शारदामणी देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शारदा देवी या पानावरून पुनर्निर्देशित)
सारदादेवी

शारदा देवी किंवा सारदा देवी (बंगाली: সারদা দেবী; Sarada.ogg Sharodā Debi ) या रामकृष्ण परमहंस यांच्या सहधर्मचारिणी होत.

शारदामाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदामणी या बंगालमधील जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या कन्या होत. रामकृष्ण परमहंसांशी जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हा ते २३ आणि त्या पाच-सहा वर्षाच्या होत्या. शारदामणीशी विवाह झालेला असला तरी लौकिक अर्थाने रामकृष्णांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरी आलेल्या शारदादेवींची जगन्माता या नात्याने रामकृष्णांनी केलेली षोडशी पूजा हा त्यांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा ठरला.

२८ जानेवारी १८९८ रोजी, पुढे भगिनी निवेदिता झालेली मार्गारेट एलिझाबेथ नोबल भारतात आली. व कलकत्यात राहून तिने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या, आणि आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी, शारदामाता यांचा आशीर्वाद घेतला, व त्यांच्या हस्ते हिंदू धर्माची दीक्षा घेतली.(२९ मार्च १८९८). भगिनी निवेदिता यांनी लहान मुली, नवविवाहिता, प्रौढा, विधवा स्त्रिया या सर्वांसाठी नोव्हेंबर १८९८मध्ये काढलेल्या बालिका विद्यालयाचे उद्‌घाटन शारदामाता यांच्या हस्ते झाले.

शारदा देवी वरील मराठी पुस्तके[संपादन]

  • दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी, लेखक - चंद्रकांत खोत))
  • स्मृतिगंध जगन्मातेचा (सारदामातेवर चरित्रात्मक कादंबरी; लेखिका - नयनतारा देसाई)