"रामायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →अधिक वाचन: शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती |
|||
ओळ १६१: | ओळ १६१: | ||
पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्॥ |
पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्॥ |
||
==रामायणाच्या कथानकावर आधारित मराठी-हिंदी पुस्तके== |
|||
* सीता : रामायणाचे चित्रमय पुनःकथन (मूळ लेखक-चित्रकार - देवदत्त पट्टनाईक, मराठी अनुवाद - विदुला टोकेकर) |
|||
== हेही पाहा == |
== हेही पाहा == |
११:२२, २० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग | |
वेद | |
---|---|
ऋग्वेद · यजुर्वेद | |
सामवेद · अथर्ववेद | |
वेद-विभाग | |
संहिता · ब्राह्मणे | |
आरण्यके · उपनिषदे | |
उपनिषदे | |
ऐतरेय · बृहदारण्यक | |
ईश · तैत्तरिय · छांदोग्य | |
केन · मुंडक | |
मांडुक्य ·प्रश्न | |
श्वेतश्वतर ·नारायण | |
कठ | |
वेदांग | |
शिक्षा · छंद | |
व्याकरण · निरुक्त | |
ज्योतिष · कल्प | |
महाकाव्य | |
रामायण · महाभारत | |
इतर ग्रंथ | |
स्मृती · पुराणे | |
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई | |
पंचतंत्र · तंत्र | |
स्तोत्रे ·सूक्ते | |
मनाचे श्लोक · रामचरितमानस | |
शिक्षापत्री · वचनामृत |
रामायण हे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य असून त्याला हिंदू धर्माय एक पवित्र ग्रंथ समजतात. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. पाचवे शतक ते इ.स.पू. पहिले शतक यादरम्यान निर्धारित केला गेला आहे.
"रामायण" तत्पुरुष समास असून तो (राम+अयन=रामायण) "रामाची कथा" अशा अर्थाने येतो. अयन हा वाट किंवा मार्ग या अर्थाने (सीताशोधनाकरिताची) रामाची वाट या अर्थानेही असल्याचे सांगितले जाते. रामायणामध्ये २४,००० श्लोक[ संदर्भ हवा ] असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणाकरवी अपहरण, आणि तत्पश्चात रामहस्ते रावणाचा संहार अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मीकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.
नंतरच्या काळातील संस्कृत काव्यांच्या छंद रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. राम , सीता , लक्ष्मण , भरत , हनुमान व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व भारतीय उपखंडातील कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील मराठी संत एकनाथ, हिंदी भाषा कवी तुलसीदास, इ.स.च्या १३व्या शतकातील तामिळ कवी कंब, इ.स.च्या २०व्या शतकातील मराठी कवी गजानन दिगंबर माडगूळकर आदी प्रमुख होत.
रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून भारतीय वसाहत असलेल्या आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (जावा, सुमात्रा व बोर्नियो) थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम व लाओस आदी देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक या माध्यमांवरही पडलेला आढळतो.
रामायणातील कांडे
रामायणाच्या अनेक ठिकाणी पूर्ण व अपूर्ण अशी अनेक हस्तलिखिते सापडली आहेत. यातील सर्वात जुने हस्तलिखित ११व्या शतकातील आहे.[१] वाल्मीकी रामायणाच्या प्रतींच्या उत्तर भारत व दक्षिण भारत प्रदेशातील अनेक प्रादेशिक आवृत्त्या मिळाल्या आहेत. रामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडांत(प्रकरणांत) विभागले आहे.
- बाल कांड – रामाचा जन्म, बाल्य, वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्यॆतील दिवस, विश्वामित्रांनी राक्षसांच्या संहाराकरता वनात नेणे, सीता स्वयंवर- आदी घटनांचा समावेश.
- अयोध्या कांड – या भागात कैकेयी दशरथाद्वारे रामास वनवासात धाडते. दशरथाचा पुत्रशोकाने मृत्यू होतो.
- अरण्य कांड – वनवासातील रामाचे जीवन, सीतेचे अपहरण या भागात चित्रित केली आहे.
- किष्किंधा कांड – सीतेच्या शोधातील राम किष्किंधेच्या वानर साम्राज्यात दाखल होतो. तिथे त्यास सुग्रीव, हनुमंत आदि कपिवीर भेटतात. वानरसैन्य सीतॆस हुडकणे प्रारंभ करते.
- सुंदर कांड – या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन येते. हनुमंताचे आणखी एक नाव म्हणजे सुंदर. या नावावरून या कांडास सुंदर कांड असे नाव आहे. हनुमान सम्रुद्र लंघून लंकेत प्रवेशितो. लंकादहन घडवितो. सीतेच्या रावणाच्या राज्यातील अशोकवन येथील उपस्थितीबद्दल रामास कळवितो.
- युद्ध कांड - या भागात राम - रावण यांचे युद्ध, रावण वध, त्यानंतर रामाचे सपरिवार अयोध्येस पुनरागमन व श्रीरामाचा पट्टाभिषेक यांचे वर्णन आहे.
- उत्तर कांड – रामाने सीतेचा लोकनिंदेमुळे केलेला त्याग, लव-कुश यांचा जन्म, रामावतार समाप्ती यांचे वर्णन.
शैलीमधील फरकांमुळे प्रथम व अंतिम कांड ही मूळ रामायणात नसल्याचा संदेह संशोधकांना आहे.[२]
रामायणातील पात्रे, वगैरे
- वाल्मीकी ऋषि, वाल्याकोळी, नारद मुनी, क्रौंच पक्षी
- सूर्यवंशी : इक्ष्वाकु मांधाता दिलीप रघु
- दशरथ, कौसल्या, कैकयी, सुमित्रा
- राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न
- मिथिलानगरी
- जनक
- सीता, ऊर्मिला
- वसिष्ठ ऋषि, विश्वामित्र ऋषि
- शिवधनुष्य
- त्राटिका, अहल्या, गौतम
- मंथरा, सुमंत, शबरी
- अंजनी, केसरी, वायुपुत्र मारुती/हनुमंत/वज्रांगबली/हनुमान, इंद्र, शिव, विष्णू, ब्रम्हा, गणेश
- सुग्रीव, वाली, जांबुवंत, अंगद, नल, नील, जटायू, संपाती, रोमा/रुमा
- लंका, शूर्पणखा, मारिच, रावण, मंदोदरी, मेघनाद/इंद्रजित, विभीषण, कुंभकर्ण, कुंभ, निकुंभ, अहिरावण, महिरावण
- रामेश्वर, द्रोणागिरी
- पुष्पक विमान
- लव, कुश
कथासार
रामायणातील नीतिपाठ
वाल्मीकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतिपाठ प्रस्तुत केला आहे. मानवी जीवन क्षणभंगुर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे, यातच मानवाचे कल्याण आहे असा वाल्मीकी रामायणचा अभिप्राय आहे.[३]
नारदमुनी हे संक्षेप रामायण या वाल्मिकी रामायणातील सर्गात आदर्श मनुष्याच्या १६ गुणांचे वर्णन करतात. हे सोळा गुण येणेप्रमाणे -
१. गुणवान - नीतिवंत
२. वीर्यवान- शूर
३. धर्मज्ञ - धर्माचा जाणकार
४. कृतज्ञ ,
५. सत्यवाक्य – सत्यवचनी
६. दृढवृत्त – आत्मविश्वासी,
७. चरित्र्यवान – चारित्र्य चांगले असणारा,
८. सर्वभूतहित – सर्व जीवांचे हित बघणारा
९. विद्वान
१०. समर्थ
११. सदैक प्रियदर्शन – ज्याचे दर्शन सदा सुखकर आहे असा
१२. आत्मवंत – धैर्यस्थ,
१३. जितक्रोध –क्रोध जिंकलेला ,
१४. द्युतिमान् – कांती सुंदर असलेला ,
१५. अनसूयक – असूया नसलेला,
१६. कस्य बिभ्यति देवाश्च जातरोशस्य संयुगे' - ज्याच्या कोपास देवताही घाबरतात असा.
