मीमांसा
मीमांसा-पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणे मीमांसा म्हणजे पूजित विचार होय. पूजित म्हणजे तर्कशुद्ध विचार होय. वेद आणि वेदान्त यांतील धार्मिक कर्मांविषयी अथवा धार्मिक तत्त्वज्ञानाविषयी असलेली विधाने इतस्ततः विखुरलेली आहेत. त्यांची सुसंगत मांडणी करण्याच्या बाबतीत संभ्रम उत्पन्न होतो म्हणून वैदिक विधानांमध्ये सुसंगती स्थापन करण्याकरिता वेदवाक्यांची मीमांसा वेदकालाच्या अखेरच्या कालखंडात सुरू झाली व वेदोत्तरकाली विकास पावली. या मीमांसेतून वाक्यमीमांसेचे अनेक सिद्धांत निर्माण झाले. या सिद्धांतांची विषयवारीने मांडणी करून जे शास्त्र तयार झाले, त्यास मीमांसाशास्त्र म्हणतात. तात्पर्य, वेदार्थांच्या निर्णयाचे शास्त्र म्हणजे मीमांसा होय. वेदवाक्यांच्या अर्थांच्या निर्णयास उपयोगी जे सिद्धांत किंवा नियम तयार झाले त्यांस ‘न्याय’ अशी संज्ञा आहे. वेदांतील शब्दांचे, वाक्यांचे आणि प्रकरणांचे अर्थ कसे करावेत यांसंबंधाचे नियम म्हणजे हे न्याय होत. मीमांसा हे वाक्यार्थांचे तर्कशास्त्र असून आधुनिक पश्चिमी तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने मीमांसा हे भाषेचे, विशेषतः धार्मिक भाषेचे, तत्त्वज्ञान होय. भाषाशास्त्राचे काही आधुनिक तत्त्वज्ञानी भाषेची तात्त्विक चिकित्सा हाच सर्व तत्त्वज्ञानांचा आधार होय, असे मानतात [⟶ भाषिक विश्लेषण].
मुख्य विचार
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |