विश्वनाथ सत्यनारायण
विश्वनाथ सत्यनारायण | |
---|---|
![]() | |
जन्म |
६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ नंदनूर, कृष्णा जिल्हा, आंध्रप्रदेश |
मृत्यू | १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६ |
राष्ट्रीयत्व | तेलुगू, भारतीय |
भाषा | तेलुगू |
साहित्य प्रकार | कादंबरी, कविता |
विषय | रामायण |
प्रसिद्ध साहित्यकृती |
वेयिपंगलु मध्याकरलु रामायण कल्पवृक्षमु |
वडील | शोभनाद्री |
पत्नी | पार्वतीदेवी |
पुरस्कार |
ज्ञानपीठ साहित्य अकादमी पद्मभूषण |
विश्वनाथ सत्यनारायण (तेलुगू: విశ్వనాథ సత్యనారాయణ ; रोमन लिपी: Viswanatha Satyanarayana) (६ ऑक्टोबर, इ.स. १८९५ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९७६) हे तेलुगू भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. साहित्यिक योगदानाबद्दल यांना ज्ञानपीठ पुरस्कार [१] व साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जीवन[संपादन]
विश्वनाथ सत्यनारायण यांच्या वडिलांचे नाव शोभनाद्री आणि आईचे नाव पार्वतीदेवी असे होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच तर महाविद्यालयीन शिक्षण मछलीपटणमच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. इ.स. १९२९ साली त्यांना मद्रास विद्यापीठाकडून संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी मिळाली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली.
इतर[संपादन]
सत्यनारायणांनी लिहिलेल्या "वेयिपंगलु" या कादंबरीचा पी.व्ही. नरसिंहराव यांनी हिंदीत "सहस्रफण" या नावाने अनुवाद केला.
सन्मान[संपादन]
- "वेयिपडगलु" या कादंबरीसाठी आंध्रविश्वविद्यालय पुरस्कार (इ.स. १९३८)
- "मध्याकरलु" या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार.
- "रामायण कल्पवृक्षमु"साठी ज्ञानपीठ पुरस्कार [१] (इ.स. १९७१)
- भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९७०)
संदर्भ व नोंदी[संपादन]
- ^ a b "ज्ञानपीठ पुरस्कारविजेते" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2018-12-25. २ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |