Jump to content

यजुर्वेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


यजुर्वेद या शब्दाचा अर्थ (संस्कृत:- यजुस् + वेदः = यजुर्वेदः) असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रे यांनी मोलाची भर घातली. यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेने मांडला आहे.धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो.हा यजुर्वेद ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.

शाखा

[संपादन]

यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा दोन संहिता आहेत - शुक्ल संहिताकृष्ण संहिता.दोहोंमध्येही धार्मिक अनुष्ठान करावयासाठीचे मंत्र आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या संहितेतच ब्राह्मणग्रंंथातील गद्य भाग दिले आहेत, तर शुक्ल यजुर्वेदासाठी ते शतपथ ब्राह्मणात स्वतंत्रपणे दिले आहेत. [१] शतपथ ब्राह्मण हा शुक्ल यजुर्वेदाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होय. याज्ञवल्क्यशिक्षा हा ग्रंथ या वेदाच्या पठणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

शुक्ल यजुर्वेद

[संपादन]

शुक्ल यजुर्वेदाच्या 'वाजसनेयी संहिता' म्हणून नाव असलेल्या (आणि बरेच साम्य असलेल्या)दोन शाखा आहेत.

वाजसनेयी माध्यंदिन ही शाखा उत्तर भारत , गुजरात , महाराष्ट्रातील नाशिकच्या उत्तरेकडील भागात प्रसिद्ध आहे. तर, काण्व ही शाखा नाशिकच्या दक्षिणेकडीलओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत प्रसिद्ध आहे..

जगदगुरू आदि शंकराचार्य यांच्या चार प्रमुख् शिष्यांपैकी एक असणाऱ्या सुरेश्वराचार्य यांनी, काण्व शाखेचा स्वीकार केला. त्यांच्या गुरूंनी आपस्तंब कल्पसूत्रासहित तैत्तिरीय शाखा अवलंबिली. म्हैसूरजवळ असलेल्या, भारतातील दुसऱ्या मोठ्या, श्रीरंगम येथील रंगनाथस्वामीच्या देवळात,काण्व शाखीय वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा होते. रघुवंश,दशरथ, रामाने व त्याच्या वंशजांनी शुक्ल यजुर्वेदाचे अनुसरण केले. शुक्ल यजुर्वेदाशी दोन उपनिषदे संलग्न आहेत- ईशोपनिषदबृहदारण्यकोपनिषद .त्यापैकी, 'बृहदारण्यक'हेहा सर्व उपनिषदांत आकाराने सर्वात मोठे आहे. ईशोपनिषदालाच ईशावास्य उपनिषद असेही म्हटले जाते.

वाजसनेयी संहितेत,खालील मंत्रांचे एकूण ४० अध्याय आहेत(ओरिसात-४१ अध्याय). ते असे -

अध्याय-

 • १ व २ : नवीन व पूर्ण चंद्र आहुती. याला दर्श व पूर्ण इष्टी असे म्हणतात.
 • ३ : अग्निहोत्र
 • ४ ते ८ : सोमयज्ञ
 • ९ व १० : वाजपेय व राजसूय - सोमयज्ञाचे दोन सुधार
 • ११ ते १८ : अग्निचयनासाठी विशेषेकरून वेदी व कुंड निर्माण.
 • १९ ते २१ :सौत्रामणी, अती सोमपानाने होणाऱ्या असरावर उतार म्हणून
 • २२ ते २५ :अश्वमेध
 • २६ ते २९ : वेगवेगळ्या धार्मिक प्रयोजनांसाठी पूरक मंत्र
 • ३० व ३१ : पुरुषमेध
 • ३२ ते ३४ : सर्वमेध
 • ३५ : पितृयज्ञ
 • ३६ ते ३९ : प्रवरयज्ञ
 • ४० : हा शेवटला अध्याय हे प्रसिद्ध ईशोपनिषद आहे.

'वाजसेनीय संहिते'चे संपादन व प्रकाशन 'वेबर'(लंडन व बर्लिन,१८५२) आणि इंग्रजीत भाषांतर, राल्फ टी.एच. ग्रिफिथ (बनारस,१८९९) यांनी केले.

कृष्ण यजुर्वेद

[संपादन]

कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत.

प्रत्येक शाखेसमवेत, ब्राह्मणे व बहुतेकांसमवेत, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, आरण्यके, उपनिषदप्रातिशाख्ये संलग्न होते.

कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय ब्राह्मणात अनेक कथा आल्या असून त्यांचे तात्पर्य 'यज्ञ' हे आहे.(१)

