तुलसीदास
गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते.
= Birth[संपादन]
तुलसीदासांचा जन्म इसवी सन् १४९७ या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकुट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला.
कार्य[संपादन]
तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालिन हिंदु समाजावर झालेले आक्रमण पाहुन ते अतिशय दु:खी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण् हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्याने अनेक राजांनी सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. हिंदु धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली.
ग्रंथ रचना[संपादन]
काशी आणि अयोध्या येथे (संवत् १६३१) श्रीरामचरितमानस आणि विनय पत्रिका या रचना केल्या. आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान् चालीसा ही तुलसीदास यांची रचना आहे. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानतात. त्यांनी संस्कृतमधील वाल्मिकी रामायणाचे अवधी भाषेत रुपांतर करून त्याचे नाव 'रामचरितमानस' असे ठेवले. हे लेखन त्यांनी निव्वळ सव्वीस दिवसात पूर्ण केले होते.
- दोहावली,
- कवित्तरामायण,
- गीतावली,
- रामचरित मानस,
- रामलला नहछू,
- पार्वतीमंगल,
- जानकी मंगल,
- बरवै रामायण,
- रामाज्ञा,
- विन पत्रिका,
- वैराग्य संदीपनी,
- कृष्ण गीतावली
- रामसतसई,
- संकट मोचन,
- हनुमान बाहुक,
- रामनाम मणि,
- कोष मञ्जूषा,
- रामशलाका,
- हनुमान चालीसा.
रचना नमुना[संपादन]
"रामायण अनुहरत सिख, जग भई भारत रीति। तुलसी काठहि को सुनै, कलि कुचालि पर प्रीति।"
[वर्ग:इ.स. १५६८ मध जन्म]