रामायणातील राम स्वतःस मनुष्यच म्हणवितो. (आत्मानं मानुषं मन्ये) पुढील काळात रामाचे दैवतीकरण होऊन तो विष्णूचा अवतार गणला जाऊ लागला.
रामायणाचा काळ
परंपरेने या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसर्या युगात - त्रेतायुगात घडली. रचयिते वाल्मीकी हे ही या महाकाव्यातील एक सक्रिय पात्र होते.
रामायणाची भाषा पाणिनीय काळापेक्षाही जुनी संस्कृत भाषा आहे. महाभारत व रामायण यांच्या संस्कृतमध्ये फरक दिसतात. रामायणाच्या मूळ कृतीची रचना इ.पू. पाचव्या शतकात सुरू झाली व अनेक शतके चालली. मूळ स्वरूपात अनेक फेरफार होऊन रामायणाचे सध्याचे स्वरूप तयार झाले. रचनाकालाच्या अभ्यासासाठी भाषेचे स्वरूप हा पायाभूत आधार आहे.
रामायणाच्या कथेचा काळ याहून पुरातन असू शकतो. रामायणाची पात्रांची नावे - राम, सीता, दशरथ, जनक, वसिष्ठ, विश्वामित्र हे वाल्मीकी रामायणापूर्वीच्या ब्राह्मणग्रंथांत व वेदांत आढळतात.[४][५] रामायणाची मुख्य पात्रे वहिसुव(?), ब्रह्मा, विष्णु वा वेदोक्त देवता नाहीत. महाभारत-रामायणांच्या रचनेनंतर या देवता लोकप्रिय झाल्या.
सामान्यपणे, रामायणाचे दुसरे कांड ते सहावे कांड हे भाग या महाकाव्याचे प्राचीनतम भाग मानले जातात. पहिले बालकांड व शेवटचे उत्तरकांड नंतर मूळ प्रतीस जोडले आहे.[६] बालकांड व अयोध्याकांड यांतील घटना गंगेच्या खोर्यातील प्रदेशाची व प्राचीन भारतातील १६ जनपदांची (मगध व कोसल प्रदेश) परिचिती दाखवतात. या भागांचे राजकीय व भौगोलिक वर्णन रामायणात आहे.
रामायणाच्या अरण्यकांडात राक्षस, विचित्र प्राणी आदींचे काल्पनिक वर्णन आढळते. मध्य व दक्षिण भारताचे वर्णन वास्तवापासून बरेच दूर आहे. श्रीलंका बेटातील स्थळांच्या वर्णनात अस्पष्टता आहे.[७] इतिहासकार एच.डी.संकालिया यांनी रामायणाचा काळ सुमारे इ.पू. चौथ्या शतकात असल्याचे प्रतिपादले आहे.[८] तर इतिहासकार ए.एल. भाषम हे रामकाळ इ.पू. ७ वा ८ व्या शतकाचा असल्याचे मानतात.[९]
रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते.[१०]
’रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ (प्रकाशक - पुष्पक प्रकाशन, २०१५) या प्रफुल्ल मॆंडकी यांनी लिहिलेल्या पुस्तकात रामायणातील वेगवेगळ्या घटना किती वर्षांपूर्वी घडल्या ते निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे.
विभिन्न भाषांतरे/रूपांतरे
.
अनेक जानपद कथांमध्ये रामायणाच्या कथेचे विविध रूपांतरे दिसतात. उत्तर भारतातील रामायणकथा दक्षिण भारत व आग्नेय आशिया मधील प्रचलित रूपांतरांपेक्षा भिन्न आहे. रामायणाचा कथासंप्रदाय थायलंड, कंबोडिया, मलेशिया, लाओस, व्हिएतनाम व इंडोनेशिया देशांमध्ये प्रचलित आहे.
मलेशियातील काही रूपांतरांत लक्ष्मणास रामापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. या रूपातंरात राम दुय्यम व दुर्बल भूमिकेत आहे.
