तमिळ भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तमिळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg
Tamil
தமிழ்
स्थानिक वापर भारत, श्रीलंकासिंगापूर, मॉरिशसकॅनडा, मलेशिया इथे कमीअधिक प्रमाणात, तसेच इतर देशांतील स्थलांतरित तमिळभाषक.
प्रदेश तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार
लोकसंख्या ६,६०,००,००० (प्रथमभाषा)
बोलीभाषा सेन्तमिळ, कोन्गु, नेल्लै, मदुरै, चेन्नई इलन्कै
भाषाकुळ
द्राविडी
 • दाक्षिणात्य
  • तमिळ-कन्नड
   • तमिळ-मल्याळम
    • तमिळ भाषा
लिपी तमिळ, वट्टेळुत्तु लिपी
ग्रंथ लिपी (प्राचीन)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

सिंगापूर ध्वज सिंगापूर

श्रीलंका ध्वज श्रीलंका
भाषा संकेत
ISO ६३९-१ ta
ISO ६३९-२ tam
भाषिक प्रदेशांचा नकाशा

तमिळ भाषा (तमिळ: தமிழ் மொழி , तमिळ मोळि) ही एक द्राविड भाषा असून ती तमिळ लोकांची मातृभाषा आहे. तमिळ दक्षिण आशियातील एक प्राचीन भाषा आहे. दक्षिण भारतातील "तमिळनाड्" (अर्थ : तमिळ राष्ट्र ) ह्या राज्याची आणि पुदुच्चेरी (अर्थ:नवी चेरी) ह्या केंद्रशासित प्रदेशाची राजभाषा तसेच भारतातील पहिला अभिजात भाषेचा (Classical Language) मान तमिळ भाषेला देण्यात आला असून ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. श्रीलंका (இலங்கை /इलन्कै) व सिंगापूर (சிங்கப்பூர் /सिंगप्पुर) देशात तमिळ भाषेस अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आहे तसेच ती कमीअधिक प्रमाणात मलेशिया आणि मॉरिशस येथेही रोजच्या वापरात आढळून येते. तमिळ भाषेला स्वतःची अशी विशिष्ट तमिळ लिपी आहे.ह्या भाषेतील साहित्य सुमारे २००० वर्षाहून अधिक प्राचीन आहे. ख्रिस्तपूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकातील लेख थायलंडइजिप्त येथे सापडल्याचे पुरावे आहेत. तमिळ साहित्याचा आरंभीचा काळ हा साधारणपणे तमिळ संगम काळातील साहित्यात पहावयास मिळतो, हा साधारणपणे इ.स.पूर्व ३०० वर्ष ते ३०० इ.स.ह्या दरम्यान होता. पुरातत्त्व खात्यास भारतातील प्राचीन शिलालेखांपैकी किंवा प्राचीन लेखांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लेख तमिळ भाषेत आढळून आले आहेत. २००१ च्या आकडेवारीनुसार तमिळ भाषेत १८६३ वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी ३५३ वृत्तपत्रे ही दैनिके आहेत.

व्युत्पत्ती[संपादन]

तत्कालीन तमिळ भाषेत समृद्धता आणण्यासाठी तामिळी साहित्यिकांनी तसेच पंडितांनी केलेले योगदान पाहून पंडीयान राजांनी त्यांच्या सन्मानार्थी तमिळ संमेलने म्हणजेच तमिळ संगम भरवण्यास सुरुवात केली. यातून तमिळ भाषेला लागू करून तिच्यात संशोधन,विकास करण्यासाठी पंडीयान राजांनी प्रोत्साहन दिले. एका मतप्रवाहानुसार या तमिळ संगम या शब्दातूनच तमिळ या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी असे मानले जाते.अजून काही मतप्रवाहानुसार इ.स.१ल्या शतकात तोल्काप्पियुम हा तमिळ भाषेतील ग्रंथ लिहिला गेला.[१] साउथवर्थ यानुसार तमिळ या शब्दाचा अर्थ स्वभाषा किंवा स्वव्याख्यान असा होतो. [२]

इतिहास[संपादन]

तंजावुर येथील बृहदेश्वराच्या देवतील प्राचीन तमिळ लिपीतील लेख.

