गटेनबर्ग बायबल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गटेनबर्ग बायबल (४२-ओळींचे बायबल किंवा माझरिन बायबल) ही योहानेस गुटेनबर्गने छापलेली लॅटिन भाषेतील व्हल्गेट बायबलची भाषांतरित आवृत्ती आहे.

लोकप्रिय मान्यतेनुसार गुटेनबर्ग यांनी छापलेले पाश्चिमात्य देशातील हे पहिलेच पुस्तक आहे. वस्तुतः असे नाही. याआधी गटेनबर्गने अनेक पुस्तके छापली होती. तसे असले तरी या पुस्तकाच्या छपाईने गटेनबर्ग क्रांती अथवा छापील अक्षराच्या युगाची सुरुवात झाली हे खरे.

मध्ययुगीन काळात असे अनेक शोध लागले ज्याने मानवाच्या आयुष्यात क्रांती घडली. छपाईचा शोध ही अशीच एक क्रांती होती ज्याने पुस्तके मोठ्या प्रमाणात सहज छापून मिळाल्यामुळे शिक्षणाचा आणि ज्ञानाचा प्रसार झटकन होण्यास खूप मोठी मदत मिळाली.

योहानेस गुटेनबर्गने प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. गुटेनबर्ग बायबल हे धातूच्या प्रकाराने छापले जाणारे पाश्चिमात्य देशातील पहिले पुस्तक म्हणून निवडले गेले.

४२ ओळींचे हे बायबल किंवा मजारिन बायबल हे पाश्चिमात्य देशांमध्ये जोहान्स गुटेनबर्ग यांनी जंगम धातूच्या शैलीत छापलेले पहिले पुस्तक असल्याचे म्हटले जाते.(जंगम धातूच्या शैलीत छापलेले जगातील पहिले पुस्तक म्हणजे १३७७ मध्ये छापलेले "गोर्योयां"चे "जिकजी".) खरे तर ह्या आधी सुद्धा गुटेनबर्गने अनेक पुस्तके छापली होती पण गटेनबर्ग बायबलमुळे गटेनबर्ग क्रांती किंवा अक्षरक्रांती झाली असे म्हटले जाते.

इसवी सन १४५५ साली गटेनबर्ग बायबल पहिल्यांदा मुद्रित करण्यात आले असे म्हणतात.

जर्मनीच्या योहान्स गुटेनबर्गच्या ह्या शोधामुळे पुस्तके मोठ्या प्रमाणात मुद्रित करण्याची सुरुवात झाली. ह्या आधी पुस्तके हाताने लिहून काढावी लागत असत किंवा जुन्या पद्धतीने वुडब्लॉक प्रिंटींग केले जात असे.

आशिया खंडात तर फार पूर्वीपासून कापडावर किंवा जनावरांच्या कातडीवर स्टेन्सिल्स किंवा वुडब्लॉक वापरून प्रिंटिंग करीत असत.

त्यामुळे काहीही छापायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत असे. तसेच हे वेळखाऊ काम होते त्यामुळे ह्यासाठी पैसाही जास्त लागत असे. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांना पुस्तके विकत घेणे सहसा परवडत नसे.

त्यांच्या मर्यादित प्रति निघत असत. पण छपाईच्या शोधामुळे पुस्तकांच्या अनेक प्रति एकाच वेळी तयार होऊ लागल्या आणि तिथूनच अक्षरक्रांतीला सुरू वाट झाली.

माहितीचा, ज्ञानाचा जगभर प्रसार होऊ लागला. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये छपाईचा शोध हे अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे.

गुटेनबर्गने पहिल्यांदा बायबल मुद्रित केले त्याच्या १८० प्रतींपैकी ४८ प्रति आजही जगभरात विविध ठिकाणी आजही जतन करून ठेवल्या आहेत. त्यापैकी ब्रिटिश लायब्ररी मध्ये ह्याच्या २ प्रति आहेत.

त्यापैकी एक प्रत कागदावर छापलेली आहे तर दुसरी प्रत वेल्लम (चर्मपत्र) वर छापलेली आहे. पहिले मुद्रित पुस्तक असले तरीही या पुस्तकाची छपाई उत्कृष्ट केली आहे. इतिहासकार ह्याबाबतीत बोलताना म्हणतात की

“Gutenberg’s Bible was a marvel of technology and a beautiful work of art. It was truly a masterpiece. The letters were perfectly formed, not fuzzy or smudged. They were all the same height and stood tall and straight on the page. The 42 lines of text were spaced evenly in two perfect columns. The large versals were bright, colorful and artistic. Some pages had more colorful artwork weaving around the two columns of text.”

गुटेनबर्गच्या ह्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पुस्तकाच्या एकावेळी ६०० प्रति छापल्या जाऊ शकत होत्या. त्याने रिपीटेबल प्रिंट करण्याचा शोध लावला.त्याच्या ह्या शोधाचा चांगला उपयोग करण्याची जबाबदारी आपसूकच लेखकांवर आली आणि उत्तमोत्तम साहित्य लिहून, छापून लोकांपर्यंत पोहोचू लागले.

त्याच्या ह्या शोधामुळे अवघ्या पन्नास ते साठ वर्षांतच युरोप खंडात जवळजवळ दोन कोटी पुस्तके छापली गेली.