मधुबाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मधुबाला
जन्म मुमताज़ बेगम जेहन देहलवी
१४ फेब्रुवारी इ.स. १९३३
दिल्ली
मृत्यू २३ फेब्रुवारी इ.स. १९६९
बांद्रा, मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र अभिनेत्री
भाषा हिंदी
पती किशोर कुमार

आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते.

पुस्तके[संपादन]

मधुबालाची जीवनकथा सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांपैकी काही ही : -

  • अभिनेत्री मधुबाला (१९६९)
  • मधुबाला - चित्रपटसृष्टीतील महानायिका (डॉ. श्रीकांत मुंदरगी)
  • मधुबाला- दर्द का सफर (हिंदी, लेखिका - सुशीला कुमारी)
  • मधुबाला : मस्ती ॲन्ड मॅजिक (अल्पना चौधुरी)
  • मधुबाला (शशिकांत किणीकर)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.