Jump to content

मिसिसिपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याबद्दल आहे. मिसिसिपी नदीबद्दलचा लेख येथे आहे.

मिसिसिपी
Mississippi
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द मॅग्नोलिया स्टेट (The Magnolia State)
ब्रीदवाक्य: Virtute et armis
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी जॅक्सन
मोठे शहर जॅक्सन
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३२वा क्रमांक
 - एकूण १,२५,४४३ किमी² 
  - रुंदी २७५ किमी 
  - लांबी ५४५ किमी 
 - % पाणी
लोकसंख्या  अमेरिकेत ३१वा क्रमांक
 - एकूण २९,६७,२९७ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २३.४/किमी² (अमेरिकेत ३२वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $३६,३३८
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १० डिसेंबर १८१७ (२०वा क्रमांक)
संक्षेप   US-MS
संकेतस्थळ www.mississippi.gov

मिसिसिपी (इंग्लिश: Mississippi; En-us-Mississippi.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले मिसिसिपी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३१व्या क्रमांकाचे राज्य आहे.

मिसिसिपीच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात, पश्चिमेला आर्कान्सालुईझियाना, उत्तरेला टेनेसी तर पूर्वेला अलाबामा ही राज्ये आहेत. जॅक्सन ही मिसिसिपीची राजधानी व मोठे शहर आहे. मिसिसिपी ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या पश्चिमेकडून वाहते.

३६,३३८ डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेले मिसिसिपी हे आर्थिक दृष्ट्या अमेरिकेतील सर्वात गरीब राज्य आहे. कापसाची शेती हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. ह्या शेतीमुळे १९व्या शतकात अमेरिकन यादवी युद्धाअगोदर हे राज्य देशातील पाचव्या क्रमांकाचे सुबत्त व श्रीमंत राज्य होते. परंतु येथील धनाढ्य जमीनदारांनी राज्यात कोणतीही गुंतवणूक न करता सर्व संपत्ती स्वतःजवळ ठेवली. युद्धानंतर रस्ते, रेल्वे, शाळा इत्यादी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मिसिसिपीची प्रगती खुंटली. सध्या आरोग्य सेवा, स्वच्छता इत्यादी प्रमाणांमध्ये मिसिसिपीचा शेवटचा क्रमांक आहे.


मोठी शहरे[संपादन]


गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: