ग्वान्टानामो बे
Jump to navigation
Jump to search
ग्वान्टानामो बे ही क्युबाच्या ग्वांतानामो प्रांतातील एक खाडी आहे. ओलांडायला कठीण टेकड्यांनी वेढलेल्या या खाडीमध्ये मोठे नैसर्गिक बंदर असून हा प्रदेश देशाच्या इतर भागांपासून तुटलेला आहे.
अमेरिका व क्युबामध्ये झालेल्या १९०३ च्या तहानुसार क्युबाने हा प्रदेश अमेरिकेस तहहयात भाड्याने दिलेला आहे. क्युबाच्या सध्याच्या सरकारच्या मते तहातील हे कलम धाकदपटशाने घातले गेले होते व त्यामुळे हा प्रदेश अमेरिकेने क्युबाच्या स्वाधीन केला पाहिजे.
अमेरिकेने येथे आरमारी तळ आणि महत्तम सुरक्षित तुरुंग उभारले आहेत.