भारतीय रूपांतरे
भारतात विविध काळात लिहिलेली रामायणे परस्परांपासून भिन्न आहेत. १८व्या शतकात मराठी भाषेत श्रीधरपंतांनी रामायण रचले. १४-१५व्या शतकात कुमार वाल्मीकी यांनी कानडीत तोरवे रामायण नावाने रूपांतर केले. कानडीत कुवेंपु यांनी श्री रामायण दर्शनम् व रंगनाथ शर्मा यांनी "कन्नड वाल्मीकि रामायण" नावाने रामायणे लिहिली.
१२व्या शतकातील तमिळ कवी कंब यांनी "रामावतारम्" अथवा कंबरामायण ग्रंथ रचिला. संत एकना्थांनी "भावार्थ रामायण" हा काव्यग्रंथ मराठी भाषेत लिहिला. हिंदी भाषा भाषेचे प्रसिद्ध रामायण १५७६ सालात तुलसीदास यांनी श्री रामचरित मानस नावाने रचले. रामायणाच्या रूपांतरित आवृत्त्या गुजराती कवी प्रेमानंद यांनी १७ व्या शतकात, बंगाली कवी कृत्तिवास यांनी १४व्या शतकात, उडिया कवी बलरामदास यांनी १६व्या शतकात, तेलुगू कवी रंगनाथ यांनी लिहिल्या..
रामायणाच्या काही उप-रूपांतरांत रावण अहिरावण - महिरावण रूपात येतो.
केरळच्या "मापिळ्ळे रामायण" या रामायण रूपात रामायण लोकगीतांमध्ये गुंफण्यात आले आहे. [११]
रामायणाची मुसलमान प्रत सुद्धा आहे. या रूपांतरात रामायणाचा नायक एक मुस्लिम सुल्तान आहे. रामाचे नाव यात "लामन" असे बदलले आहे; इतर पात्रे रामायणाप्रमाणेच आहेत.
हंपी येथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष आहेत. तेथे सुग्रीवन गुहे (सुग्रीवाची गुहा) नावाची गुहा आहे. हे स्थळ सुंदरकांडातील किष्किंधेय वर्णनातील स्थळ असल्याचे मानण्यात येते. या ठिकाणी सुप्रसिद्ध हजारी राम मंदिर आहे.
आग्नेय आशियातील रूपांतरे
आशियाच्या अनेक संस्कृतींवर रामायणाचा प्रभाव पडला आहे. काही देशांच्या राष्ट्रीय महाकाव्यांसाठी रामायण प्रेरणास्थान आहे. चीनचे महाकाव्य "पश्चिमदत्त पयण" याचे काही भाग रामायणावर आधारित आहेत. या महाकाव्याचे "सुन् वुकांग्" पात्र हनुमानाच्या पात्रावर आधारित आहे. इंडोनेशियाच्या जावा प्रदेशातील सुमारे नवव्या शतकातील रुपांतर "काकाविन् रामायण" नावाने ओळखले जाते.यात संस्कृत रामायणाच्या तुलनेत अनेक ठिकाणी भेद आहे. लाओस देशाचे काव्य "फ्रा लक फ्रा लाम" हे सुद्धा रामायणाचे रूपांतर; या नावातील "लक" आणि "लाम" नावे म्हणजे लक्ष्मण व रामाच्या नावांचे लाओ रूपांतर. यात रामाचे जीवन बुद्धाचा पूर्वावतार म्हणून चित्रित केले आहे. मलेशियाच्या "हिकायत् सेरि राम" काव्यात रावणास ब्रह्माच्या वराऐवजी अल्लाचा वर प्राप्त झाल्याचे दाखविले आहे.[१२]
थायलंडचे काव्य "रामकियेन" रामायणावर आधारित आहे. यात सीता रावण व मंदोदरी यांची कन्या असे दाखविले आहे. ज्योतिषी विभीषण जेव्हा सीतॆची कुंडली पाहून जेव्हा अपशकुन वर्तवितो तेव्हा रावण तिला पाण्यात फेकून देतो, नंतर ती जनकास प्राप्त होते. थाई रामायणात मारुती हे महत्त्वाचे पात्र आहे. काव्याची कथा बँकॉकनजीकच्या "वात फ्रा कयेव" देवस्थानाजवळ घडल्याचे सांगितले आहे.
