रघुवंश
Jump to navigation
Jump to search
रघुवंशम् हे प्राचीन भारतातील संस्कृत नाटककार आणि [कवी कालिदास] याने सुमारे चौथे शतक ते सहावे शतक अथवा गुप्त काळ या दरम्यान रचलेले महाकाव्य आहे. कालिदासाची मेघदूत , कुमारसंभवम् ही काव्येही प्रसिद्ध आहेत.
रघुवंशावरील संस्कृत टीकाग्रंथ[संपादन]
रघुवंशावर प्राचीन संस्कृत पंडितांचे सुमारे ४० टीकागंथ आहेत. त्यांपैकी काही हे :-
- सर्वात प्राचीन टीका १०व्या शतकातील काश्मिरी कवी वल्लभदेव यांची
- मल्लिनाथकृत 'संजीवनी' टीका (या टीकेचे हिंदी भाषांतर राजेश्वर शास्त्री मुसलगॉवकर यांनी केले आहे)
- मणिप्रभा टीका (हिंदी)
- ब्रह्मशंकर मिश्रकृत ’सुधा’ टीका (संस्कृत)
मराठी रघुवंश[संपादन]
’रघुवंशा’ची कथा सांगणारी किंवा त्या महाकाव्याचा रसग्रहण करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांपैकी काही ही :-
- कालिदास विरचित रघुवंश (गणेशशात्री लेले त्र्यंबककर) (पद्यानुवाद)
- मराठी रघुवंश (लेखक - हेमंत कानिटकर आणि पु.ना. वीरकर)
- मराठी रघुवंश कथा (लेखक - नी.शं. नवरे)
- रघुवंश (सर्ग १४) (लेखक - वसंत पाटील)
- रघुवंशातील उपमासौंदर्य (लेखक - विद्याधर भिडे)