फेब्रुवारी २३
Appearance
(२३ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५४ वा किंवा लीप वर्षात ५४ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]पंधरावे शतक
[संपादन]- १४५५ - गटेनबर्ग बायबल प्रकाशित. पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.
सतरावे शतक
[संपादन]- १६६० - चार्ल्स अकरावा स्वीडनच्या राजेपदी.
अठरावे शतक
[संपादन]- १७३९ - चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३६ - टेक्सासच्या सान ॲंटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.
- १८७० - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.
- १८८६ - अमेरिकेची रसायनशास्त्री आणि संशोधक मार्टिन हेल ने ऍलिम्युनिअमचा शोध लावला
- १८८७ - फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.
- १८९३ - रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
विसावे शतक
[संपादन]- १९०३ - क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
- १९०४ - पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
- १९१९ - इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
- १९३४ - लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.
- १९४० - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.
- १९४१ - डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
- १९४७ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.
- १९५५ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९६६ - सिरीयात लश्करी उठाव.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.
- १९९१ - थायलंडमध्ये लश्करी उठाव.
- १९९६ कोकण रेल्वेच्या चिपळूण–खेड टप्प्यावर वाहतूक सुरू झाली.
- १९९७ - रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
- १९९९ - ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १४१७ - पोप पॉल दुसरा.
- १६४६ - तोकुगावा त्सुनायोशी, जपानी शोगन.
- १६८५ - जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल, जर्मन संगीतकार.
- १८४२ - जेम्स लिलिव्हाइट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७४ - कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६७ - जॅक बोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म.
- १९०४ - हेन्री प्रॉम्नित्झ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०६ - फ्रँक वॉर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९०८ - विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
- १९१३ - प्रफुल्लचंद्र तथा पी.सी. सरकार, भारतीय जादूगार
- १९२५ - इयान स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४० - पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.
- १९४१ - रॉबिन बायनो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - जॉफ कोप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५७ - येरेन नायडू – तेलुगू देसम पक्षाचे लोकसभेतील नेते.
- १९६५ - स्टीव्ह एलवर्थी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - हेलेना सुकोव्हा, चेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू.
- १०६५ - अशोक कामटे, मुंबईवरील दहशतवादी हल्ला शहीद झालेले पोलीस कमिशनर
- १९६८ - वॉरन हेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - ब्रॅड यंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - हर्शल गिब्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ११०० - झ्हेझॉॅंग, चीनी सम्राट.
- १४४७ - पोप युजेनियस चौथा.
- १४६४ - झेंगटॉॅंग, चीनी सम्राट.
- १४६८ - योहान गटेनबर्ग, जर्मन मुद्रक, प्रकाशक.
- १७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा.
- १७६६ - स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.
- १७७७ - कार्ल फ्रीडरीश गाऊस, जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ.
- १८४८ - जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८५५ - कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७९ - आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
- १९५४ - हरदेव सिंह जी महाराज,निरंकारी बाबा, निरंकारी मिशन चे प्रमुख
- १९६५ - स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.
- १९६९ - सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९६९ - मुमताज जहॉं बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९६९ - वृंदावनलाल वर्मा, हिंदी साहित्यिक.
- १९९० - अमृतलाल नागर, हिंदी लेखक.
- १९९० - होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९८ - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- २००० - वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे, संस्कृत अभ्यासक.
- २००४ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- २००४ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
- २००८ - यानेझ द्र्नोव्सेक, स्लोव्हेनियाचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - (फेब्रुवारी महिना)