इतर आग्नेय आशियाई रूपांतरांत बालीचे "रामकवच", फिलिपिन्सचे "मरडीय लावण", कंबोडियाचे "रीम्कर" आणि म्यानमारचे "याम जात्दव" प्रमुख होत.
वर्तमानात रामायण
कानडीतील कुवेंपु यांचे रामायण रामायण दर्शनम व तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायण यांच्या रामायण कल्पवृक्षमु या कृतींस ज्ञानपीठ पुरस्कार लाभले आहेत. अशोक बँकर यांनी इंग्लिश भाषात रामायणाधारित सहा मालिका कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
कांचीपुरमच्या गेटी रेल्वे थिएटर कंपनीने द्राविड स्वाभिमानाची पुनःस्थापना या उद्देशाखाली या महाकाव्याची पुनर्रचना केली. यात रावण विद्वान, राजनीतिज्ञ, सीता त्याची धर्मपत्नी, राम हा एकएक नीतिनियम धाब्यावर टाकणारा लंपट राजकुमार असे दाखविले आहे. रामायणाची ही आवृत्ती पारंपरिक आवृत्तीच्या उलटी असून ती लिहून द्राविड चळवळीस बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
रामायणाचा विश्वव्यापी प्रभाव
रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे दोन शाश्वत आधार स्तंभ आहेत. सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीत, पडझडीत आजही मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. रामायण, महाभारत या ग्रंथांतील तत्त्वज्ञानाने भारतीय संस्कृतीला नीतिमूल्यांचे, जीवनाच्या शाश्वत मूल्यांचे अधिष्ठान मिळाले. त्यातील महन्मंगल चारित्र्याच्या गुण संस्कारामुळे येथील समाजमनाचे पोषण झाले. विकसन झाले. आसेतू हिमाचलपसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर अनेक भीषण आघात इतिहासातील आक्रमणे ही संस्कृती पचवू शकली.
भारतीय संस्कृतीची प्रसरणशीलता विलक्षण आहे. येथील पूर्वज जीवनाचे, संस्कृतीचे उच्च तत्त्वज्ञान घेऊन संपूर्ण जगात पसरले. कोणत्याही प्रकारची जुलूम-जबरदस्ती, हिसाचार नकरता त्यांनी आपला सांस्कृतिक प्रभाव निर्माण केला. त्याची साक्ष आज जे संशोधने होत आहेत, साहित्याचा अभ्यास होतो आहे, त्यातील भावधारा शोधण्याचा, तिचा उगम शोधण्याचा, संशोधक प्रयत्न करीत आहेत त्यातून पटते आहे. जगाच्या निरनिराळ्या भागांत होत असलेल्या उत्खननातून डोकावणारी भारतीय देव-देवतांची मंदिरे, त्यांच्या साहित्यातून निर्माण झालेल्या कथा व त्यातील उल्लेख आपल्या या सांस्कृतिक अधिराज्याच्या खुणा दर्शवितात.
चीन आणि तिबेट
इतिहासाच्या अनुशीलनाने हे लक्षात येते की, इ. स.च्या प्रारंभी काली ‘कुशाण' वंशाचे राज्य काशीपासून तो खोतान पर्यंत पसरले होते. त्यामुळे त्याला जोडून असलेले देश भारतीय संस्कृतीमुळे प्रभावित होणे हे अगदी स्वाभाविक होते. हा संपर्क स्थापित होण्याचे आणखीही एक कारण म्हणजे इ. स. ८५ ते१०५ या कालखंडात चिनी सम्राट ‘हो-ती' याचा सेनापती ‘यान्-छाव' याने मध्य आशियात केलेल्या स्वाऱ्या होत. त्यामुळे चीन आणि मध्य आशिया यांचा परस्परांशी संबंध प्रस्थापित होऊन दुसरया शतकापर्यंत तेथे भारतीय साहित्याचा प्रभाव बराच वाढला. इ. स. ४७२ मध्ये ‘चि-चिया-यन्'ने‘पाओ-त्सांग-चिङग्' या त्याच्या ग्रंथाचा प्रारंभच रामायणाने केला. ‘चि-चिआ-य' हे संस्कृतच्या ‘केकेय' नावाचे रूपांतर आहे. या ग्रंथाच्या उपसंहारात रामराज्याचे मोठे गुणगान केलेले आहे. इ. स. ५८० मध्ये नेपाळ अधिपती ‘अशुवर्मा' याच्या मुलीचा विवाह ‘ल्हासा' या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळे त्याचा भारताशी अधिकच निकटचा संबंध आला. त्या काळात भारतात प्रभुत्व पावलेल्या बौद्ध साहित्याचा तेथे प्रभाव पडणे अगदी स्वाभाविकच होते. त्यापैकी ‘अनामकं जातकम्'नावाच्या बौद्ध जातकाचे ‘कांग-से-इ' नावाच्या चिनी लेखकाने चिनी भाषेत रूपांतर केले ते ‘लिये-उतुत्सी' नावाच्या ग्रंथात सुरक्षित आहे. त्यात राम-सीतेचा वनवास, सीताहरण, जटायुचा वृत्तांत, वाली आणि सुग्रीव यांचे युद्ध, सीतेची अग्निपरीक्षा इत्यादी घटनांचे मोठे रोचक वर्णन केले आहे. या ग्रंथाच्या हस्त लिखित प्रती कितीतरी उपलब्ध होतात.
