पंचतंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पंचतंत्र (फारसीमध्ये कलीलेह ओ देम्नेह, अरबीमध्ये कलीलाह व दिम्नाह) संस्कृतपाली भाषांतील प्राण्यांच्या बोधकथांचे संकलन आहे.


मूळ संस्कृत भाषेत असलेले पंचतंत्र या इ.स. ५ व्या शतकातील पुस्तकाचे लेखक विष्णु शर्मा आहेत असे मानले जाते. याचे मित्र भेद, मित्र सम्प्रप्ति, काकोलूकीयम, लब्धप्रणाशम आणि अपरीक्षितकारम असे पाच भाग असून यात पशु-पक्षांच्या रुपकांतून माणसाला व्यवहार चातुर्य सांगितले आहे.

एका दंतकथेनुसार अमर शक्ती नावाचा राजा ’महिलारोप्य’वर राज्य करीत होता. तो उदार, न्यायप्रिय, दानी आणि प्रतापी होता. त्याला बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती नावाचे तीन मूर्ख आणि व्यवहारशून्य मुले होती. राजा आपल्या मुलांच्या या मूर्खपणाला कंटाळला होता. त्याने आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे दवंडी देऊन एखाद्या असामान्य, हुशार गुरूचा शोध करविला. त्या दवंडीला प्रतिसाद म्हणून विष्णु शर्मा नावाचा एक ब्राह्मण राजाच्या दरबारी आला व त्याने तिन्ही राजकुमारांना त्याच्यासारखेच हुशार, व्यवहार कुशल करून दाखविण्याचा पैजेचा विडा उचलला. विष्णु शर्मा याने राजकुमारांना सांगितलेल्या या गोष्टी म्हणजेच पंचतंत्र. पंचतंत्र या नीतिकथा आहेत. कथेला मनोरंजक स्वरूप प्राप्त करणे, व्यवहारात चतुर बनवणे, धूर्तांच्या धूर्ततेचा परिचय करून देणे हा पंचतंत्राचा हेतू आहे.

या नीतिकथांची मूळ कल्पना ऋग्वेदातील मंडूक सूक्तात आहे. मंडुकांना (बेडकांना) विनोदाने 'ब्राह्मणा व्रतचारिणः' म्हटले आहे. तशीच तेथे एक मनुष्य व मासा यांची कथा येते. छांदोग्य उपनिषदात सत्यकाम जाबालाने पशुपक्ष्यांपासून उपदेश घेतला अशी माहिती मिळते.

सर्व कथा पाच तंत्रात विभागल्या आहेत,

१.मित्रभेद २.मित्रलाभ ३.संधि- विग्रह ४.लब्ध प्रणाश ५.अपरीक्षित कारक