बँकॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बँगकॉक
กรุงเทพมหานคร
थायलंड देशाची राजधानी

Bangkok montage 2.jpg

Flag of Bangkok.svg
ध्वज
चिन्ह
बँगकॉक is located in थायलंड
बँगकॉक
बँगकॉक
बँगकॉकचे थायलंडमधील स्थान

गुणक: 13°45′8″N 100°29′38″E / 13.75222°N 100.49389°E / 13.75222; 100.49389गुणक: 13°45′8″N 100°29′38″E / 13.75222°N 100.49389°E / 13.75222; 100.49389

देश थायलंड ध्वज थायलंड
स्थापना वर्ष २१ एप्रिल १७८२
क्षेत्रफळ १,५६८.७ चौ. किमी (६०५.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२ फूट (२२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९१,००,०००
  - घनता ४,०५१ /चौ. किमी (१०,४९० /चौ. मैल)
http://city.bangkok.go.th/


बँगकॉक ही थायलंड देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. याचे थाई भाषेतील नाव क्रुंग थेप महा नखोन (किंवा फक्त "क्रुंग थेप") म्हणजे फरिश्त्यांचे शहर असे आहे. बँगकॉक हे थायलंड मधले सर्वाधिक दाटवस्तीचे १ कोटी २० लाख लोकसंख्येचे शहर आहे. १५व्या शतकात अयुथाया राजवटीत बँगकॉक हे चाओ फ्राया नदीच्या मुखाजवळ असलेले एक छोटे व्यापारी केंद्र होते. वाढत वाढत त्याची १७६८ मध्ये थोन्बुरि व १७८२ मध्ये रत्तनकोसिन अशा राजधान्या झाल्या.

सयाम (नंतरचे थायलंड) हे भौगोलिक रित्या महत्त्वाच्या ठिकाणी होते आणि म्हणून फ्रेंच व इंग्रज सरंजामशाहींना एकमेकापासून दूर ठेवू शकले. बँगकॉकने स्वतंत्र, प्रवाही व वजनदार शहर म्हणून ख्याती कमावली. आज बँगकॉक हे थायलंडाचे राजकीय, सामाजिक व आर्थिक केंद्रबिंदू इतकेच नाही तर व्यापार, आयात-निर्यात, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य व दळण-वळण या अनेक क्षेत्रात इंडोचायना देशांत आग्रहाची भूमिका पार पाडत आहे.