सायबेरिया
सायबेरिया हा आशियाच्या अति उत्तरेला असलेला देशआहे. त्यालाच प्राचीन भारतीय साहित्यात ‘शिबिर देश' म्हणून उल्लेखिला जात असे. हा प्रदेश हिमाच्छादित आहे. त्याठिकाणी मंगोलियाच्या क्षेत्रात, तसेच रशियामधून वाहणाऱ्या ‘होल्गा' नदीच्या किनाऱ्यावर भगवान प्रभू रामचंद्रांचे चरित्र ऐकविले जात असे. तेथे इ. स. ११८२ ते १२५१ मध्ये ‘कुबलाईखान' नावाचा सम्राट होता. त्याचे गुरू पंडित ‘आनंदध्वजं' होते. त्यांनी ‘एर्देनियन-सांङ्ग-सुबाशिदि' नावाचा ग्रंथ लिहिला. त्यातील ‘एर्देनि' हे रत्नाचे व ‘सुबाशिदि' हे सुभाषिताचे मंगोलियन भाषारूप होय. त्याचे सरळ भाषांतर म्हणजे ‘सुभाषित रत्ननिधी' हे होय. त्यावर ‘रिच्छेनपाल्साङ्पो'यांची टीका आहे. त्यात रामायणाचा सारांश मिळतो. त्यात असे सांगितले आहे की, लंकाधिपती रावण जनहितापासून विन्मुख झाल्यामुळे नाशाला प्राप्त झाला. खालील मूळ उताऱ्यात त्या कथेचे सार आले आहे.
ओलान्-दुर-आरव बोलुग्रासन येरवे रवुुमुन् देमि*आलिया नागादुम्बांŸ। ओख्यु आमुर सांगुरक्रुबा इद्रेन ओम्दागानदूर नेङ्ग उलु शिनुग्युयाईŸ। ओल्ज गुसेल दुर नेङ्ग येसेशिनुग्सेन-उ गेम इयेरŸ। ओरिदुमान्गोस-उन निगेन खागान् लंगा-दुर आलाग्दासान-
म्हणजे जनतेच्या नेत्यांनी, महापुरुषांनी क्षुल्लक अशा आनंदात मग्न होऊ नये. विषयलंपट होऊ नये. लोभात पडल्यानेव कामवश झाल्याने प्राचीन काळी राक्षसराज रावण लंकेत मारला गेला. अशा प्रकारे ही ‘रामन खागान्' म्हणजे ‘राजा राम' यांची कथा आज हजारो वर्षांपासून मंगोलियन, सैबेरियन, रशियन लोकांमध्ये वाचली जाते, सांगितली जात आहे.
