श्रीलंका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लंका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
श्रीलंका
இலங்கை சனநாயக சோஷலிசக் குடியரசு
Democratic Socialist Republic of Sri Lanka
श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक
(Democratic Socialist Republic of Sri Lanka)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: श्रीलंका माता
श्रीलंकाचे स्थान
श्रीलंकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी श्री जयवर्धनेपुरा कोट
सर्वात मोठे शहर कोलंबो
अधिकृत भाषा सिंहला, तमिळ
सरकार
 - राष्ट्रप्रमुख मैत्रीपाला_सिरिसेना
 - पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. श्रीपवन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस फेब्रुवारी ४, १९४८
(ब्रिटनकडून) 
 - प्रजासत्ताक दिन २२ में १९७२ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६५,६१० किमी (१२२वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.४
लोकसंख्या
 -एकूण २,०७,४३,००० (५२वा क्रमांक)
 - घनता ३१६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८६.७२ अब्ज अमेरिकन डॉलर (६१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,३०० अमेरिकन डॉलर (१११वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन श्रीलंकी रूपया (LKR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग SLST (UTC+5:30) (यूटीसी +५.३०)
आय.एस.ओ. ३१६६-१ LK
आंतरजाल प्रत्यय .lk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९४
राष्ट्र_नकाशा


श्रीलंका (सिंहली: ශ්‍රී ලංකා; तमिळ: இலங்கை ;), (जूने नाव - सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तरपूर्वेकडे बंगालची खाडी तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.

श्रीलंकेचे क्षेत्रफळ ६५,६१० चौरस किलोमीटर असून लोकसंख्या २ कोटी ७ लक्ष आहे. देशातील ७५% जनता ही बौद्ध धर्मीय आहे.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्राचीन काळापासून हा देश 'सिंहल' या नावाने ओळखला जात असे. भारतीय साहित्यात या देशाला 'लंका' असेही म्हटले जाई. ब्रिटीश राजवटीमध्ये याला 'सिलोन' असे नाव पडले. इ.स. १९७२ पर्यंत हा देश 'सिलोन' या नावानेच ओळखला जाई. नंतर याचे नाव श्रीलंका असे ठेवले गेले. इ.स. १९७८ या वर्षी याचे नाव 'श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक ' असे ठेवले गेले.

इतिहास[संपादन]

भारतीय हिंदू साहित्यात या देशाचे नाव अनेकदा येते. रामायणामधील रावण हा लंकेचा राजा होता. तसेच प्राचीन काळापासून भारत आणि श्रीलंकेचे धार्मिक, व्यापारी व राजकीय संबंध होते.

इ.स.पू. २५० पासूनच श्रीलंकेत बौद्ध धर्मसंस्कृतीचा प्रचार होण्यास सुरुवात झाली. मौर्य सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र व पुत्री संघमित्रा यांस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता लंकेत पाठविले होते. गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्याची एक फांदी घेऊन ख्रिस्तपूर्व २४५ मध्ये संघमित्रा या देशात आल्या आणि त्यांनी ती फांदी येथे रोवली. हे जगातील सर्वात प्राचीन वृक्षारोपण समजले जाते. तसेच सम्राट अशोकाने पाठवलेले बौद्ध भिक्खु येथे आले होते व त्यांनी येथे बौद्ध धर्माची सुरुवात केली. त्यांचे अस्तित्व अनुराधापूरच्या वायव्य भागात आजही स्पष्ट दिसते.

चहा, कॉफी, नारळ, रबर व मुळात श्रीलंकेची असलेली दालचिनी या पदार्थांच्या निर्यातीसाठी श्रीलंकेची ख्याती आहे. उष्णकटिबंधीय वने, समुद्रकिनारे यांमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य हे पर्यटनाच्या दृष्टीने श्रीलंकेचे आकर्षण आहे. येथे नैसर्गिक मौल्यवान खड्यांच्या खाणी आहॆेत.

श्री लंकेचे प्रशासकीय विभाजन

मोठी शहरे[संपादन]

श्री जयवर्धनेपुरा कोट ही श्रीलंकेची राजधानी आहे. कोलंबो ही श्रीलंकेची पूर्वीची राजधानी होती व सध्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.

श्रीलंकेचा परिचय करून देणारी पुस्तके[संपादन]

  • शोध श्रीलंकेचा (लेखक - डाॅ. सच्चिदानंद शेवडे)(प्रकाशन इ.स. २०१७) :

श्रीलंकेची वेगळी ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. श्रीलंकेचा इतिहास, रामायणाच्या तिथे असलेल्या खुणा, बौद्ध राजवटीचा उदय, सिंहली-तमीळ संघर्ष, एलटीटीईचा उदय आणि अस्त आणि आजची श्रीलंका अशा सगळ्या गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. प्रवासवर्णन, ताजे संदर्भ अशा गोष्टींचीही जोड दिल्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]