सूक्त
सूक्त म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितले गेलेले.[१]
सूक्त म्हणजे काय?
[संपादन]वेदांमध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. वेदांतील विशिष्ट देवतांची स्तुती करणाऱ्या ऋचांचा वा तत्सम मंत्रांचा समुच्चय म्हणजे सूक्त.
वैदिक मंत्रांचा असा विशिष्ट मंत्र-समूह जो 'एकदैवत्य' आणि 'एकार्थ' असेल, त्यालाच सूक्त म्हणले जाते. [१]
सूक्त - व्याख्या आणि प्रकार
[संपादन]'बृहद्देवता' नामक ग्रंथात सूक्त शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली गेली आहे.
संपूर्णं ऋषिवाक्यं तु सूक्तमित्यभिधीयते |अर्थात संपूर्ण ऋषि-वचनांना सूक्त असे संबोधतात.[२]
'बृहद्देवता' ग्रंथात चार प्रकारच्या सूक्तांचे वर्णन केले गेले आहे.
१. देवता सूक्त - ज्यात कोणा एकाच देवतेची स्तुती केलेली असते.
२. ऋषि सूक्त - ज्यात कोणा एकाच ऋषींची स्तुती केलेली असते.
३. अर्थ सूक्त - ज्या सूक्ताच्या पठणाने सकल हेतूंची पुरती होते.
४. छंदः सूक्त - जी सूक्ते एकाच प्रकारच्या छंदात मांडली गेली आहेत.
सुक्तांची विभागणी सामान्यतः पुढील दोन प्रकारांतदेखील केली जाते,[३]
१. क्षुद्रसूक्त - ज्यात कमीतकमी ३ ऋचा असतात.
२. महासूक्त - ज्यात ३हून अधिक ऋचा असतात.
वेदांमध्ये विविध देवतांवर केलेल्या अशा अनेक स्तुतीपर सूक्तांचा अंतर्भाव आहे.
उदाहरणार्थ -
- पुरुषसूक्त
- श्रीसूक्त
- देवीसूक्त
- रुद्रसूक्त
- श्रद्धासूक्त
- मेधासूक्त
- लक्ष्मीसूक्त
- ब्रह्मणस्पतिसूक्त
- सरस्वतीसूक्त
- नारायणसूक्त
- रात्रिसूक्त
- सूर्यसूक्त
- अग्निसूक्त
- पवमानसूक्त
- इंद्रसूक्त
- वरुणसूक्त
- उषासूक्त
- यमसूक्त
- पितृसूक्त
- पृथ्वीसूक्त
- गोसूक्त
- रोगनिवारणसूक्त
- ओषधिसूक्त
- कृषिसूक्त
संदर्भ
[संपादन]- ^ a b Press, Geeta (2015). Vedic Sukta-Sangrah (Sanskrit भाषेत). Geeta Press Gorakhpur. pp. निवेदन.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Press, Geeta (2015). Vedic Sukta-Sangrah (Sanskrit भाषेत). Geeta Press Gorakhpur. pp. निवेदन पान 2.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ Press, Geeta (2015). Vedic Sukta-Sangrah (Sanskrit भाषेत). Geeta Press Gorakhpur. pp. निवेदन पान 3.CS1 maint: unrecognized language (link)