कांबोडिया
कांबोडियालाच ‘कांबोज' किवा ‘कंबूज' असेही म्हणतात. याची स्थापना स्वायंभुव मनुने केली असे समजल्या जाते. या देशाची राजधानी ‘नॉम्पेन' आहे. या ठिकाणी संस्कृत भाषेतील सहस्रावधी शिलालेख सापडले आहे. येथील भाषेवर संस्कृत आणि पाली भाषेचा प्रभाव आहे. येथील विराट सभागृहावरील भिंतीवर इ. स. १२०० मध्ये सम्राट द्वितीय सूर्यवर्मन याच्या काळात रामायण आणि महाभारत यांतील दृश्ये अंकित केली आहेत. येथील साहित्यात रामायण हे ‘रामकीर्ती' या नावाने प्रतिष्ठित झाले आहे.
इंडोनेशिया
कांबोडियानंतर रामायणाचा प्रचार व प्रभाव इंडोनेशियातही बराच असल्याचे आढळून येते. प्राचीन साहित्यात इंडोनेशियाला ‘द्वीपान्तर' या नावाने ओळखल्या जात असे. येथील दोन मंदिरांच्या भिंतीवर खोदलेल्या चित्रलिपीवरून रामायण कथेचे अस्तित्व दिसून आले. इंडोनेशियातील रामायणावर प्रामुख्याने वाल्मीकि रामायणाचा प्रभाव आहे. त्याचे नाव ‘काकाविन रामायण' असून, त्याचा रचयिता योगेश्वर कवी आहे, असे म्हणतात. याचा रचनाकाल ११ वे शतक आहे. यात संस्कृत काव्य रचनेतील प्रमुख वृत्तांचा व छंदांचा वापर केलेला आहे. रामायणातील सर्व महत्त्वाचे प्रसंग मर्मस्पर्शी पद्धतीने रंगविले असून, त्यातून रामायणातील तत्त्वज्ञानाची मांडणी केली आहे. राम-भरत भेटीच्या प्रसंगात पादुका देताना रामचंद्र भरताला उपदेश करतात-
शील रहयु रक्षन रागद्वेष हिलङकॅनŸ। किम्बरू य त हीलनु, शून्याम्बक्त लवन अनवŸ।। गाँङग हँकार यत हिलनŸ। निन्दा तन् गवयाकॅन्Ÿ। तं जन्मामुहर वॅक्रŸ । येक प्रश्नय सुमुखŸ।।
म्हणजे- ‘हे भरता! चारित्र्याचे रक्षण कर. राग-द्वेष सोडून दे. ईर्षा आदी दोषांपासून मन आणि शरीर शून्य कर. अत्यधिक अहंकारापासून स्व्त:ला वाचव. निंदा करू नकोस. कुलीन घराण्याचा गर्व करू नकोस. हे भरता! हाच खरा धर्म आहेव हेच खरे सत्य आहे.' या प्रकाराचा रामाचा उपदेश ग्रहण करून भरत अयोध्येला परत गेला आणि भक्तिपूर्वक राज्यरक्षणात व्यस्त राहिला.
‘भरत सिर तमोल: भक्ति मंराक्षराज्य-' या ‘काकाविन रामायण' परंपरेच्या जोडीने ‘हिकायतसेरी राम' आणि जावामधील ‘रामकेलि' या रामायणाच्या प्रती सापडतात. याशिवाय रामायणाचा प्रभाव इंडोचीन, सयाम, ब्रह्मदेश, पश्चिमी देश याही देशांमध्ये दिसून येतो. इंडोचीनमध्ये ‘चंपा' राज्य स्थापन झाले. भारतीय व्यापाऱ्यांबरोबर ‘रामकथा' तेथे पोहोचली. सयाम मध्ये रामायण ‘रामकियेन' या नावाने प्रसिद्ध आहे, तर ब्रह्मदेशातील काव्यग्रंथ ‘यामत्वे' हा वस्तुत: रामकथाच आहे. पश्चिमेकडील सुमेरियन वंशातील लोक ‘दशावतार' मानतात, ते सुद्धा रामकथेला अधिक महत्त्व देतात. जेसुईट मिशनरी ‘जे. फेनचियो' याने इ. स. १६०९ मध्ये ‘लिब्रो-डा-सैटा' या नावाचे लिखाण केले. त्यात त्याने दशावताराचे निरूपण केले आहे, तसेच दक्षिणेकडे प्रचलित असलेल्या एका रामकथेचे विस्तृत वर्णन केले आहे. याप्रमाणे संपूर्ण विश्वात पसरलेल्या रामकथेचे हे रूप आहे.
