जटायू (रामायण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रावण जटायूचे पंख कापताना - राजा रविवर्म्याने चितारलेले चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १८९५)

रामायणानुसार, जटायू (संस्कृत: जटायु) हा गृध जातीचा एक पक्षी होता. गरुडाचा भाऊ अरुण व त्याची पत्‍नी अरुणा यांच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र होता. (दुसरा पुत्र संपाती). हा अयोध्येचा इक्ष्वाकुकुलीन राजा दशरथ याचा जुना मित्र होता. रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न त्याने केला; पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले.

बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.

मतभेद[संपादन]

जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता, असे काही अभ्यासकांनी मांडले आहे [१].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ वर्तक,प.वि. वास्तव रामायण.