वात मोठे शहर आहे.

१९व्या शतकापासून ब्रिटिश साम्राज्याची वसाहत राहिलेल्या नायजेरियाला १९१४ साली उत्तरदक्षिण भाग एकत्रित करून एकसंध बनवण्यात आले. १ ऑक्टोबर १९६० रोजी नायजेरियाला स्वातंत्र्य मिळाले व तीन वर्षांनंतर नायजेरिया प्रजासत्ताक बनला. १९६७ ते १९७० दरम्यान येथे गृहयुद्ध चालू होते. स्वातंत्र्यानंतर आजवर नायजेरियामध्ये आलटून पालटून लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे व लष्करी राजवटी सत्तेवर राहिल्या आहेत. ओलुसेगुन ओबासान्जो हा लष्करी अधिकारी १९७६ ते १९७९ व १९९८ ते २००७ दरम्यान नायजेरियाचा राष्ट्रप्रमुख राहिला आहे. सध्या नायजेरिया संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल परिषद, आफ्रिकन संघ, ओपेक इत्यादी अनेक महत्त्वाच्या जागतिक संघटनांचा सदस्य आहे.

२०१३ साली सुमारे १७.४ कोटी इतकी लोकसंख्या असलेला नायजेरिया आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा तर जगातील सातव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे. १ लाख कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी आर्थिक उलाढाल असलेली नायजेरियाची अर्थव्यवस्था २०१४ साली दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून आफ्रिकेमध्ये पहिल्या स्थानावर तर जगात विसाव्या स्थानावर पोचली. अमेरिकेमधील एका संस्थेने तयार केलेल्या मिंट (MINT): मेक्सिको, इंडोनेशिया, नायजेरिया व तुर्कस्तान) ह्या ब्रिक्स सारख्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या जगातील राष्ट्रांच्या यादीत नायजेरियाचा समावेश केला गेला आहे. खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये जगात १२व्या क्रमांकावर असलेल्या नायजेरियाची अर्थव्यवस्था तेल उद्योगकृषीवर अवलंबून आहे.

२००२ सालापासून बोको हराम नावाची इस्लामी अतिरेकी संघटना नायजेरियाच्या उत्तर भागात थैमान घालत आहे. आजवर बोको हरामने केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे १२,००० लोक बळी पडल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

इतिहास

[संपादन]

नायजेरियातील बायाजीद्दा दंतकथेनुसार बगदादहून आलेल्या बायाजीद्दा या वीर पुरुषाने दौरा गावातील विहिरीपाशी एका सापाला मारले आणि मागाजीया दौरामा या स्थानिक राणीशी लग्न केले. बायाजीद्दच्या लग्नानंतर तिथली स्त्रीसत्ताक राज्य पद्धती संपुष्टात आली. बायाजीद्दाला राणी पासून बावो नावाचा मुलगा झाला. राणीची दासी बाग्वारीया हिच्यापासून कारबागरी हा मुलगा झाला. या दोन्ही मुलांच्या वंशजांनी अनेक हौसा राज्ये स्थापन केली. नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत ही हौसा राज्ये शिखरावर होती. चामडे, गुलाम, सोने, कापड, मीठ, मेहेंदी अशा वस्तूंचा व्यापार हे हौसा राज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते.१८०४ च्या सुमारास मुस्लिम धर्मीय फुलानी जमातीच्या आक्रमकांनी हौसा राज्ये नष्ट केली.

नायजर नदीच्या पश्चिम भागावर योरुबा जमातीचे प्राबल्य होते. साधारण दोन हजार वर्षांचा इतिहास सांगणारी ही जमात घाना देशापासून नायजेरिया पर्यंत पसरली आहे. विविध नगर राज्यांनि योरुबा जमत विभागली होती त्यामुळे कुणी एक राजा असण्यापेक्षा स्थानिक बाहुबलींच्या जोरावर नगराचा कारभार चालायचा.नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

फ्रेडरिक लुगार्द या ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी फ्लोरा शॉ हिने नायजर नदी वाहते म्हणून या प्रदेशाचे नाव नायजेरिया असे ठेवले. ब्रिटिश मालकीच्या रॉयल नायजर टेरीटरीज कंपनीच्या आधिपत्याखालील प्रदेशाला एवढ्या लांबलचक नावाने संबोधणे अवघड आहे म्हणून 'नायजेरिया' अशा छोट्या आणि सुटसुटीत नावाचा वापर या भूप्रदेशाचा उल्लेख करताना केला जावा असे मत फ्लोरा शॉ हिने ८ जानेवारी १८९७ मध्ये लंडनच्या टाइम्स या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात केला होता.