मर्यादा-पुरुषोत्तम प्रभू श्रीराम
वाल्मीकी रामायणात सांगितलेला प्रभू श्रीराम हा मर्यादा-पुरुषोत्तम आहे. कवीच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालले हे महन्मंगल व्यक्तिमत्त्व आहे असे समजायला हरकत नाही. त्यानुसार, मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च, उत्तुंग आदर्श म्हणजे श्रीप्रभू रामचंद्र. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सखा, आदर्श पती, आदर्श नेता, आदर्श वीराग्रणी,‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरियसी' असा देशभक्तीचा उत्तुंग आदर्श जीवनात आचरणात आणणारा मातृभक्त आणि ‘मरणान्तानि वैराणि न मे कृतानिच' हा प्रत्यक्ष वैरी व शत्रूच्याही बाबतीत अंत:करणाची विशालता दाखविणारा हा मानव आहे. या विविध गुण समुच्चयाचे सांस्कृतिक प्रतीक असणाऱ्या रामाला म्हणूनच मर्यादा-पुरुषोत्तम म्हटले जाते.
महर्षी वाल्मीकींनी रामायणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जीवनव्यापी शाश्वत मूल्ये मांडली.. त्यांचा प्रभाव संपूर्ण जगात पसरला. त्यासाठी आपले(?) पूर्वज विजिगीषु वृत्तीने जगाच्या अनेक भागांत गेले. श्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचे पसायदान त्यांनी मुक्त हस्ते संपूर्ण मानवजातीला दिले. त्यांच्या जीवनात ‘राम' निर्माण केला.
एकश्लोकिरामायणम्
आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्
पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्॥
रामायणाच्या कथानकावर आधारित मराठी-हिंदी पुस्तके
- सीता : रामायणाचे चित्रमय पुनःकथन (मूळ लेखक-चित्रकार - देवदत्त पट्टनाईक, मराठी अनुवाद - विदुला टोकेकर)
हेही पाहा
अधिक वाचन
- Milner Rabb, Kate, National Epics, 1896 - See eText Project Gutenburg
- Raghunathan, N. (Trans), Srimad Valmiki Ramayanam, Vighneswara Publishing House, Madras (1981)
- A different Song - Article from "The Hindu" August 12, 2005 - [१]
- Dr. Gauri Mahulikar Effect Of Ramayana On Various Cultures And Civilisations, Ramayan Institute EFFECTOFRAMAYANAONVARIOUSCULTURESANDCIVILISATIONS.pdf -
- Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India Princeton University Press, 1999 ISBN 0-691-01485-X
- S. S. N. Murthy, A note on the Ramayana, Jawaharlal Nehru University, New Delhi [२]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑक्टोबर ३, २००६ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणाऱ्या सुषमा शाळिग्राम)
- पुरुषोत्तम (कादंबरी -लेखिका मेधा इनामदार)
- गीतरामायण (कवी : ग.दि. माडगूळकर)
- तुलसी रामायण (कव्रेर: तुलसीदास)
संदर्भ
- ^ Robert P. Goldman, The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India, pp 5
- ^ Raghunathan, N. (trans.), Srimad Valmiki Ramayana
- ^ रघुनाथन्, एन्. (अनुवाद), श्रीमद् वाल्मीकि रामायणम्
- ^ In the Vedas Sita means furrow relating to a goddess of agricuture. - S.S.S.N. Murty, A note on the Ramayana
- ^ Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 24
- ^ Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 15-16
- ^ Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India pp 28
- ^ See Sankalia, H.D., Ramayana: Myth or Reality, New Delhi, 1963
- ^ Basham, A.L., The Wonder that was India, London, 1956, pp303
- ^ Goldman, Robert P., The Ramayana of Valmiki: An Epic of Ancient India p. 14
- ^ See A different song, The Hindu, Aug 12, 2005
- ^ See Effect Of Ramayana On Various Cultures And Civilisations