भाषाशास्त्रज्ञ भद्रीराजू कृष्णमुर्ती यांच्या मते, एक द्राविड भाषा म्हणून तामिळ , एक आद्यभाषा किंवा आद्यद्राविड भाषेपासून विकसित झाली असावी. आद्य- द्रविडी भाषिक पुनर्रचना शक्यतो भारतीय द्वीपकल्पासारखा कमी उंचीच्या प्रदेशात साधारणतः आजच्या गोदावरी नदी खोरे प्रदेशात इ.स.पु.तिसर्‍या शतकात बोलली जात होती असे पुराव्यांवरून दिसून येते. साहित्य पुरावा यानुसार आद्य-द्रविडी च्या भाषिकांची संकुल संबद्ध संस्कृती दक्षिण भारतात होती असे सुचवितो.[३] इतिहास वरून असे दिसून येते की, तमिळ भाषा २२ द्राविड भाषा यांपैकी सर्वात आधी बोलली जात होती. इ.स.पु.२ ऱ्या शतकाच्या मध्यापासून तमिळ रूढ झाली.इ.स.पु.३ ऱ्या शतकात तमिळ संघटीत झाली.[४] तमिळची लिपी ही त्या काळानंतर तमिळ-ब्राम्ही लिपीपासून विकसित करण्यात आली.तमिळ साहित्य हे भारतातील सर्वात प्राचीन असून या साहित्यावर संस्कृतचा परिणाम नाही. [५]तमिळ विद्वानांनी तमिळ भाषेचे तिच्या इतिहासानुसार तीन कालखंडात वर्गीकरण केले आहे: प्राचीन तमिळ (इ.स.पु.३००-इ.स.७००),मध्ययुगीन तमिळ (इ.स.७००-इ.स.१६००) आणि आधुनिक तमिळ (इ.स.१६००-वर्तमान).[६]

प्राचीन तमिळ[संपादन]

मध्ययुगीन तमिळ[संपादन]

आधुनिक तमिळ[संपादन]

बोली व लिपी[संपादन]

तमिळ बोलीभाषेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते म्हणजे सेन्तमिळ (प्राचीन अभिजात तमिळ), कोन्गु, नेल्लै, मदुरै (प्रमाण भाषा), चेन्नई (चित्रपटातील व सध्याची शहरी भाषा.)व इलन्कै (श्रीलंका व अन्य आग्नेय आशियातील देशांतील बोली). लेखनासाठी वापरण्यात येणारी लिपी तमिळ, वट्टेळुत्तु (प्राचीनकाळी ग्रंथ लिपी ) 1.39.96.23 ००:३२, २३ जुलै २०१५ (IST)=== मराठी-तमिळ-इंग्रजी लिप्यंतरण ===

 • अ - அ - A
 • आ - ஆ - Aa
 • इ -இ - I
 • ई - ஈ - Ee
 • उ - உ - U
 • ऊ - ஊ - OO
 • ए - ஏ - E
 • ऎ - ஐ - Ai
 • ओ - ஓ- O
 • औ -ஔ - Ow/Au
 • क - க - K/G/H
 • ख -(க)- Kh/K/G
 • ग - க - G/K/H
 • घ - (க)- K/Gh/H
 • ङ - ங - Ng
 • च - ச - Ch/S
 • छ - (ச)- Chh/Ch/S
 • ज - ஜ - J/Jh/Ch
 • झ - (ஜ)- Jh/Z/Ch
 • ञ - ஞ - Ny
 • ट - ட - T
 • ठ - (ட)- Tt
 • ड - ட - D / T
 • ढ - (ட) - Dd
 • ण - ண - N
 • त - த - Th
 • थ - (த) -Th
 • द - த - Th/Dh
 • ध - (த) - Dh/Dhh
 • न - ந, ன - N
 • प - ப - P
 • फ -(ப) - Ph
 • ब - ப - B/P
 • भ - (ப)- Bh /Ph
 • म - ம - M
 • य - ய - Y
 • र - ர, ற - R/r
 • व - வ - V/W
 • श - ச - S/Sh/Ch
 • ष - ஷ - Sh/S
 • स - ஸ - S
 • ह - ஹ - H
 • ळ- ழ - Zh
 • ळ्- ள - L
 • क्ष- க்ஷ - Ksh/X
 • ज्ञ- अक्षर नाही. - Dny/Jny

mayue

मराठी-तमिळ-भाषांतर व्यवहारोपयोगी उदाहरणे[संपादन]

 • नमस्कार-वणक्कं
 • मी कार्तिक-नां कार्तिक
 • तू?-नीन्ग? नी?
 • ये-वा.
 • यावे-वांग
 • शुभप्रभात-कालैवणक्कं
 • शुभसंध्या-मालैवणक्कं
 • स्वागतं-वाळग
 • धन्यवाद-नंड्री
 • लहान भाऊ-तंबी
 • ताई/अक्का-अक्का
 • मोठे भाऊ-अण्णा
 • बाबा / वडिल - अप्पा
 • आई- अम्मा
 • खूप आभारी-रोम्ब नंड्री
 • कसे आहात?-ऍप्पडि इरुक्क?इरुक्किन्ग?
 • मी बरा आहे.- ना नल्लार्क्क,नल्ल इरुक्केन.
 • आणि तू- नीन्ग?
 • बरा/बरी- सरी
 • हरकत नाही- पर्वा इल्लै/पर्वाल्लिये.
 • हे मित्रा- डे नन्बा
 • अरे साल्या-डे मच्चा/माची
 • मला तुझी खूप आठवण आली- उन्नै रोम्ब इळन्द विट्टेन.
 • नविन काय?- ऍन्ना सैदि.
 • काय- ऍन्ना.
 • काहीच नाही-ऑन्नुं इल्लै/ऑन्नुल्ल.
 • बरे टाटा-पोईट्वरेन
 • मला रस्ता माहित नाही/विसरलो-ऍनक्कु वळि तेरियला/तेरियाद
 • मी तूमची/तुम्हाला मदत करू का?-उनक्कु उदवट्टुमा?
 • तुम्ही मला मदत कराल का?- ऍनक्कु उदवि सॅविंकला?
 • मुतारी/शौचालय कुठे आहे?-कळिवरै ऍन्गे?
 • औषधालय कुठे आहे?-मरुन्दकडै ऍन्गे?
 • सरळ जा मग उजवी कडे/डावी कडे वळा-नॅरा पोन्ग,वलद/इडद तिरुंपुन्ग.
 • मी जॉनला शोधतोय- नां जॉनै तॅडुरेन/जॉन इरुक्का?(जॉन आहे का?)
 • एक निमिष/मिनीट - ऑरु निमिषम
 • धीर धरा-इरुन्गा.
 • हे केवढ्याला-इद एव्वळव?
 • एवढं?- ऍवळो?
 • क्षमा करा/माफ करा-मन्निक्कानुम
 • माझ्यासोबत या-ऍन्नोडु वा/ऍन्नोडु वांग.
 • साहेब-ऐय्या.
 • कृपया - दयावु सैदु
 • तेथे जा - आंगे पो
 • इथे ये - इंगे वा
 • किती वाजले? - आथरे मनी आच?
 • आज तारीख काय? - ईनकी थेदि आथरे?
 • खरच ! ( रियली) - अपाडिया !

भारतातील तमिळभाषक[संपादन]

दक्षिण भारत व श्रीलंकेतील तमिळ भाषकांचे क्षेत्र दर्शविणारा नकाशा(1961).

