मार्च ५
(५ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
<< | मार्च २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.
ठळक घटना[संपादन]
अकरावे शतक[संपादन]
- १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.
सोळावे शतक
- १५५८ - फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.
सतरावे शतक
- १६६६ - छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८२४ - युनायटेड किंग्डमने बर्माविरुद्ध युद्ध पुकारले.
- १८५१ - जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
विसावे शतक[संपादन]
- १९०२ - तीन दिवसांत १,००,००० सैनिक गमावल्यावर रशियाने मांचुरियातून माघार घेतली.
- १९२४ - शफकेत व्हेलार्सी आल्बेनियाच्या पंतप्रधानपदी.
- १९३१ - महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करार करार झाला.
- १९३१ - डॅनियेल सालामांका उरे उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९३३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने देशातील सगळ्या बॅंका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली.
- १९४० - सोवियेत पॉलिटब्युरोने पोलंडच्या १४,७०० युद्धकैद्यांसह २५,७०० पोलिश बुद्धीजीवींची हत्या करण्याचा आदेश मंजूर केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रुह्रची लढाई सुरू.
- १९६४ - श्रीलंकेत आणीबाणी.
- १९६६ - म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
- १९६८ - मार्टिन लूथर किंग यांची हत्या
- १९८३ - बॉब हॉक ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९८८ - टर्क्स व कैकोस द्वीपांनी आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.
- १९९७ - भारत आणि तेरा इतर देशांनी मिळून इंडियन ओशन रिम एसोसियेशन संघाची घोषणा केली
- १९९७ - संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
- १९९७ - धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
- १९९८ - रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.
- २००० - कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
- २००८ - महाराष्ट्राचे राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला
- २००८ -भारताने समुद्रावरुन ज़मीनीवर हल्ला करणारे 'ब्रह्मोस' मिसाइलचे सफल परीक्षण केले
- २०१७- भारताची सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या महिला कर्मचार्यांनी अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एअर इंडियाच्या संपूर्ण महिला चालक दल असलेल्या विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम नोंदवला.
जन्म[संपादन]
- ११३३ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १३२४ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५१२ - जेरार्डस मर्केटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.
- १८९८ - चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१० - संपादक श्रीपाद वामन काळे
- १९१३ -: किरण घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगुबाई हनगळ
- १९१६ -: ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी बिजू पटनायक
- १९२५ - वसंत साठे -पाचवी, सहावी, सातवी आठवी व नववी लोकसभेचे सदस्य
- १९३४ - सोम ठाकुर - मुक्तक, ब्रजभाषेचे छंद आणि बेमिसाल लोक गीतांचे वरिष्ठ आणि लोकप्रिय रचनाकार
- १९३७ - ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.
- १९५९ - शिवराज सिंह चौहान - 'भारतीय जनता पार्टी' चे वरिष्ठ नेता तसेच 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे' समर्पित कार्यकर्ता
- १९७४: अभिनेता हितेन तेजवानी
मृत्यू[संपादन]
- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
- १८१५ - फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.
- १८२७ - पिएर-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२७ - अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१४ - नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई
- १९५३ - जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९५५ - अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६३ - पॅट्सी क्लाइन, अमेरिकन गायिका.
- १९६६ - साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे
- १९६८ - समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार नारायण गोविंद चाफेकर
- १९८५ - महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे
- १९८५ - कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर
- १९८९ - गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद
- १९९५ - हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा
- २०१० - जी.पी. बिर्ला - भारताचे प्रसिद्ध उद्योगपती
- २०१७-पी. शिवशंकर यांचे निधन झाले. ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश होते, पण तेथून राजीनामा देऊन ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करू लागले. नंतर राजकारणात आले.1980 मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्या तेव्हा शिवशंकर कायदामंत्री झाले तेव्हा त्यांनी न्यायाधीशांच्या नेमणुकांत हस्तक्षेप केला.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर मार्च ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - (मार्च महिना)