सांख्यदर्शन
(सांख्य (हिंदू धर्म) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कपिल ऋषी हे सांख्य दर्शनाचे प्रवर्तक आहेत.
या दर्शनाने विश्वातील सर्व तत्त्वांची प्रथम गणना केली. गणनेला संख्या म्हणतात. संख्येला प्राधान्य दिल्यामुळे या दर्शनाला सांख्य असे नाव मिळाले. सांख्य शब्दाच्या इतर व्याख्येनुसार संख्या म्हणजे विवेकज्ञान होय. प्रकृती व पुरुष यांच्या बाबतीत अज्ञान असल्यामुळे माणूस जन्म-मरणाच्या फेऱ्यात सापडतो. पण जेव्हा माणसाला पुरुष हा प्रकृतीपासून भिन्न व स्वतंत्र आहे, असे ज्ञान होते तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती होते. या विवेक ज्ञानाला प्राध्यान्य असल्यामुळे या दर्शनाला सांख्य हे नाव पडले. प्रकृती व पुरुष ही दोन मूलभूत तत्त्वे या दर्शनात मानल्यामुळे हे द्वैतवादी दर्शन आहे. यामध्ये सत्कार्यवाद याचे विश्लेषण केले आहे.