होजे नेपोलियन दुआर्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होजे नेपोलियन दुआर्ते

एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्षा
कार्यकाळ
१ जून १९८४ – १ जून १९८९
मागील अल्व्हारो मागान्या
पुढील आल्फेर्दो क्रिश्चानी

जन्म २३ नोव्हेंबर १९२५ (1925-11-23)
सांता आना, एल साल्वाडोर
मृत्यू २३ फेब्रुवारी, १९९० (वय ६४)
सान साल्वाडोर

होजे नेपोलियन दुआर्ते फुएंतेस (स्पॅनिश: José Napoleón Duarte; २३ नोव्हेंबर १९२५ - २३ फेब्रुवारी १९९०) हा मध्य अमेरिकेच्या एल साल्वाडोर देशाचा लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. दुआर्तेच्या कार्यकाळादरम्यान एल साल्व्हाडोरमध्ये मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले गेले तसेच अनेक नागरिकांची कत्तल करण्यात आली. त्याच्या कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे अमेरिकेने त्याला जवळ केले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन ह्यांनी दुआर्तेने चालवलेल्या हुकुमशाहीकडे कानाडोळा केला. १९८४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये दुआर्तेला निवडून आणण्यासाठी अमेरिकेच्या सी.आय.ए.ने सुमारे २० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम खर्च केली होती.

बाह्य दुवे[संपादन]