उपनिषद
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग |
---|
![]() |
उपनिषद साहित्यात प्राचीन भारतीय तत्त्वविचार आले आहेत. उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद् याचा अर्थ आहे बसणे. गुरूंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दशः गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या.
अन्य नावे
[संपादन]वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हणले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.
उपनिषदातील आशय
[संपादन]या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते. ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत.
प्रमुख उपनिषदे
[संपादन]१. ईश, २. केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंडक, ६. मांडूक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्यक, ११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.
गौण उपनिषदे
[संपादन]या प्रमुख उपनिषदांसह काही गौण उपनिषदेही आहेत. उपनिषदांची एकूण संख्या १०८ च्या आसपास असावी. अथर्वशीर्ष तसेच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे.[१]
एकशे आठ उपनिषदे
[संपादन]सर्व १०८ उपनिषदे चार वेदांशी संबंधित आहे: ऋग्वेद (१०), सामवेद (१६), यजुर्वेद (५१) आणि अथर्ववेद (३१):
हे सुद्धा पहा
[संपादन]मराठी पुस्तके
[संपादन]- आपले वेद : आपली उपनिषदे : आपली पुराणे (पुस्तक, पाने ४८९५; लेखक - डॉ. प्र.न. जोशी, श्री.के. देवधर)
- ईशादि नौ उपनिषद् (हिंदी, गीता प्रेस)
- उपनिषदांचा अभ्यास (पुस्तक, लेखक - प्रा. के.वि. बेलसरे)
- उपनिषदार्थ कौमुदी : भाग १ - ईशावास्य आणि मांडुक्य; (अनंत दामोदर आठवले-वरदानंदस्वामी))
- उपनिषदे एक जीवनग्रंथ (संपादित, मॅजेस्टिक प्रकाशन)
- उपनिषदे सांगती कथा (बालसाहित्य, लेखिका - डॉ. शैलजा रानडे)
- १०८ उपनिषद (हिंदी, भवान सिंह राणा)
- मूळ संस्कृतमध्ये असलेल्या एकूण ७ उपनिषदांचे शांकरभाष्याला धरून केलेले मराठी भाषांतर (कृष्णराव अर्जुन केळूसकर)
- विष्णू वामन बापट यांची ईशावास्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, प्रश्नोपनिषद, वगैरे (सर्व शांकरभाष्यासहित) ही सर्व पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत.
- हिंदुत्वाचे उपनिषद (लेखक - बाबासाहेब आचरेकर)
- उपनिषदांचे रहस्य प्राचीन गुरुपरंपरेने समजून घेण्यासाठी https://m.youtube.com/my_videos?disable_polymer=true&csn=ht38W7PGLOSzz7sP3ueJ-AI या लिंकवर जा
- ईश उपनिषद - श्रीअरविंद, प्रकाशक- श्रीअरविंद आश्रम, अनुवाद - सेनापती बापट, प्रथम आवृत्ती १९६९, ISBN 978-81-7058-790-3
टिप्पणी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ भारतीय संस्कृती कोश ,खंड पहिला
- ^ Peter Heehs (2002), Indian Religions, New York University Press, आयएसबीएन 978-0814736500, pages 60-88
- ^ Patrick Olivelle (1992), The Samnyasa Upanisads, Oxford University Press, आयएसबीएन 978-0195070453, pages x-xi, 5
- ^ AM Sastri, The Śākta Upaniṣads, with the commentary of Śrī Upaniṣad-Brahma-Yogin, Adyar Library, साचा:Oclc
- ^ AM Sastri, The Vaishnava-upanishads: with the commentary of Sri Upanishad-brahma-yogin, Adyar Library, साचा:Oclc
- ^ AM Sastri, The Śaiva-Upanishads with the commentary of Sri Upanishad-Brahma-Yogin, Adyar Library, साचा:Oclc
- ^ The Yoga Upanishads TR Srinivasa Ayyangar (Translator), SS Sastri (Editor), Adyar Library
- ^ Parmeshwaranand 2000, पाने. 404–406.
- ^ Paul Deussen, Sixty Upanishads of the Veda, Volume 1, Motilal Banarsidass, आयएसबीएन 978-8120814684, pages 217-219
- ^ Prāṇāgnihotra is missing in some anthologies, included by Paul Deussen (2010 Reprint), Sixty Upanishads of the Veda, Volume 2, Motilal Banarsidass, आयएसबीएन 978-8120814691, page 567
- ^ Atharvasiras is missing in some anthologies, included by Paul Deussen (2010 Reprint), Sixty Upanishads of the Veda, Volume 2, Motilal Banarsidass, आयएसबीएन 978-8120814691, page 568
- ^ Robert C Neville (2000), Ultimate Realities, SUNY Press, आयएसबीएन 978-0791447765, page 319
- ^ Stephen Phillips (2009), Yoga, Karma, and Rebirth: A Brief History and Philosophy, Columbia University Press, आयएसबीएन 978-0231144858, pages 28-29