नारद मुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नारद या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

हिंदू धर्मातील कल्पनेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात.

'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाती सः नारदः') त्यांना स्वर्गलोक,मृत्यूलोकपाताळलोक तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो.त्यांचे एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात.ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. कीर्तन याचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.[१]

त्यांनी मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला, गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर केयूर व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात खडावा असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतिचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात. त्यांना कळलाव्या असेही म्हणतात.[१]

नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.[ संदर्भ हवा ]

संदर्भ[संपादन]

  1. a b डॉ.रमा गोळवलकर (२३-१२-२०१८). तरुण भारत, आसमंत पुरवणी, पान ७ "प्रतिकांच्या देशा - नारद". तरुण भारत वृत्तपत्र, नरकेसरी प्रकाशन नागपूर. २६-१२-२०१८ रोजी पाहिले.