भारतात राज्यनिहाय तमिळ भाषकांचे प्रमाण दर्शविणारा तक्ता.[२००१ च्या जनगणनेनुसार]

अनुक्रम राज्य तमिळभाषकांची लोकसंख्या
भारत ६,०८,९३,७३१
तमिळनाडू ५,५८,७७,४४१
कर्नाटक १८,८६,७६५
पुदुच्चेरी ८,६२,१९८
आंध्र प्रदेश ७,६९,७२१
केरळ ५,९८,६१८
महाराष्ट्र ५,३२,८३२
दिल्ली ९२,७९८
अंदमान आणि निकोबार ६३,५३८
गुजरात ३५,४७०
१० मध्य प्रदेश २४,१३९
११ पश्चिम बंगाल २४,०५३
१२ उत्तर प्रदेश १६,६२०
१३ झारखंड १३,४७३
१४ छत्तीसगढ १२,५००
१५ पंजाब १२,१७९
१६ राजस्थान ११,३०१
१७ हरियाणा १०,५७२
१८ जम्मू आणि काश्मीर ९,१२९
१९ गोवा ७,९५१
२० ओडिशा ७,३६१
२१ चंदीगड ५,७६४
२२ आसाम ५,३३१
२३ उत्तराखंड २,५४७
२४ मणिपूर २,३८३
२५ अरुणाचल प्रदेश १,६४७
२६ नागालँड १,५९२
२७ त्रिपुरा १,२८०
२८ हिमाचल प्रदेश १,२१६
२९ मेघालय ९२८
३० दादरा आणि नगर हवेली ६६१
३१ सिक्किम ४८७
३२ मिझोराम ४४४
३३ लक्षद्वीप ४४३
३४ दमण आणि दीव ३४८

शब्दसंग्रह/शब्दसूची[संपादन]

तमिळ भाषेतील शब्दसंग्रह प्रामुख्याने द्राविडीयन भाषा-कुळातील आहे,आधुनिक तमिळ भाषेत भाषाशुद्धीकरणाचा प्रभाव जाणवतो.भाषा शुद्धीकरणारात संस्कृत मधून घेण्यात आलेल्या शब्दांना प्रतिशब्द निर्माण केल्याचा परिणाम जाणवतो.इतिहासात तमिळप्रमाणेच इतर द्राविडीयन भाषा जसे कन्नड, तेलुगू,व मल्याळम ह्यांवर संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा,वाक्यरचनेचा,तसेच शब्दसंग्रहाचा परिणाम झाला असावा असे मानण्यात येते ज्यामुळे ह्या भाषातील शब्दसंग्रहात संस्कृतवर आधारीत अनेक शब्द आढळतात.तसेच तमिळ भाषेतील काही मुळ शब्दांचा इतर आधुनिक भाषांमध्ये परिणाम जाणवतो जसे, इंग्रजी व इतर भारतीय भाषा.

अधिकृत दर्जा व इतर[संपादन]

तमिळनाडू, पुदुच्चेरीअंदमान आणि निकोबार येथील राजभाषेचा दर्जा तमिळ भाषेस असून, भारताच्या अधिकृत २२ भाषांमध्ये तमिळ भाषेचा समावेश आहे. ती श्रीलंकासिंगापुर या देशातही एक अधिकृत भाषा असून,.मलेशियातील ५४३ शासकीय शाळांमध्ये संपूर्ण तमिळ भाषेत प्राथमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. २००४ साली भारत सरकार तर्फे ह्या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे..

हे सुद्धा पहा.[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. Zvelebil 1992, p. x
 2. Southworth 1998, pp. 129–132
 3. Southworth 2005, pp. 249–250
 4. Southworth 2005, pp. 250–251
 5. Sivathamby, K (December 1974) Early South Indian Society and Economy: The Tinai Concept, Social Scientist, Vol.3 No.5 Dec 1974
 6. Lehmann 1998, p. 75

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: