रामरक्षा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


श्रीरामरक्षास्तोत्र
Last page of Ramaraksha manuscropt.png
रघुनाथमंदिर, जम्मू येथील धर्मार्थ ट्रस्टकडच्या रामरक्षेच्या हस्तलिखित पोथीतील मजकुराचे शेवटचे पृष्ठ
लेखक बुधकौशिक ऋषी
भाषा संस्कृत
साहित्य प्रकार स्तोत्र

रामरक्षा हे पठण करणाऱ्या व्यक्तीचे रक्षण व्हावे अशी रामाची प्रार्थना करणारे तसेच रामाची स्तुती करणारे संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे.[१] रामाच्या विविध नावांसह विशिष्ट अवयवांची क्रमाने नावे घेत त्या त्या अवयवाचे रामाने रक्षण करावे अशा आशयाचा मजकूर ह्या स्त्तोत्राच्या सुरुवातीच्या भागात येतो.

स्तोत्राची विविध संस्करणे[संपादन]

प्रस्तुत स्तोत्र हे मौखिक परंपरेच्या, हस्तलिखिताच्या आणि मुद्रित प्रकाशनाच्या अशा विविध स्वरूपात आढळते. ह्यांपैकी हस्तलिखित संस्करणे आणि मुद्रित संस्करणे ह्यांत बरेच अंतर असल्याचे ह्या स्तोत्राच्या विविध संस्करणांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासक डॉ. गूदेन ब्यूनेमान ह्यांनी नोंदवले आहे.[२] त्यांनी ह्या संस्करणांचे पुढीलप्रमाणे विभाग मानले आहेत.

आधुनिक संस्करण[संपादन]

हे मुद्रित स्वरूपात सर्वसामान्यपणे आढळणारे आणि सर्वत्र प्रसार असलेले संस्करण असून विविध मुद्रित संहितांत मोठ्या प्रमाणात सारखेपणा आढळतो.[३]

हस्तलिखितांतील विविध संस्करणे[संपादन]

मुद्रित स्वरूपातील संस्करणाव्यतिरिक्त भारतात विविध ठिकाणी ह्या स्तोत्राची हस्तलिखिते आढळतात[४]. ब्यूनेमान ह्यांनी ह्यांपैकी पुणे, वाई, वाराणशी आणि अयोध्या येथील[५] एकून ८४ हस्तलिखितांचा[६] समावेश आपल्या अभ्यासात केला आहे. ही हस्तलिखिते प्राधान्याने देवनागरी लिपीतील असून काही हस्तलिखिते मैथिली तसेच शारदा लिपीत लिहिलेलीही आढळतात[७].

रचना[संपादन]

बुधकौशिक ऋषींनी रचलेले हे स्तोत्र आहे.[८] भगवान शंकर यांनी बुधकौशिक ऋषी यांना रात्री स्वप्नात हे स्तोत्र सांगितले आणि सकाळी उठल्यावर ऋषीनी ते लिहून काढले अशी कथा याच स्तोत्राच्या शेवटी नोंदविलेली आढळते.[९]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


संदर्भसूची[संपादन]

  • ब्यूनेमान, गुदरून; क्षीरसागर, हेमा (संपा.) (२०१०). विश्वसंचारी रामरक्षा (द्वितीय आवृत्ती.). मूलगामी प्रकाशन.