प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन]

चार्ल्स थर्स्टन शॉ या पुरातत्त्व्वेत्त्याच्या इग्बो उक्वू, न्सुक्का या ठिकाणावरील संशोधनानुसार नायजेरिया मध्ये सुमारे एक लाख वर्षापूर्वीपासून मानवी वस्तीच्या खुणा आढळतात. पश्चिम नायजेरिया येथील इवो एलेरू येथे सापडलेला सर्वात पुरातन मानवी सांगाडा साधारण १३००० वर्षापूर्वीचा आहे.

इसवीसनाच्या नवव्या शतकात इग्बो प्रदेशात इग्बो जमातीच्या लोकांनी प्रगत अशी वसाहत स्थापन केली होती या प्रदेशातील ब्रॉंझ धातूच्या नमुन्यावरून तत्कालीन लोक इतर समकालीन वसाहतीपेक्षा अधिक सुधारलेले होते असे धातुकामावरून जाणवते.

भूगोल

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

पश्चिम आफ्रिकेतील प्रचंड लोकसंख्या असलेला हा देश पश्चिमेला बेनीन, पूर्वेला चाड आणि कॅमेरून, उत्तरेला नायजर आणि दक्षिणेला अटलांटिक समुद्राने वेढलेला आहे.

राजकीय विभाग

[संपादन]

नायजेरिया देश एकूण ३६ राज्ये व एक संघशासित क्षेत्रामध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

[संपादन]
प्रमुख शहरे
शहर लोकसंख्या
लागोस &0000000013400000.000000१,३४,००,०००
कानो &0000000003626068.000000३६,२६,०६८
अबुजा &0000000003000000.000000३०,००,०००
इबादान &0000000002550593.000000२५,५०,५९३
कादुना &0000000001652844.000000१६,५२,८४४
पोर्ट हार्कोर्ट &0000000001320214.000000१३,२०,२१४
अबा &0000000001300000.000000१३,००,०००
ओग्बोमोशो &0000000001200000.000000१२,००,०००
मैदुगुरी &0000000001197497.000000११,९७,४९७
बेनिन सिटी &0000000001147188.000000११,४७,१८८

समाजव्यवस्था

[संपादन]

नायजेरियामध्ये हौसा, योरुबा आणि इग्बो अश्या तीन प्रमुख जमाती आढळतात. या पैकी योरुबा आणि इग्बो जमातींमधील लोक ख्रिस्ती धर्माचे तर हौसा जमत प्रामुख्याने इस्लाम धर्माचे पालन करतात. ख्रिस्ती धार्मिक लोकांची संख्या पश्चिम आणि दक्षिणेत जास्ती आहे. हौसा जमातीचे आणि इस्लामचे प्राबल्य उत्तर आणि पूर्व भागात आहे.


वस्तीविभागणी

[संपादन]

=धर्म

[संपादन]

नाय्जेरिया हा मुस्लिम् बहुल् देश् आहे. इस्लाम् हा या देशाचा प्रमुख् धर्म् आहे येथिल् बहुसन्ख्य लोक्सन्ख्या ही मुस्लिम् आहे .

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

अर्थतंत्र

[संपादन]

फुटबॉल हा नायजेरियामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून नायजेरिया फुटबॉल संघ आफ्रिकेमधील सर्वात बलाढ्य राष्ट्रीय संघांपैकी एक मानला जातो. नायजेरियाने आफ्रिकन देशांचा चषक १९८०, १९९४ व २०१३ ह्या तीन वेळा जिंकला आहे तर आजवर ५ वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. एप्रिल १९९४ मध्ये नायजेरियाने फिफा जागतिक क्रमवारीमध्ये पाचवा क्रमांक गाठला होता. न्वान्को कानू हा नाजयेरियन फुटबॉल खेळाडू युरोपामधील ए.एफ.सी. एयाक्स, आर्सेनल, इंटर मिलान इत्यादी प्रतिष्ठेच्या क्लबांसाठी खेळला आहे.

१९९६ अटलांटा स्पर्धेत नायजेरियन फुटबॉल संघाने आर्जेन्टिनाला हरवून सुवर्णपदक मिळवले होते. ऑलिंपिक खेळात नायजेरियाने आजवर २३ पदके मिळवली आहेत.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: