पुष्पक विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रामायणात वर्णिल्याप्रमाणे राम-सीता पुष्पक विमानातून अयोध्येस परतल्याच्या प्रसंगावरील एक चित्र

पुष्पक हे हिंदू पुराणांत व रामायणात उल्लेखलेले एक विमान होते. मय दैत्याने हे विमान कुबेरासाठी बनवले. परंतु कुबेराचा पराभव केल्यावर पुढे ते रावणाच्या ताब्यात आले. रामायणातील उल्लेखांनुसार युद्धात रावणास हरवल्यानंतर लक्ष्मण, मारुती या आपल्या सहकाऱ्यांसोबत रामसीता पुष्पक विमानातून अयोध्येला परतले.