दक्षिण भारत
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | भारत |
| भौगोलिक गुणक | १३°०′०″N ७७°०′०″E |
| Geography of topic | geography of South India |
| Economy of topic | economy of South India |
| Category for maps or plans | Category:Maps of South India |

विंध्य प्रदेशाच्या दक्षिणेकडे असलेल्या प्रदेशास दक्षिण भारत (द्वीपकल्पीय भारत) म्हणतात. यात भारतातील तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आणि लक्षद्वीप व पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश येतात. पारंपरिक मान्यतेनुसार गुजरातसह संपूर्ण महाराष्ट्र प्रांत हा दक्षिण भारताचा भाग म्हणून गणला जातो. विशेषतः उत्तरी भारतातील लोक महाराष्ट्राला दक्षिण भारतातच गणतात. मराठी ब्राह्मणही दाक्षिणात्य ब्राह्मण म्हणूनच ओळखले जातात. दक्षिण भारताने भारताचा १९.३१ टक्के भूभाग व्यापलेला आहे. दक्षिण भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. दक्षिण भारताचे दोन उभे भाग पडले आहेत. एक पश्चिम घाटाचा भाग व दुसरा पूर्व घाटाचा भाग. गोदावरी नदी, कावेरी नदी, तुंगभद्रा नदी व कृष्णा नदी ह्या या भागातील प्रमुख नद्या आहेत.