तैत्तिरीय शाखा : यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली ही तैत्तिरीय संहिता आहे. हे नाव ' निरुक्तकार यास्काचार्य यांंचा शिष्य 'तैत्तिरी' वरून पडले. त्यात ७ अध्याय /कांडांचा समावेश आहे.त्याची पुढे 'प्रपाठक' व नंतर 'अनुवाक्'म्हणुन विभागणी झाली आहे. त्यापैकी काहींनी हिंदू धर्मात मानाचे स्थान पटकावले आहे. उदाहरणार्थ : तै-४.५ व ४.७ ज्यात 'रुद्र चमक' आहे आणि १.८.६.१ यात महामृृत्युंंजय मंत्र. भूः ,भुवः,स्वः हे बीजमंत्र ऋग्वेदातील सवितृ गायत्री मंत्रास जोडले असलेला मंत्र हा यजुर्वेदातील आहे. दक्षिण भारतात, कृष्ण यजुर्वेदाची तैत्तिरीय पाठ्य असलेल्या शाखेचे सध्या प्रचलन आहे. या शाखेच्या लोकांत आपस्तंब सूत्र हे सर्वमान्य आहे. तैत्तिरीय शाखेत, तैत्तिरीय संहिता(७ कांड), तैत्तिरीय ब्राह्मण(३ कांड), तैत्तिरीय (७ प्रश्न) तैत्तिरीय उपनिषद-(शिक्षावली, आनंदवल्ली भृगूवल्ली व महानारायण उपनिषद.

उच्चारणाचे वेगळेपण

[संपादन]

इतर वेदांपेक्षा स्वर व उच्चार या बाबतीत शुक्ल यजुर्वेद फार वेगळा आहे. माध्यंदिन शाखेचे लोक "य"च्या जागी "ज" आणि "श"च्या जागी "ख" उचारतात. काही वर्ण द्वित्व पद्धतीने उचारतात.अनुस्वाराचा उच्चार विशेष सानुनासिक करतात आणि स्वर मानेने व्यक्त न करता हाताने करतात.[२]

आख्यायिका

[संपादन]

याज्ञवल्क्य' हा 'वैशंपायन ऋषीं'कडून परंपरेनुसार 'वेद शिकला. ते त्याचे मामा होते. त्याचा जन्म हा या कामासाठीच देवदत्त होता असे मानले जाते. तो एकपाठी(एकसंधीग्रही) होता. त्यास एका शिकवण्यातच तो ते आत्मसात करू शकत असे. वेदांच्या निरूपणात(interpretation ) दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले. एका प्रसंगी,'वैशंपायन ऋषी' इतके संतापले की, त्यांनी त्यांंचे ज्ञान परत मागितले. याज्ञवल्क्य याने ते ओकून टाकले. 'वैशंपायन ऋषी' यांंच्या एका शिष्याने, जो ते ग्रहण करण्यास उत्सुक होता, तित्तिर पक्षाचे रूप घेउन ते खाऊन टाकले. म्हणून, यास 'तैत्तिरीय संहिता' असे म्हणतात. गुरूने दिलेले सर्व ज्ञान ओकून टाकल्यावर, याज्ञवल्क्याने सूर्याची आराधना केली व सूर्यनारायणाकडून थेट नवीन ज्ञान प्राप्त केले. त्यासाठी सूर्याने घोड्याचे रूप घेतले होते अशी आख्यायिका प्रचलित आहे. वैशंपायन मूळ संहितेला शुक्ल यजुर्वेद आणि ओकून टाकलेल्या ज्ञानातून स्वीकारलेला तो कृष्ण यजुर्वेद अशी मान्यता आहे.

श्री.शकुंतला राव शास्त्री यांचे मत :- देवताविषयक कल्पनांमध्ये ऋग्वेदापेक्षा यजुर्वेदात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. ऋग्वेदातील देवतांचीच यजुर्वेदातही आराधना व प्रार्थना असून यज्ञात त्याच देवतांना हविर्भाग अर्पण करण्यास सांगितले आहे. ब्रह्मा,विष्णू व रुद्र या देवतांच्या दर्जामध्ये फेरफार झाला आहे. या देवतात्रयीचे गुणकर्मानुसार पृथकत्व पुराण ग्रंथांमध्ये पूर्णावस्थेला गेले आहे. त्याचा प्रारंभ यजुर्वेदात झालेला दिसून येतो. उपनिषद साहित्यात वाढीस लागलेली एका ईश्वराची कल्पना यजुर्वेदात निश्चित व सप्रमाण मांडली गेली आहे. यजुर्वेदातल्या नीतिविषयक कल्पना ऋग्वेदातील कल्पनांपेक्षा बऱ्याच प्रगत झालेल्या दिसतात. तिथे उच्चतर नैतिक जीवनाबद्दल खरीखुरी तळमळ दिसून येते. ज्ञान, पापाची क्षमा, अमरत्व इ.आध्यात्मिक गुणांच्या प्राप्तीबद्दलच्या प्रार्थना यजुर्वेदात विपुल प्रमाणात आढळतात.[३]


.


हे सुद्धा बघा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

Sanskrit Web Freely downloadable, carefully edited Sanskrit texts of Taittiriya-Samhita, Taittiriya-Brahmana, Taittiriya-Aranyaka, Ekagni-Kanda etc. as well as English translations of the Taittiriya-Samhita etc. Albrecht Weber, Die Taittirîya-Samhita 1871 Ralph Griffith, The Texts of the White Yajurveda 1899, full text, (online at sacred-texts.com) A. Berridale Keith, The Yajur Veda - Taittiriya Sanhita 1914, full text, (online at sacred-texts.com) Retrieved from "http://en.wikipedia.org/wiki/Yajurveda"

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
 1. ^ यजुर्वेद का सुबोध भाष्य- डॉ. सातवळेकर श्री. दा.,स्वाध्याय मंडळ,पारडी
 2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
 3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
वेद
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद